ABP MAJHA IMPACT : जेवणासाठी 25 मिनिटे मतदान थांबवलं, यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांना नोटिस जारी

ABP Majha Impact : यवतमाळमधील हिवरी मतदान केंद्रात (Yavatmal Hiwari Polling Station) जेवणासाठी 25 मिनिटे मतदान प्रक्रिया बंद ठेवण्यात आल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना नोटिस बजावली असून त्यावर खुलासा करण्यास सांगितलं आहे. हिवरी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी दुपारी जेवणासाठी मतदान प्रक्रिया बंद करून मतदारांना बाहेर ताटकळत ठेवलं होतं. 'एबीपी माझा'ने त्यावर वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिस बजावली होती.  

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील हिवरी येथे मतदान केंद्रावर मतदानाच्या वेळेत कर्मचारी हे मतदान केंद्राच्या आतच भोजनासाठी बसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मतदान प्रक्रिया थांबवून त्यांनी जेवण केलं होतं. या प्रकरणी तक्रार दाखल झाली होती. 

या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचारी यांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. 

2024-04-26T16:18:02Z dg43tfdfdgfd