PM MODI PUNE RALLY: पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभेचे ठिकाण बदललं, आता या मैदानावर होणार सभा

PM Modi Pune Sabha: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची रणधुमाळी सध्या सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी राज्यातील 8 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या पर्श्वभूमीवर नेत्यांनी प्रचार सभांचा जोरदार सपाटा लावला आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुणे जिल्ह्यातील पुणे शहरसह बारामती, शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी पुण्यात सभा घेणार आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू आहे.

मोदींच्या सभेचे ठिकाण बदलले

पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या सभेचे ठिकाण बदलण्यात आले आहे. आधी ही सभा एस पी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार होती, परंतु आता पंतप्रधान मोदींची सभा होणार रेसकोर्सवर होणार आहे. मोदींच्या सभेला होणारी संभाव्य गर्दी विचारात घेऊन मैदान बदलण्यात आले आहेत. त्यामुळे आता 29 एप्रिल रोजी नियोजित असलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यातील एसपी कॉलेज ऐवजी रेसकोर्सवर होणार आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी सायंकाळी आयोजकांसमवेत रेसकोर्सची पाहणी केली. या सभेला जमणारी संभाव्य गर्दी, वाहतूक कोंडी आणि गैरसोय टाळण्यासाठी रेसकोर्स मैदान निश्चित करण्यात आले आहे.

सभेनंतर मोदींचा पुण्यातच मुक्काम

विदर्भात तीन सभा आणि शनिवारी नांदेड आणि परभणी येथे एका पाठोपाठ एक सभा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या आगामी टप्प्यासाठी पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करणार आहेत. पुण्यात 29 एप्रिलला एसपी कॉलेजच्या मैदानावर पंतप्रधानांची सभा होणार आहे. रॅलीनंतर मोदी पुण्यात रात्रभर मुक्काम करणार असल्याचे भाजपच्या स्थानिक युनिटने सांगितले.

या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींची सभा

पुणे शहरमध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि शिरूर मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव आढाळराव पाटील या चार या चार मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेनंतर पंतप्रधान रात्री शहरातच मुक्कम करतील असे सांगितले जात आहे.

30 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रात 3 सभा

भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार पुण्यातील सभेपूर्वी मोदी आदल्या दिवशी लातूरमध्ये दुसरी सभा घेणार आहेत. तर पुण्यातील सभेनंतर पंतप्रधान मोदी 30 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रात सातारा, माढा आणि सोलापूर येथे आणखी तीन सभा घेणार आहेत.

2024-04-23T17:33:22Z dg43tfdfdgfd