LANDSLIDES : नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलन आणि पुरामुळे १४ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये भूस्खलन आणि पुरामुळे १४ जणांचा मृत्यू झाला असून डझनहून अधिक जण जखमी झाले आहेत. हिमालय पर्यत रांगात वसलेल्या या देशात सध्या सुरू असलेल्या मुसळधार मान्सूनमुळे मृत्यूचे प्रमाण कमालीचे वाढले असून गेल्या २४ तासांत १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

नेपाळच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीआरएमए) दिलेल्या माहितीनुसार, भूस्खलनात १४ पैकी ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर वीज पडून पाच जणांचा आणि पुरामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.

२६ जून २०२४ रोजी एकूण ४४  घटनांची नोंद झाली. या घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात भूस्खलनामुळे ८, वीज कोसळून ५आणि पुरामुळे एक जणांचा मृत्यू झाला आहे. भूस्खलनाच्या घटनेत दोन जण अद्याप बेपत्ता आहेत, तर १० जण जखमी झाले आहेत, अशी माहिती एनडीआरएमएचे प्रवक्ते दिजान भट्टराई यांनी दिली.

आसाममध्ये हैदराबाद घटनेची पुनरावृत्ती..! सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी घातल्या गोळ्या

बुधवारी सर्वाधिक मृत्यू लामजुंगमध्ये झालेल्या भूस्खलनात पाच, कास्कीमध्ये दोन आणि ओखलधुंगा येथे एकाचा मृत्यू झाला, तर पुराच्या घटनेत गृह मंत्रालयाने एका मृत्यूची नोंद केली आहे.

नेपाळच्या गृह मंत्रालयाच्या नोंदीनुसार, मान्सून सक्रिय झाल्यापासून गेल्या १७ दिवसांत (२६ जून २०२४ पर्यंत) एकूण २८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मान्सूनमुळे ३३ जिल्हे बाधित झाले असून १७ दिवसांत एकूण १४७ घटनांची नोंद झाली आहे.

Asaduddin Owaisi : शपथ घेतल्यानंतर ओवैसींचा ‘जय भीम’, ‘जय मीम’सोबत 'जय पॅलेस्टाईन'चा नारा, संसदेत गोंधळ

गेल्या १७ दिवसांत वीज कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दरड कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमध्ये यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला असून अतिवृष्टीमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देशात अधिक आहे.

देशातील ‘या’ राज्याचे नाव बदलणार! विधानसभेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर, अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवणार

नेपाळमध्ये १३ जूनपासून मान्सून अधिकृतरित्या जमा होईल आणि सुमारे तीन महिने सक्रिय राहील, अशी नेपाळची अपेक्षा आहे. कालांतराने, सरकारने अंदाज व्यक्त केला आहे की हंगामात पावसाशी संबंधित घटनांमुळे तब्बल १.८ दशलक्ष लोक प्रभावित होऊ शकतात.

नेपाळमध्ये दरवर्षी हजारो लोकांना पुराचा फटका बसतो, तर भूस्खलन आणि मालमत्तेचे नुकसान होऊन शेकडो लोक विस्थापित होतात.

2024-06-26T19:26:56Z dg43tfdfdgfd