LPG PRICE : खुशखबर! 1 जुलैपासून LPG CYLINDER झाले स्वस्त, चेक करा दर

मुंबई : दर महिन्याच्या सुरुवातील गॅस सिलिंडरच्या दरात बदल होत असतात. 1 जुलै रोजी वाढत्या महागाईत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर जुलै महिन्यात तरी स्वस्त झाले असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे दिलासा मिळणार आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 30 रुपयांनी कपात केली आहे. 19 किलोग्रॅमच्या कर्मशियल गॅस सिलिंडर ३०-३१ रुपयांनी स्वस्त झाला आहे.

1 जुलैपासून हा बदल करण्यात आला आहे. याचा फायदा हॉटेल इंडस्ट्री आणि छोट्या व्यावसायिकांना होणार आहे. मात्र, घरगुती सिलिंडरऐवजी व्यावसायिक सिलिंडरवर दिलासा देण्यात आला आहे. याचा अर्थ रेस्टॉरंट मालक आणि ढाबा मालकांना या कपातीचा फायदा होईल. व्यावसायिक एलपीजी वापरतात त्यांना आतापासून 30 रुपयांचा स्वस्त सिलिंडर मिळणार आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही.

1 जुलै 2024 पासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 30-31 रुपयांनी कमी झाली. या सिलिंडरची किंमत दिल्लीत ३० रुपयांनी तर कोलकाता, चेन्नई आणि मुंबईत 31 रुपयांनी कमी झाली आहे. या कपातीनंतर दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर 1676 रुपयांऐवजी 1646 रुपयांना मिळणार

कोलकात्यात 1756 रुपयांना, चेन्नईमध्ये 1809.50 रुपयांना आणि मुंबईत 1598 रुपयांना मिळेल. त्याचप्रमाणे, पाटण्यात 1915.5 रुपये आणि अहमदाबादमध्ये 1665 रुपयांना व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध होईल. जर आपण 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरबद्दल बोललो तर ते दिल्लीमध्ये 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईमध्ये 802 रुपये आणि चेन्नईमध्ये 818 रुपयांना उपलब्ध आहे. लवकरच महागड्या गॅस सिलिंडरपासून काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा सर्वसामान्यांना आहे.

2024-07-01T02:52:16Z dg43tfdfdgfd