NAGPUR NEWS : वडेट्टीवार यांच्याविरुद्ध भाजपाची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस विधानसभा विरोधी पक्षनेते, विजय वडेट्टीवार यांनी देशद्रोही आणि पाकिस्तान समर्थनार्थ केलेले वक्तव्य आणि निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाविषयी चौकशी करुन, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबतची मागणी करणारे पत्र, भारतीय जनता पार्टीने आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले. मुंबई सोबतच नागपुरातील सीताबर्डी पोलीस स्टेशनला या घटनेबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Nagpur News)

वडेट्टीवार यांनी, आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना दहशतवा‌द्याने गोळ्या घातल्या नाहीत. तर आरएसएस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने ते कृत्य केल्याचा निराधार दावा करून मतदारांची दिशाभूल करुन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. वडेट्टीवार यांनी करकरे यांच्या मृत्युमागे भारतीय जनता पक्षाचे, मुंबईतील उमेदवार उज्ज्वल निकम यांना दोषी ठरवून त्यांची आणि पक्षाची बदनामी केली असे या पत्रात म्हटले आहे. याविषयींची सर्व कागदपत्रे तक्रारीसोबत जोडण्यात आली आहेत.

भाजपाच्या विधी आघाड़ीने आज सीताबर्डी पोलिस स्टेशन, राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वडेट्टीवार यांच्या आरोपांमध्ये पुराव्यांचा अभाव तर आहेच पण राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या प्रतिष्ठेला कलंकीत करण्यासाठी ते राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचेही दिसते. सीताबर्डी पोलीस स्टेशन, नागपूर येथे विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध भाजपा विधी आघाडी नागपूरतर्फे,विधी आघाडी नागपूर महानगरचे अध्यक्ष ॲड परीक्षीत मोहिते यांनी तक्रार नोंदवली. सोबत महामंत्री ॲड संकेत यादव, ॲड अमोल कावरे, ॲड अमोल बोरकर तर प्रसिद्धी प्रमुख ॲड स्वप्निल डुबेवार, संपर्कप्रमुख ॲड विश्वनाथ राठोड, उपाध्यक्षॲड शशांक चौबे उपस्थित होते. (Nagpur News)

हेही वाचा :

2024-05-07T03:56:39Z dg43tfdfdgfd