बातम्या

Trending:


BECIL Recruitment 2024 : ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया येथे नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

BECIL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया येथे होणाऱ्या भरती आणि अर्जाबद्दल अधिक माहिती पाहा.


Yogi Adityanath : उत्तर प्रदेशात गेल्या सात वर्षांत एकही दंगल झाली नाही : योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशात गेल्या सात वर्षांत एकही दंगल झाली नाही, बुलडोझर चालवून एका दिवसात माफिया संपवून टाकलं, नालासोपारा इथल्या सभेत योगी आदित्यनाथांंचं वक्तव्य तर काँग्रेसह इतर विरोधीपक्षांवरही साधला निशाणा. चारशे पारचा नारा दिला की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते 140 कोटी जनतेच्या धार्मिक भावनेच्या आधारावर श्रीराम मंदिर बांधले गेले. काँग्रेस सरकार म्हणायचं की, हिंदूंच्या बाजूने निकाल लागला तर दंगे होतील पण हा नवा भारत आहे. रामलल्ला आयेंगे, मंदिर वही बनायेंगेचा आमचा संकल्प होता आणि मंदिर बांधले. यासाठी महाराष्ट्रातील हजारो कारसेवकांचे योगदान आहे. काँग्रेसचे सरकार पुन्हा येण्याचे लायकीचे राहणार नाही. पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. अबकी बार चारशे पारचा नारा दिला की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते. काहीच संदेह ठेवू नका, पुन्हा मोदी येणार आहे. मालेगाव, धुळे येथील बांधवांना अयोध्या येथे राम मंदिर दर्शनाला या, असे आवाहन त्यांनी केले.


Aaditya Thackeray Slams Eknath Shinde : नकली शिवसेनेला महाराष्ट्राची जनता उत्तर देईल

ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाईंच्या प्रचारासाठी प्रचार रॅली काढण्यात आली होती. तर ही रॅली विजयाची रॅली असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी.... तर मिहीर काटेजा यांच्या कार्यालयात पैसे वाटप केले जात होते, या प्रकरणाचे फुटेज देखील समोर आलेले आहे, जे काम निवडणूक आयोगाचा आहे तिथे करत नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत, आदित्य ठाकरेंची मुलुंड आंंदोलनावर प्रतिक्रिया. येत्या सोमवारी राज्यातील शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे.. पाचव्या टप्यात राज्यात मुंबईत ६ जागांसह एकूण १३ जागांसाठी मतदान होणार आहे.. आज या मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत.. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या आज मुंबईतील ४ मतदारसंघात प्रचारसभा होणार आहेत.. दरम्यान महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येणार आहेत.. तर ठाण्यात नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांची सांगता सभा होणार आहे.. दिंडोरीत सुप्रिया सुळेंची प्रचार सभा होणार आहे..


Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवलीच्या परिसरात प्रचंड उकाडा जाणवत आहे. सतत घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे हा उकाडा (Heat Wave) कधी कमी होणार, याची अनेकजण वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून नवा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईतील (Mumbai) तापमानात रविवारीही फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे हवेतील उकाडा कायम राहील. तसेच कमाल तापमान (Mumbai Temperature) 36...


मतपेटीसाठी लोकसंख्येचा बागुलबुवा

मुस्लीम लोकसंख्या हा कायम चिंता, चर्चा आणि चिंतनाचा विषय बनवला आहे. मात्र ही चिंता कमी व्हावी आणि परिस्थितीत बदल व्हावा यादृष्टीने ठोस उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक चिंतन करण्यापेक्षा असत्य आणि अर्धसत्य संदर्भ आणि संख्याशास्त्रीय आधार घेऊन हेतुपूर्वक चर्चा होत असते.


Garib Rath Express Train: गरीब रथचे नशीब फळफळणार, मिळणार सुपर VIP दर्जा; असा आहे Railway चा प्लॅन

Garib Rath Express Train: गरीब रथ एक्सप्रेस मध्ये राजधानी एक्सप्रेससाठी जर्मनीहून आयात करण्यात आलेले एलएचबी कोच जोडण्यात येणार असल्याची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा बदल देशातील पहिल्या गरीब रथ एक्सप्रेसमध्ये होणार आहे, यामुळे प्रवाशांच्या आसनक्षमतेत कमालीची वाढ होणार आहे.


धुमसते पाकव्याप्त काश्मीर

पाकिस्तान सरकार आणि लष्कराने पाकव्याप्त काश्मीरचा वापर नेहमीच भारतात अशांतता, दहशतवाद आणि हिंसाचारासाठी केला. आता तेथील परिस्थिती अनियंत्रित आणि हिंसक बनली आहे. जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. हा भाग भारताने ताब्यात घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. तथापि भावनिकतेच्या पलीकडे जात वास्तवाचे भान ठेवून विचार केल्यास हा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा असल्याचे लक्षात येते. अलीकडील …


Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024

Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024 भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो, भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचं मोठं वक्तव्य, तर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून सारवासारव एक दिवस मोदी संघालाही नकली म्हणतील, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा, संघाला संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही, ठाकरेंचा घणाघात बुलडोझर चालवणार नाही तर राम मंदिराचं उर्वरित काम पूर्ण करू, मोदींच्या टीकेला उत्तर देतान ठाकरेंचा पलटवार, तर सर्वधर्मीय स्थळांचं संरक्षण ही आमची भूमिका, पवारांचं वक्तव्य सत्ता आल्यास देशात सरसकट एकच जीएसटी, इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत खरगेंची घोषणा, प्रचारात मोदी जनतेला भडकवत असल्याचा आरोप मुंबईतल्या तीन मतदारसंघात दोन शिवसेना आमने-सामने, दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव, दक्षिण मध्यमधून अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे लढत, वायव्य मुंबईत अमोल कीर्तिकर रवींद्र वायकरांना भिडणार महामुंबईसह ठाणे, नाशिक, धुळ्यातल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या, २० मे रोजी राज्यातील १३ मतदारासंघांमध्ये मतदान


दारी कुरिअर येता...

निवडणुकीच्या काळातील जाहीर सभांमधून आणि मुलाखतींमधून जे काही सांगितलं जातं, ते वस्त्रगाळ केलं तर खाली किती सत्व पडेल आणि वर काय सत्य उरेल, हे कोणालाच सांगता येत नाही. परतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा भूतकाळ उकरून जो सत्याचा प्रकाश पाडला त्या प्रकाशात पाहिलं तर एक प्रसंग डोळ्यांपुढे येतो... गृहिणी- अहो हे काय केलंत? त्याला कशाला बसवता ख...


TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP Majha

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, बाळासाहेबांना जो भारत अपेक्षित होता, तो मोदींनी तयार केला, फडणवीसांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय झाल्यावर पंतप्रधान कोणाला करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खोचक सवाल. देशभक्त शब्दाला आक्षेप घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशद्रोही झालेत का?, उद्धव ठाकरेंचा सवाल. ठाकरे नावाचा माणूस भाजपला हवा असतो, म्हणून त्यांनी भाडोत्री घेतलाय, उद्धव ठाकरेंची नाव न घेता राज ठाकरेंवर टीका. उद्या मोदी संघाला देखील नकली संघ म्हणतील, आम्ही स्वयंपूर्ण झालोय, आता आम्हाला संघाची गरज नाही असं मोदी उद्या म्हणतील, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल. भाजप सत्तेत आली तर ते आता संघावरच बंदी आणतील, जे पी नड्डा यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल.


मधमाशी पालनाचा इस्रायली मंत्र

इस्रायलमध्ये जी कृषी क्रांती झाली, त्यात मधपाशीपालन आणि त्याचा कृषी क्षेत्रासाठी केलेला पुरेपूर उपयोग यांचा महत्त्वाचा वाटा आहे. देशात मधाचे वार्षिक उत्पादन ३५०० टन आहे. मध व्यवसायाची वार्षिक उलाढाल २०-२२ दशलक्ष डॉलर्स असते.


कृतिशील विचारवंत

बुद्धिनिष्ठ विचारवंत, लेखन आणि विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे समीक्षक, दलित साहित्याची पाठराखण करणारे साहित्यिक असणारे डॉ. भालचंद्र फडके यांची ही जन्मशताब्दी. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा हा थोडक्यात आढावा...


निवडणुकीचा बदलता रंग

उत्तर भारतात लोकसभेच्या 180 जागा आहेत. उत्तर प्रदेश हे लोकसभेचे हृदय मानले जाते. तसेच हिंदी पट्टा हाच सत्तेच्या चाव्या कोणत्या पक्षाला द्याव्यात हे ठरवतो. यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, काश्मीर या राज्यांमधील स्विंगची कथा भाजप आणि विरोधकांसाठी जास्त महत्त्वपूर्ण ठरते. लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत. म्हणजेच …


पुरोगामी राज्यात द्वेषजनक भाषणे…

इंडिया हेट लॅब नावाच्या वॉशिंग्टन स्थित संस्थेच्या अहवालानुसार २०२३ मध्ये मुस्लीम समुदायाच्या विरुद्ध भारतात एकूण ६६८ द्वेषजनक भाषणे देण्यात आली.


नाम गुम जाएगा...!

मतदार याद्यांमधून नावे गायब होण्याच्या तक्रारी आता दर निवडणुकीत नित्याच्या बनल्या आहेत. निवडणूक यंत्रणेकडे स्वतंत्र कर्मचारीवर्ग नसतो; हे मान्य करूनही दोन निवडणुकींच्या मधल्या काळात याद्या सुधारण्याकडे लक्ष देणे, ही अपेक्षा चुकीची म्हणता येणार नाही.


नाव नावापुरते नाही

नुकताच राज्य शासनाने सर्व शासकीय कागदपत्रांमध्ये वडिलांच्या नावासोबत आईचे नाव लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आईचे नुसते नाव लावून काय बदल होणार, असा नकारार्थी सूर न लावता भारतीय आर्थिक-सामाजिक रचनेत स्त्रीच्या योगदानाची कबुली देणारे पाऊल म्हणून त्याकडे पाहायला हवे


Sanjay Raut Full PC : शिंदे साहेब मुख्यमंंत्री नको, हे म्हणणारे पहिले नेते अजित पवार,तटकरे : राऊत

शिंदे मुख्यमंत्री पदी नको त्यांच्या हाताखाली काम करणार नाही ,असं सांगणारे तटकरे, अजित दादा, वळसे पाटील होते. 2019मध्ये आम्हाला शिंदे चालणार नाहीत असं भाजपच्या आताच्या प्रमुख नेत्यांची भुमिका होती. शिंदेंचा वकूब नव्हता.. म्हणून भाजपचा विरोधशिंदे विधिमंडळ नेते म्हणून आम्ही निवडणूक केली आहे त्यामुळे कदाचित ते मुख्यमंत्री होऊ शकतील अशी आमची भुमिका होती. हेही व्हिडिओ पाहा Sunil Tatkare Majha Vision 2024 : मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होती Sunil Tatkare Majha Vision 2024 : मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होती महाविकास आघाडीचे सरकार असताना 2021 साली दिल्लीतल्या भेटीनंतर मुंबईत ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. त्या बैठकीत संजय राऊतांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आल्यापासून उद्धव ठाकरेंच्या मनात या सरकारबद्दल पुनर्विचार सुरू आहे, असा गौप्यस्फोट सुनील तटकरेंनी केला आहे


Uddhav Thackeray Dadar Full Speech : राज ठाकरेंवर निशाणा, मोदींना सुनावलं, उद्धव ठाकरेंचं भाषण

Uddhav Thackeray On Raj Thackeray : वापरा आणि फेकून द्या, भाजपचे हे नवे धोरण आहे. नकली सेना, नकली पुत्र म्हणत आहेत. काही दिवसांनी मोदी नकली आरएसएसही म्हणतील. आज एका वृत्तपत्रात बातमी ही आली आहे, आता भाजपला आरएसएसची गरज नाही. याचा अर्थ आता संघाला धोका आहे. सोळावं वरीस धोक्याचं तसं संघाला शंभर वरीस धोक्याचं होणार असल्याची खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे ह्यांची जाहीर सभा खांडके बिल्डिंग, दादरला पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांचा भाडोत्री असा उल्लेख केला. मोदी आणि शाह यांना निवांत झोप लागो या शुभेच्छा देतो. त्यांना आपण इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला बोलावणार आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला.


VIDEO | खलिस्तान्यांचा भारतात घातपाताचा डाव

Khalistani Assassination In India


घुसखोर बांगलादेशी महिलांना सांगलीतून आधार, रेशन कार्ड

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केलेल्या बांगलादेशी महिलांकडे आधार कार्डसह रेशनकार्डही आढळून आले आहे. विशेष म्हणजे घुसखोरी करून भारतात बेकायदा वास्तव्य केलेल्या महिलांना सांगलीतून दोन्ही कार्डे मिळाली आहेत. वरिष्ठाधिकार्‍यांनी या कृत्याची दखल घेत, चौकशीची व्याप्ती वाढविण्याचे आदेश तपासाधिकार्‍यांना शनिवारी दिले आहेत. कोणत्याही पुराव्याशिवाय नागरिकत्वाची ओळखपत्रे तयार करून देणार्‍या शासकीय अधिकार्‍यांसह एजंटांची साखळी...


स्वप्नाचे घोस्ट फॉरेस्ट

Forest City Malaysia : आपले घर, आपले गाव, आपले शहर या भावनेला राजकीय उद्दिष्टाची जोड देत मलेशियामध्ये ‘फॉरेस्ट सिटी’ या स्वप्नाची पायाभरणी झाली. मूळ उद्दिष्ट राजकीयच असल्याने, हवेचा रोख बदल्यावर ती ‘घोस्ट सिटी’ होऊन गेली.


CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

CRPF Constable recruitment 2023 Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल (टेक्निकल अँड ट्रेड्समन) २०२३ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.


Wardha News : हिंगणघाटच्या हैदराबाद महामार्गवरील उड्डाणपुलावर पडले मोठे भगदाड; राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

Wardha News हिंगणघाट : हिंगणघाट शहरातील हैद्राराबाद महामार्गावरील उड्डाणपुलावर मोठे भगदाड पडल्याचे समोर आले आहे. अवघ्या दोन वर्षाआधी बांधण्यात आलेल्या या पूलाची दुरावस्था झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. शिवाय अवघ्या दोन वर्षांत पूलाची दुरावस्था होत असेल तर नक्कीच यात कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले असावे, परिणामी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेश...


West Bengal: चर्चा भाजपच्या मताधिक्याचीच! 'सीएए'वरून कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न

bangaon lok sabha constituency: बांगलादेश सीमेला लागून असलेल्या या मतदारसंघात भाजपला मताधिक्य किती मिळणार, याचीच चर्चा अधिक आहे.


ग्रेट

समाजाची स्पंदने सर्वाधिक कुणाला वाचता येत असतील तर ती उत्तम कथा लिहिणाऱ्या सूक्ष्म निरीक्षकाला. ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर यांनी समकालाला समोर ठेवून लिहिलेल्या तीन कथांच्या गुच्छापैकी ही पहिली. पुढील दोन कथा क्रमश: प्रसिद्ध करण्यात येतील.


करोना लशीची नवी दहशत

जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम म्हणून गवगवा झालेल्या भारतात, ‘कोव्हिशील्ड’ लशीचे साधारणतः १७५ कोटी डोस देण्यात आले आहेत. या लशीमुळे लाखो भारतीयांचे प्राण वाचले आहेत. त्यामानाने त्याचे जे काही दुष्परिणाम दिसले, ते नगण्य संख्येत होते; त्यामुळे ही लस आपल्या दृष्टीने संजीवनीच म्हणावी लागेल.


Buddha Purnima : गौतम बुद्धांनी का सोडलं घरं, का केला कुटुंबाचा त्याग?

नवी दिल्ली : बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांनी एक दिवस अचानक कुटुंबाचा आणि गृहस्थ जीवनाचा त्याग केला. गृहस्थ आणि कुटुंबाचा त्याग करून ते जंगलाच्या दिशेनं निघून गेले. बोधिवृक्षाखाली बुद्धांनी जवळपास सहा वर्षं तपश्चर्या केली आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यानंतर समाजात अहिंसा, प्रेम, शांती आणि त्याग याचा संदेश त्यांनी दिला आणि समाजातल्या दुष्प्रवृत्तींना दूर करण्याचाही प्रयत्न केला. अत्याचार, भेदभाव, अशांती, अनाचार, अंधविश्वास, तसंच...


Raj Thackeray: राज गर्जना... शिवसेनेकडून राज ठाकरेंच्या कळव्याच्या सभेचा टीझर जारी

Raj Thackeray Kalva Rally: कळव्यात राज ठाकरे यांची सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आज राज ठाकरे सभा घेणार आहेत. यावेळी राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.


Pune PMPML : लोकसभा निवडणुकीत पीएमपीएमएल मालामाल, मतदान प्रक्रियेमध्ये दिलेल्या ९३१ गाड्या

Pune News : पुण्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान पीएमपीएमएलने मोठं उत्पन्न कमावलं आहे. मतदान प्रक्रियेत मतपेट्या नेण्यासाठी ९३१ गाड्या पीएमपीएमएलकडून देण्यात आल्या होत्या. यात PMPML ला मोठा फायदा झाला आहे.


Loksabha Election : संजय राऊत यांची Uncut मुलाखत

Loksabha Election : Uncut


H5N1 Bird Flu Spreading: चिंता वाढली! केरळमध्ये वेगाने पसरतोय बर्ड फ्लू, या राज्यात अलर्ट जारी

H5N1 Bird Flu Spreading: देशातून कोरोनाचे संकट पूर्णपणे मिटले नसताना आता H5N1 फ्लूने डोके वर काढले आहे. केरळमध्ये H5N1 बर्ड फ्लू वेगाने पसरत आहे. केरळमध्ये बदकांमध्ये हा विषाणू आढळल्यानंतर आता उत्तराखंडमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. शास्त्रज्ञाच्या मते एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) विषाणू सर्व प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये पसरू शकतो. केरळात आतापर्यंत तीन हजारांहून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.


विधिसेवा आणि ग्राहकसेवा

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वाचा निवाडा दिला. त्यानुसार ‘ग्राहक संरक्षण कायदा, १९८६, सुधारित २०१९’च्या तरतुदीनुसार वकिली सेवा ग्राहक कक्षेत येत नाही. या निवाड्यातील महत्त्वाच्या तरतुदी लक्षात घेणे आवश्यक आहे.


Nashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्याकडून जोरदार प्रचार केला जात आहे. तर अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांनी देखील जोर लावला आहे. त्यातच आज शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) एबीपी माझाशी बोलताना भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा असल्याचा दावा केला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. समाज आमच्यावर प्रेम करतो. भाजपसह समाजातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, यंदा लढायचे आणि जिंकायचे. विजय निश्चितच आमच्या बादली चिन्हाचा होणार आहे, असा दावा शांतीगिरी महाराजांनी केला आहे.