बातम्या

Trending:


आद्याक्षरावरुन मुलांची नावे आणि अर्थ

अनेक पालक मुलांसाठी नावं निवडताना इंग्रजी आद्याक्षरावरुन ठेवणे पसंत करतात. तेव्हा पुढील नावांचा विचार करा.


ECHS Recruitment 2024: ईसीएचएसअंतर्गत ८वी पास ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरी; ७५,००० रुपये पगार

ECHS Recruitment 2024 Applications: तुम्ही आठवी पास असाल आणि सरकी नोकरीच्या शोधात असाल तर हि संधी वाया जाऊ देऊ नका. माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना म्हणजेच ईसीएचएस अंतर्गत ८ वी पास, १० वी पास, १२ वी पास आणि पदवीधर उमेदवारांची रिक्त पदांवर नियुक्त करण्यासाठी भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या जागांसाठी १५ जुलैपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.


IRCTC Shirdi Packages: चला शिर्डी साईबाबाच्या दर्शनाला, आयआरसीटीसीच्या खास पॅकेजमध्ये त्र्यंबकेश्वरलाही भेट देता येणार

IRCTC Shirdi Special Packages: शिर्डीला जाण्याची इच्छा असलेल्या भाविकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण आयआरसीटीसीने तुमच्यासाठी एक खास पॅकेज लॉन्च केले आहे.या पॅकेजमध्ये तुम्हाला शिर्डीसोबतच त्र्यंबकेश्वरलाही भेट देता येणार आहे.


Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6:30 AM : 06 JULY 2024

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6:30 AM : 06 JULY 2024 मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली ((सुरू होणार)), आजपासून ते १३ जुलैपर्यंत ही रॅली काढणार, १३ तारखेनंतर जरांगे पाटील आपली भूमिका ठरवणार. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांचा आरोप, तर आरोप करणारेच घोडेबाजार करतात, नाना पटोलेंचा पलटवार विश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, सूर्यकुमारच्या कॅचवरून रोहित शर्माची टोलेबाजी दोन वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट...टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग... टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडदरम्यान उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल मुंबई पोलिसांचं विधानभवनातही कौतुक, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि सूर्यकुमार यादवकडून कौतुकाची थाप लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मोदी आणि शिंदेंचे फोटो कशासाठी? विजय वडेट्टीवार आणि सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर..३ ते १० वर्षांची शिक्षा तसंच १ कोटी रुपये दंडाची तरतूद...मंंत्री शंभूराज देसाईंनी मांडलं विधेयक..


ठाणे महापालिकेतील पाच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, उपायुक्त मनिष जोशी यांच्यासह इतर पाचजणांचा समावेश, उपायुक्त जोशी यांनी आरोप फेटाळून लावले

ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनिष जोशी यांच्यासह पाच जणांवर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल केला आहे.


Pune District Magistrate Jogendra Katyare Suspended पुण्याचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारेंच निलंबन

Pune District Magistrate Jogendra Katyare Suspended


Weather update : महाराष्ट्रावर धडकणार मोठं संकट; पुढील 2 दिवस महत्त्वाचे

महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (IMD)देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागात आज पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सोबतच वादळी वाऱ्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. विदर्भात समाधानकारक पाऊस झाला नव्हता मात्र गेले दोन दिवस पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान पुढील 24 तासांमध्ये विदर्भात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकणाबाबत बोलायचं झाल्यास पुढील 24 तासांमध्ये कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ढगाळ वातावरण राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. मुंबईत पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या काळात मुंबईचं तापमान 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान या काळात नुसता पाऊसच पडणार नसून, वादळाच्या रुपानं मोठं संकट देखील समोर आहे. या काळात ताशी 50 ते 60 किमी वेगानं वारं वाहू शकतं असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून आज पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.


Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाचा ‘जांगडगुत्ता’!

Maharashtra Sadan Delhi : अयोध्येत, जम्मू-काश्मीरमध्ये सरकारने नवी महाराष्ट्र सदने सदने जरूर बांधावीत. पण आधी राजधानीतल्या दोन्ही सदनांतील प्रशासकीय अनास्थेचा, गडबड-गोंधळाचा ‘जांगडगुत्ता’ सोडवावा. ती इच्छाशक्ती राज्य सरकार कधी दाखवणार?


maratha reservation : जरांगेची हिंगोलीतून जनजागृती रॅली सुरू होणार

maratha reservation : Jarange marathwada rally


कारी बदरी जवानी की छटती नहीं…

वयरोधक अर्थात ‘अॅन्टीएजिंग’ उत्पादनांची जगभरातली उलाढाल २०३० पर्यंत १२० अब्ज डॉलरवर जाण्याची अपेक्षा आहे. याची भारतातील बाजारपेठही १२ टक्के दरानं वाढेल, असा अंदाज आहे.


Raj Thackeray: आयुष्यात कुणाला घाबरता? राज ठाकरेंचं उत्तर ऐकून सगळेच भारावले

मुंबई: तडाखेबाज भाषण आणि बेधडक निर्णय शैलीमुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. विरोधकांना किंवा सरकारच्या निर्णयावर घेऊन ठाकरी शैलीत फटकेबाजी करणारे राज ठाकरे आयुष्यात खरंच कुणाला घाबरतात का, असा सवाल थेट एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी दिलेलं उत्तर ऐकून सगळेच भारावून गेले आणि एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी...


शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्व्हेक्षणासाठी विशेष मोहीम

या मोहिमेतंर्गत होणारे सर्व्हेक्षण गावात, शहरात, गजबजलेल्या वस्त्या, रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाजार, झोपडपट्टी, गावाबाहेरील पाल आदी ठिकाणी होणार आहे.


विज्ञानक्षेत्रात ‘ती’ कुठे?

जागतिक स्तरावर संशोधनात स्त्रियांचं प्रमाण ४१ टक्के असल्याचं दर्शवणारा एक नवीन अहवाल समोर आलाय. त्यानुसार सक्रिय संशोधकांमध्ये स्त्रियांचं प्रमाण वाढण्याच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.


Chandrapur News : बाबा आमटे यांच्या आनंदवनातील तरुणीच्या खून प्रकरणातील आरोपीचे टोकाचे पाऊल; पोलीस कोठडीतच संपवलं जीवन

Chandrapur Crime News : चंद्रपूर जिल्ह्यातील बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पात 4 दिवसांपूर्वी एका विवाहितेच्या खूनाचा खळबळजनक प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसानी आरोपीला अटक करून त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली होती. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या (Crime News) केल्याचा धक्कादायक प्रकार आज उजेडात आला आहे. समाधान माळी (वय वर्ष 25) असं गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या आरोपीचं नाव असून वरोरा पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्येच हा...


Sant Tukaram Maharaj Palkhi 2024: पुणेकरांसाठी मोठी बातमी! पालखींच्या आगमनानिमित्त उद्या वाहतुकीत बदल; कोणते रस्ते बंद?

Sant Tukaram Maharaj Palkhi: शहरात पालखी मार्गावरील रस्ते दुपारी दोनपासून आवश्यकतेनुसार बंद केले जाणार आहेत. या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.


Chanakya Niti: या 5 ठिकाणी क्षणभरही थांबू नये, नाहीतर संकटांना द्याल आमंत्रण

आचार्य चाणक्य यांची गणना जगातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये केली जाते. त्यांनी रचलेली चाणक्य नीती आजही लाखो लोकांना आपल्या जीवनात मार्गदर्शन करते. चाणक्य नीतीद्वारे अनेक विद्यार्थी यशाच्या मार्गावर पुढे जातात. कारण चाणक्य नीतीमध्ये माणसाने आपल्या आयुष्यात काय केले पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे सांगितले आहे. आचार्य चाणक्यांच्या धोरणांमुळे महान चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी मगधमध्ये मौर्य वंशाची स्थापना केली होती. आचार्य...


Zika Virus Advisory: झिका व्हायरसचा धोका वाढतोय? आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना ॲडव्हायझरी जारी

Union Health Ministry Issues Advisory to States in view of Zika virus: महाराष्ट्रातील झिका विषाणूची प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना अॅडव्हायजरी जारी केली आहे. झिका विषाणूच्या संसर्गासाठी गर्भवती महिलांची तपासणी करून आणि झिका पॉझिटिव्ह आलेल्या गर्भवती मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवत राज्यांनी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रुग्णालयांचा परिसर एडिस डासमुक्त ठेवण्यासाठी, निरीक्षण करण्यासाठी...


Mumbai : मुंबईत आज महायुतीचा मेळावा

Mumbai : Todays Mumbai Mahayuti meeting


Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?

Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी कोणीच मागे न घेतल्याने 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. 12 जुलैला विधान परिषदेसाठी विधीमंडळात मतदान पार पडणार आहे. गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. महायुतीचे नऊ उमेदवार रिंगणात 12 जुलै रोजी होणाऱ्या महाराष्ट्रातील 11 जागांवर होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी 12 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज कायम आहेत....


चंद्रमौळी

डोक्यावर चंद्र धारण करणारा, अशा अर्थाने या दोन्ही ठिकाणी ‘चंद्रमौळी’ असा शब्द वापरला जातो. गरिबी असली, अगदी छतही नीट शाकारलेले नसले, तरी घरामध्ये चंद्र उतरणे ही बाब साहित्यिकांनी शब्दबद्ध केली.


Devendra Fadnavis: फडणवीसांचे विरोधकांना थेट आव्हान; ...तर माझ्यावर हक्कभंग आणा

Devendra Fadnavis in Maharashtra Assembly : विधान परिषदेत सुरु असलेल्या चर्चेत विरोधी पक्षाने नोकरभरतीचा मुद्दा उपस्थित केला आणि पेपरफुटीच्या प्रश्नावर देखील सरकारला घेरले. यावर प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोचक शब्दांत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.


बिहारची ‘अफसर बिटिया’

टिनू सिंगने २०२३ च्या मध्यंतरीच्या काळात लागोपाठ कॉम्प्युटर ऑपरेटर, सहाय्यक शाखा अधिकारी, बीपीएससी शिक्षक भरतीमधील तीन वेगवेगळ्या अशा एकूण पाच परीक्षा दिल्या होत्या. या सर्व परीक्षांचा निकाल डिसेंबर २०२३ मध्ये सलग पाच दिवस लागणार होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे टिनूच्या मेहनतीला यश आले आणि तिने ज्या पाच परीक्षा दिल्या होत्या त्या सर्व परीक्षांमध्ये ती अव्वल क्रमांकाने पास झाली. टिनूच्या या यशाने जमुई जिल्हाच नाही तर बिहारमध्ये ती चर्चेचा विषय...


Ajit Pawar | 'महायुतीचा उमेदवार मागे घेणार नाही'

Ajit Pawar Confirms Mahayuti Candidates Will not Withdraw From Vidhan Parishad Election