Trending:


बाटला हाऊसमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांसाठी सोनिया गांधींनी अश्रू ढाळले; नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका

तुम्हाला माहीत आहे का की इंडीया आघाडी कोणत्या अजेंड्याला घेऊन निवडणुकीत आहे? यांचा एकच अजेंडा आहे. हे सरकारमध्ये येऊन मिशन कॅन्सल राबवणार, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


Weather update : महाराष्ट्रात जोरदार पाऊस; हवामान विभागाकडून हायअलर्ट

महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस सुरूच आहे. दरम्यान आज देखील पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (imd) अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज पुन्हा एकदा मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नुसता पाऊसच पडणार नाही तर या काळात वादळी वाऱ्याचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग प्रति तास 30 - 40 किमी इतका असणार आहे. आज लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.दरम्यान जरी पाऊस पडणार असला तरी हवामान विभागाकडून गारपिटीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.जरी राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी देखील महाराष्ट्रातील काही भागात आजही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोलापूरमध्ये उन्हाचा पारा 44 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.मुंबईबाबत बोलायचं झाल्यास मुंबई आणि उपनगरामध्ये आजही हवामान कोरडं राहणार असून, आकाश निरभ्र राहणार आहे. तापमान 37 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.


महिला मतदारांचे सामर्थ्य

लोकशाहीचा उत्सव 19 एप्रिलपासून सुरू झाला आहे. सत्तेची धुरा कोणाच्या हाती असेल, हे आगामी काळच सांगेल; परंतु यात निर्णायक भूमिका ही महिला मतदारांंची असेल, यात तिळमात्र शंका नाही. गेल्या काही दशकांत महिला या महत्त्वाचा मतदार गट म्हणून समोर येत आहे. पुरुष मतदारांच्या एक पाऊल पुढे टाकत लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी मतदानाची जबाबदारी पाडत महिलांनी केलेली …


चावडी : मीच तो!

ह्य ‘महाराष्ट्रातील एक माजी मंत्री केंद्रात कृषी मंत्री होते’, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील प्रचार सभेत केले होते


CISCE Board Result : कॉमर्समध्ये कावरे तर विज्ञान शाखेतून देबर्णा दास प्रथम

जळगाव : पुढारी वृत्तसेवा दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १२ वी आयएससीचा निकाल जाहिर झाला. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलच्या १२ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. स्कूलच्या स्थापनेपासून १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राहिली आहे. सीआयएससीई बोर्डच्या १२ वी इयत्तेत कॉमर्स शाखेतील विद्यार्थी तुषार कावरे हा ९४.५० टक्के गुणांसह पहिला आला. विज्ञान शाखेतून देबर्णा …


BARC Mumbai recruitment 2024 : मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात होणार मोठी भरती! पाहा माहिती

BARC Mumbai recruitment 2024 : मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग, ट्रॉम्बे येथे नोकरीची भरती करण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी अधिक माहिती पाहा.


Lok Sabha Elections 2024 Phase 3 Voting: देशात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 60.2 टक्के, तर राज्यात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Elections 2024 Phase 3 Voting Percent Till 5 pm: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपले आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील रायगड, बारामती, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, हातकणंगले, माढा, लातूर, धाराशिव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघासह देशात बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ,गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या काही राज्यांमध्ये मतदान झाले.


कलाटणी देणारा तिसरा टप्पा…

भाजप आणि मित्रपक्षांनी तिसऱ्या टप्प्यात उत्तुंग यश गाठले नाही, तर बहुमतावरही प्रभाव पडू शकतो.


आग्रीपाडा येथे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

आग्रीपाडा येथील इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून ३३ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Mhada News : म्हाडाकडून 24 लाखांमध्ये 1BHK घराची विक्री; किमान खर्चात साकार होणार अनेकांचं स्वप्न

Mhada Lottery 2024: हक्काच्या घराच्या शोधात आहात? कर्जाचा बोजा नकोय? म्हाडाची ही योजना तुमच्यासाठी ठरू शकते उत्तम पर्याय. पाहा सविस्तर माहिती


परभणी: गोविंदपुरात शेती कर्जाला कंटाळून तरुणाने जीवन संपविले

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील गोविंदपूर येथील एका शेतक-याच्या मुलाने वडिलांनी बँकेचे घेतलेले कर्ज फेडणे शक्य होत नसल्याने वैफल्यग्रस्त होवून रेल्वेखाली उडी मारुन जीवन संपविले. ही घटना ७ मेरोजी सकाळी उघडकीस आली. चुडावा पोलीस ठाण्याचे सपोनि नरसिंग पोमनाळकर, जमादार गजानन गवळी, शिपाई विलास मिटके यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील …


Loksabha Election 2024 | अजित पवार गटाकडून धनशक्तीचा वापर केल्याचा आरोप

baramati Bhor Allegation Of Money Distribution By Ajit Pawar Camp Loksabha Election 2024


Sharad Pawar - बारामतीमध्ये शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

भारत, May 7 -- Sharad Pawar - बारामतीमध्ये शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क


Punjab Haryana High Court : वृद्ध सासूबरोबर राहण्यास सुनेचा नकार, हायकोर्टानं मंजूर केला नवऱ्याचा घटस्फोटाचा अर्ज

Punjab Haryana High Court : पतीच्या वृद्ध सासूसोबत व आजारी वहिनीसोबत राहण्यास नकार देणाऱ्या महिलेला पंजाब हरयाणा न्यायालयानं मोठा दणका दिला आहे.


Rabindranath Tagore Jayanti 2024 Quotes : रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत

रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत