बातम्या

Trending:


विज्ञानक्षेत्रात ‘ती’ कुठे?

जागतिक स्तरावर संशोधनात स्त्रियांचं प्रमाण ४१ टक्के असल्याचं दर्शवणारा एक नवीन अहवाल समोर आलाय. त्यानुसार सक्रिय संशोधकांमध्ये स्त्रियांचं प्रमाण वाढण्याच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.


Beed Parli Firing : परळीतील गोळीबार, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंचा गोळीबारात मृत्यू

Beed Parli Firing : परळीतील गोळीबार, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बातमी अपडेट होत राहील हे देखील वाचा ब्रेकिंग! पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई! मुंबई, नाशिकमध्ये 33 ठिकाणी छापेमारी, पासपोर्ट अधिकारी आणि दलालांवर गुन्हे दाखल मुंबई : सीबीआयकडून (CBI) मुंबई (Mumbai) आणि नाशिक (Nashik) परिसरात एकूण 33 ठिकाणी छापेमारी (CBI Raid) करण्यात आली आहे. सीबीआयने पासपोर्ट अधिकाऱ्यांवर आणि दलालांवर एकूण बारा गुन्हे दाखल केले आहेत. पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सीबीआयचा दावा असून या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईतील परेल, मालाड परिसरात सीबीआयकडून मोठी छापेमारी करण्यात आली आहे. पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी केल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी करुन त्या बदल्यात काही एजंटच्या माध्यमातून पासपोर्ट अधिकाऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे आल्याचेही सीबीआयने म्हटले आहे. मुंबईसह नाशिक परिसरात सीबीआयने मोठे सर्च ऑपरेशन राबवत संशयास्पद कागदपत्र हस्तगत केली आहेत.


MLA Fund : निधीवाटपावरुन जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप, भाजपकडून सभागृहात गदारोळ

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या निधीवाटपावरुन महायुती सरकारवर गंभीर आरोप, मला आमदार निधी मिळला नाही अशी खंत आव्हाडांनी सभागृहात बोलून दाखवली.


Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7:30 AM :06 जुलै 2024: ABP Majha

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7:30 AM :06 जुलै 2024: ABP Majha मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली ((सुरू होणार)), आजपासून ते १३ जुलैपर्यंत ही रॅली काढणार, १३ तारखेनंतर जरांगे पाटील आपली भूमिका ठरवणार. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांचा आरोप, तर आरोप करणारेच घोडेबाजार करतात, नाना पटोलेंचा पलटवार विश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, सूर्यकुमारच्या कॅचवरून रोहित शर्माची टोलेबाजी दोन वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट...टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग... टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडदरम्यान उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल मुंबई पोलिसांचं विधानभवनातही कौतुक, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि सूर्यकुमार यादवकडून कौतुकाची थाप लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मोदी आणि शिंदेंचे फोटो कशासाठी? विजय वडेट्टीवार आणि सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर..३ ते १० वर्षांची शिक्षा तसंच १ कोटी रुपये दंडाची तरतूद...मंंत्री शंभूराज देसाईंनी मांडलं विधेयक..


KEM Hospital: केईएम रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, रिपोर्टनुसार पेपर प्लेट बनवल्याचा आरोप

Allegation of making paper plate according to the report of KEM hospital patients is rubbish


Zika Virus Advisory: झिका व्हायरसचा धोका वाढतोय? आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना ॲडव्हायझरी जारी

Union Health Ministry Issues Advisory to States in view of Zika virus: महाराष्ट्रातील झिका विषाणूची प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना अॅडव्हायजरी जारी केली आहे. झिका विषाणूच्या संसर्गासाठी गर्भवती महिलांची तपासणी करून आणि झिका पॉझिटिव्ह आलेल्या गर्भवती मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवत राज्यांनी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रुग्णालयांचा परिसर एडिस डासमुक्त ठेवण्यासाठी, निरीक्षण करण्यासाठी...


Aditya Thackeray On Adani : मुंबई गिळायची नाही त्याला आमचा कडाडून विरोध, ठाकरेंचा संताप

Aditya Thackeray On Adani : मुंबई गिळायची नाही त्याला आमचा कडाडून विरोध, ठाकरेंचा संताप


Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाचा ‘जांगडगुत्ता’!

Maharashtra Sadan Delhi : अयोध्येत, जम्मू-काश्मीरमध्ये सरकारने नवी महाराष्ट्र सदने सदने जरूर बांधावीत. पण आधी राजधानीतल्या दोन्ही सदनांतील प्रशासकीय अनास्थेचा, गडबड-गोंधळाचा ‘जांगडगुत्ता’ सोडवावा. ती इच्छाशक्ती राज्य सरकार कधी दाखवणार?


Pune Police Attack News : महिला पोलिसावर जीवघेणा हल्ला; स्वत: सांगितला थरार Exclusive

Pune Police Attack News : महिला पोलिसावर जीवघेणा हल्ला; स्वत: सांगितला थरार Exclusive विद्येचं माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात (Pune News) नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न आता संपूर्ण राज्याला पडलाय. पुण्यात घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra News) पुन्हा एकदा हादरला आहे. पुण्यात महिला वाहतूक पोलीस (Traffic Police) अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल (Petrol) ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर येत आहे. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. या घटनेनं संपूर्ण पुणेच नव्हेतर अवघा महाराष्ट्र पुरता हादरून गेला आहे. फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर काल (शुक्रवारी) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू होती. ही कारवाई सुरू असताना महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न एका वाहनचालकाना केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती मिळत आहे. आरोपी संजय फकिरा साळवे (राहणार : पिंपरी चिंचवड (मूळगाव- जालना)) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीनं दारू पिऊन हे धक्कादायक कृत्य केलं असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


पुण्यात पोलीस भरतीवेळी २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

संगमनेर येथील २७ वर्षीय तुषार बबन भालके हा तरुण शिवाजीनगर येथील पोलिस ग्राऊंडवर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आला होता.


Ravikant Tupkar | तुपकर काय भूमिका घेणार?

Ravikant Tupkar Today decide political decision


IRCTC Shirdi Packages: चला शिर्डी साईबाबाच्या दर्शनाला, आयआरसीटीसीच्या खास पॅकेजमध्ये त्र्यंबकेश्वरलाही भेट देता येणार

IRCTC Shirdi Special Packages: शिर्डीला जाण्याची इच्छा असलेल्या भाविकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण आयआरसीटीसीने तुमच्यासाठी एक खास पॅकेज लॉन्च केले आहे.या पॅकेजमध्ये तुम्हाला शिर्डीसोबतच त्र्यंबकेश्वरलाही भेट देता येणार आहे.


Mhada Lottery 2024 : म्हाडा सोडतीतील घरांची किंमत 1,00,00,000; एरिया किती मिळतोय पाहिलं?

Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या सोडतीमध्ये सहभागी होऊ पाहणाऱ्यांसाठीची महत्त्वाची घोषणा काही दिवसांमध्येच होणार असून, आता यामध्ये कोणाच्या नशीबी हक्काच्या घराच्या चाव्या येतता हे पाहणं महत्त्वाचं असेल...


Bullet Train Route Video: बोगदे, नद्या अन् पूल; पाहा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लाईनचा थक्क करणारा व्हिडिओ

Ahmedabad-Mumbai Bullet Train Route Video: बुलेट ट्रेनने अहमदाबाद ते मुंबई दरम्यानचा प्रवास 2 तास 7 मिनिटांत पूर्ण होईल. सध्या या दोन शहरांमधील प्रवासासाठी बसने 9 तास आणि ट्रेनने 6 तास लागतात. बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जातो. याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.


Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : 'शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील, मात्र...'; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल

Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) शांतता रॅलीला आज हिंगोलीतून (Hingoli) सकाळी साडेअकरा वाजता सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोलीत जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अंतरवाली सराटीतून हिंगोलीकडे रवाना होण्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शांतता रॅली...


अजितदादांच्या जुन्या सहकाऱ्याला विधानसभेची इच्छा, दत्तामामांसमोर दुहेरी संकट

इंदापूर विधानसभा मतदारसंघ.. बारामती इतकीच या मतदारसंघावर अजित पवारांचीही पकड आहे. अजितदादा ठरवतील तोच उमेदवार आणि आमदार.. असं समीकरण मागील दोन निवडणुकीत दुसून आलं.. राष्ट्रवादीतील घडामोडीनंतर दत्ता मामांनी अजितदादांचं पारडं जड केल्यानंतर इंदापुरात बदल घडवण्यासाठी शरद पवारांनी प्रयत्न सुरू केलेत. तर राष्ट्रवादीतही आमदारकीसाठी रस्सीखेच पाहायला मिळतेय. अजितदादांच्या सहकाऱ्याने दत्ता मामांच्या जागेवर कसा दावा केलाय, आणि लोकसभेला इंदापुरात लीड न देऊ शकलेल्या दत्ता मामांना पुन्हा तिकीट मिळणार का, तेच सविस्तर पाहू.


चंद्रमौळी

डोक्यावर चंद्र धारण करणारा, अशा अर्थाने या दोन्ही ठिकाणी ‘चंद्रमौळी’ असा शब्द वापरला जातो. गरिबी असली, अगदी छतही नीट शाकारलेले नसले, तरी घरामध्ये चंद्र उतरणे ही बाब साहित्यिकांनी शब्दबद्ध केली.


Five Drown In Bhushi Dam: भुशी धरणावर पर्यटनासाठी गेलेले 5 जण गेले वाहून, दोघांचे मृतदेह सापडले; तिघांचा शोध सुरू

Five People Of Same Family Were Drown In Bhushi Dam: लोणावळ्यात वर्षा पर्यटनासाठी गेलेले 5 जण भुशी धरणाच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. भुशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या जंगलातील वॉटर फॉलमध्ये हे पर्यटक वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. यात लहान मुले, महिलांचा समावेश आहे. शोधकार्य सुरू असल्याच माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


Bombay High Court Bharti 2024: मुंबई उच्च न्यायलयाअंतर्गत नोकरीची संधी; या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Bombay High Court Recruitment : नोकरी शोधताय? मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये महाव्यवस्थापक या पदांची जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करण्याचा ९ जुलै हा शेवटचा दिवस आहे.


ECHS Recruitment 2024: ईसीएचएसअंतर्गत ८वी पास ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरी; ७५,००० रुपये पगार

ECHS Recruitment 2024 Applications: तुम्ही आठवी पास असाल आणि सरकी नोकरीच्या शोधात असाल तर हि संधी वाया जाऊ देऊ नका. माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना म्हणजेच ईसीएचएस अंतर्गत ८ वी पास, १० वी पास, १२ वी पास आणि पदवीधर उमेदवारांची रिक्त पदांवर नियुक्त करण्यासाठी भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या जागांसाठी १५ जुलैपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.


बिहारची ‘अफसर बिटिया’

टिनू सिंगने २०२३ च्या मध्यंतरीच्या काळात लागोपाठ कॉम्प्युटर ऑपरेटर, सहाय्यक शाखा अधिकारी, बीपीएससी शिक्षक भरतीमधील तीन वेगवेगळ्या अशा एकूण पाच परीक्षा दिल्या होत्या. या सर्व परीक्षांचा निकाल डिसेंबर २०२३ मध्ये सलग पाच दिवस लागणार होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे टिनूच्या मेहनतीला यश आले आणि तिने ज्या पाच परीक्षा दिल्या होत्या त्या सर्व परीक्षांमध्ये ती अव्वल क्रमांकाने पास झाली. टिनूच्या या यशाने जमुई जिल्हाच नाही तर बिहारमध्ये ती चर्चेचा विषय...


Alandi Dnyaneshwar Maharaj Palkhi : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान;देवाची आळंदी नादावली

Alandi Dnyaneshwar Maharaj Palkhi : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान;देवाची आळंदी नादावली अलंकापुरीत वारकरी दाखल झाला की आधी इंद्रायणी काठ गाठतो. आज तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. त्यामुळं याच इंद्रायणी काठी आज वारकऱ्यांची मांदियाळी पहायला मिळत आहे. वारकऱ्यांनी हे इंद्रायणी काठ कसं फुलून गेलंय आणि याप्रसंगी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने ही कशी खबरदारी घेतली आहे सुरक्षेच्या कारणास्तव NDRFचं पथक आळंदीत दाखल, कोणताही अनुचीत प्रकार घडूनये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी.संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज संध्याकाळी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार, आळंदीत वारकऱ्यांची मोठी गर्दी, विठू नामाच्या गजरात वारकऱ्यांचा उत्साह . अलंकापुरीत वारकरी दाखल झाला की आधी इंद्रायणी काठ गाठतो. आज तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. त्यामुळं याच इंद्रायणी काठी आज वारकऱ्यांची मांदियाळी पहायला मिळत आहे. वारकऱ्यांनी हे इंद्रायणी काठ कसं फुलून गेलंय आणि याप्रसंगी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने ही कशी खबरदारी घेतली आहे


Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींची टीका, मोदींता करारा जवाब

नवी दिल्ली : काही लोकांनी निवडणुकीच्या वेळी सर्व मार्गांचा अवलंब केला, पण त्यामध्ये त्यांना यश आलं नाही, काही लोकांच्या वेदना मी समजू शकतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधकांना टोला लगावला. खोटं पसरवूनही विरोधकांचा पराभव झाल्याचं ते म्हणाले. आपल्या कार्यकाळात देशातील 25 कोटी जनता गरिबीच्या बाहेर आली असं नरेंद्र मोदी म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देण्यास सुरूवात करताच लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी सभासदांना समज दिली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा खासदार झालेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केलं. तसेच जनतेने तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी देशवासियांचे आभार मानले.


Mumbai : मुंबईत आज महायुतीचा मेळावा

Mumbai : Todays Mumbai Mahayuti meeting


Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha