व्हिडिओ

Trending:


Pune Hit And Run Case: गुन्हाच्या तपासासाठी पोलिसांकडून रिक्रिएशन

Pune Hit And Run Case: Recreation by police to investigate the crime


नेमके चुकतेय कोणाचे?

शहरात गेल्या आठवड्यात पूर्वमोसमी किंवा वळवाचा पाऊस झाला आणि अनेक नव्या ठिकाणी पाणी साचले, काही ठिकाणी ते नागरिकांच्या घरातही शिरले. पुणे महानगरपालिकेने नेहमीप्रमाणे नालेसफाईपासून पावसाळापूर्व कामे पूर्ण केल्याचा दावा केला आहे. ही कामे पूर्ण झाली असती, तर शहरावर ही परिस्थिती उद्भवली नसती. मग, नेमके चुकतेय कोणाचे? यंत्रणांचे की पावसाचे?


Jalgaon | जळगावच्या शासकीय रुग्णालयात वीजपुरवठा खंडीत, टॉर्च लावून रुग्णांवर उपचार

Jalgaon government hospital power supply interrupted


IRCTC Kashmir Package: बायकोला दाखवा पृथ्वीवरील स्वर्ग, 6 दिवसांच्या पॅकेजमध्ये पत्नीसोबत फिरा काश्मीर

Travel Kashmir With IRCTC Tour Package: काश्मीरला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आता तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. IRCTC ने काश्मीर संदर्भात एक अप्रतिम पॅकेज आणले आहे. काश्मीरच्या या खास पॅकेजमध्ये तुम्हाला काश्मीरमधील सुंदर हिल स्टेशन्स पाहायला मिळणार आहेत. या पॅकेजमध्ये तुम्ही ज्या हिल स्टेशन्सचा समावेश कराल त्यात गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगर, सोनमर्ग यांचा समावेश आहे.


Dombivli MIDC Blast News: स्फोटानंतर भरत जयस्वाल बेपत्ता;पोलिसांकडून नातेवाईकांवर अरेरावी ABP Majha

Dombivili MIDC Blast News: स्फोटानंतर भरत जयस्वाल बेपत्ता;पोलिसांकडून नातेवाईकांवर अरेरावी ABP Majha डोंबिवली येथे झालेल्या औद्योगिक स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू झाला मात्र अजूनही सहा जणांची ओळख पटली नसून काही जणांचे तर केवळ अवशेष सापडल्याने नातेवाईकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कारण दोन कामगारांचे नातेवाईक गेल्या तीन दिवसांपासून या कंपनीच्या शेजारीच दिवसरात्र वाट बघतायत. दुर्दैवाची बाब म्हणजे या नातेवाईकांना अतिशय संवेदनशीलपणे हाताळण्याच्या ऐवजी पोलिसांकडून काठीचे फटके खावे लागत आहेत.पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम आणि त्यांची टीम प्रसारमाध्यमांशी देखील अशाच प्रकारे वागणूक करताना दिसतायत. या स्फोटात भरत जयस्वाल बेपत्ता झालेत. भरत जयस्वाल पंधरा दिवसांपूर्वीच अनुदान कंपनीत कामाला लागले होते, परवा झालेल्या स्फोटानंतर ते अजूनही सापडले नाहीत असा दावा त्यांच्या भावाने केला आहे.


Ghatkopar Hoarding Collapsed । घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी Bhavesh Bhinde कोर्टात हजार करणार

Ghatkopar Hoarding Collapsed. Ghatkopar hoarding incident accused Bhavesh Bhinde will pay thousand in court


अंतर्बाह्य भारतीय!

प्रसिद्ध लेखक रस्किन बाँड यांना नुकतीच साहित्य अकादमीची फेलोशिप मिळाली. एका ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्याचा हा मुलगा. भारतात जन्मलेल्या आणि वयाच्या ९०व्या वर्षीही लिहित्या असलेल्या अंतर्बाह्य भारतीय लेखकाच्या कारकीर्दीचा हा आढावा...


Gujarat Game Zone Rajkot Fire : गुजरातच्या राजकोटमध्ये गेम झोनला आग, 30 जणांचा होरपळून मृत्यू

Gujarat Game Zone Rajkot Fire : गुजरातच्या राजकोटमध्ये गेम झोनला आग, 30 जणांचा होरपळून मृत्यू Rajkot TRP Game Zone Fire Update: नवी दिल्ली : गुजरातच्या (Gujrat) राजकोटमध्ये (Rajkot) शनिवारी (25 मे 2024) टीआरपी गेम झोनमध्ये भीषण आग लागली. या आगीत 32 लोकांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. राजकोटमधील गेम झोन हे गर्दीचं ठिकाण असल्यानं आग लागली त्यावेळी गर्दी होती. त्यामुळे अनेकजण होरपळल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या दुर्घटना प्रकरणी एसआयटी नेमली जाणार असून चौकशी केली जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून यासंदर्भात माहिती दिली. या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.


“भाजपाने गडकरींच्या पराभवासाठी…”, राऊतांनंतर अनिल देशमुखांचा मोठा दावा; फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले…

अनिल देशमुख म्हणाले, संपूर्ण नागपूरला माहिती आहे की नितीन गडकरी यांना पराभूत करण्यासाठी त्यांच्याच पक्षातील लोकांनी काम केलं आहे.


Shirdi Lok Sabha:शिर्डी लोकसभा मतदारसंघात वंचित फॅक्टर ठरणार गेमचेंजर? स्थानिक पत्रकार काय म्हणतात?

Shirdi News: शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून खासदार सदाशिव लोखंडे तर मविआकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे वंचितनेही तगडा उमेदवार दिला आहे.


मटा रिपोर्ताज : मृत्यूचा निबंध

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या दुर्घटनेने समाजमन ढवळून निघाले आहे. वयाची अठरा वर्षेही पूर्ण न केलेल्या मुलाने मद्याचे प्याले रिचवून, त्याच नशेत कोट्यवधींची गाडी चालवून दोघांचा जीव घेतला. त्यानंतर जे काही झाले त्याने आपल्या अनेक यंत्रणांच्या सचोटीवर नि कार्यक्षमेतवर उभी राहिली मुबलक प्रश्नचिन्हे. ही अशी प्रश्नचिन्हे किती काळ उभी राहणार? मृत्यूचे हे असे निबंध किती काळ वाचावे लागणार?


Surendra Agarwal Special Report : कार अपघात प्रकरणात सुरेंद्र अगरवालला अटक का?

Surendra Agarwal Special Report : कार अपघात प्रकरणात सुरेंद्र अगरवालला अटक का? Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल याला 28 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. चालकाला डांबून ठेवणं, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. तसेच सीसीटीव्हीशी छेडछाड केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. आता पुणे सत्र न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. जेव्हा अपघात घडला त्यावेळी सुरेंद्र अगरवाल याने त्याच्या नातवाला वाचवण्याचा प्रयत्न केला. गाडी तू चालवत असल्याचं पोलिसांना सांग असं त्याने ड्रायव्हर गंगाराम पुजारी याला सांगितलं. तसेच सुरेंद्र अगरवाल याने ड्रायव्हरला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. या आधी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल यांची एकत्रित चौकशी करायची आहे, त्यामुळे सुरेंद्र अगरवालला पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली होती.


Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 25 May 2024

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 25 May 2024 विधान परिषदेसाठी ठाकरे गटाकडून दोन उमेदवारांची घोषणा, मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब, तर शिक्षक मतदारसंघातून ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर. ही शिवसैनिकांची शिवसेना, पक्षाची पकड अतिशय घट्ट आहे, विजयी होणार आणि पुन्हा एकदा विधान परिषदेत जाणार, अनिल परबांना विश्वास. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीकडून निरंजन डावखरे, तर मुंबईसाठी दीपक सावंत यांना संधी मिळण्याची शक्यता, शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावाबाबत महायुतीमध्ये चर्चा सुरु, दोन दिवसांत अंतिम निर्णय होणार. येत्या सोमवारी एसएससी बोर्डाचा निकाल, २७ मे रोजी दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर होईल, बोर्डाच्या वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयं, स्वायत्त महाविद्यालयं आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीला आजपासून सुरुवात, १३ जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार. मुंबई महानगर परिसरातील १ हजारांहून अधिक महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यास सुरुवात, काल पहिल्याच दिवशी तब्बल २१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांकडून पहिल्या भागातील अर्ज दाखल, एकूण दोन भागांत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरावे लागणार. बारावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी सोमवारपासून अर्ज करता येणार, २७ मे ते ७ जून दरम्यान नियमित शुल्कासह अर्ज करता येईल, जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा होणार.


नाम गुम जाएगा...!

मतदार याद्यांमधून नावे गायब होण्याच्या तक्रारी आता दर निवडणुकीत नित्याच्या बनल्या आहेत. निवडणूक यंत्रणेकडे स्वतंत्र कर्मचारीवर्ग नसतो; हे मान्य करूनही दोन निवडणुकींच्या मधल्या काळात याद्या सुधारण्याकडे लक्ष देणे, ही अपेक्षा चुकीची म्हणता येणार नाही.


Tadoba Tiger : प्राण्यांच्या जंगलात माणसांची गर्दी; वाघाला घेरलं पर्यटकांनी

भारतातील वाघांची घटती संख्या, वाघांच्या अस्तित्त्वाला धोका निर्माण झाल्याची जाणीव झाल्यानंतर देशात व्याघ्र संरक्षणासाठी प्रयत्न सुरू झाले. वाघांची शिकार, वाघांच्या कातडीच्या विक्रीवरही बंदी आली. त्यानंतर वाघांच्या संवर्धनाचा विचार होऊन व्याघ्र प्रकल्पाचा विशेष दर्जा निर्माण झाला. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील दुसरा व्याघ्र प्रकल्प आहे. संरक्षित क्षेत्रात वाघांसाठी असलेला उत्कृष्ट अधिवास, खाद्य आणि पाण्याची उपलब्धता आणि तेथील वाघांची संख्या लक्षात घेऊन 23 फेब्रुवारी 1995 रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली. बुद्ध पौर्मिणेच्या रात्री चंद्राच्या लख्खं प्रकाशात ताडोबा प्रकल्पातील वाघांची गणना झाली. कोअर झोनमध्ये 29 आणि बफर झोनमध्ये 26 असे एकूण 55 वाघ आढळून आले आहेत. पण इथं पर्यटकांची संख्या इतकी वाढली आहे की वाघांसाठी संरक्षित केलेल्या या क्षेत्रात माणसांनीच घुसखोरी केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी (25 मे 2024) कोअर झोनमध्ये जिप्सीतून पर्यटकांनी गर्दी केली. गाड्यांनी चारही बाजूनं वाघाला घेरलं. मोहर्ली ते खटोडा रस्त्यावरील हे दृश्य आहे. वाघाला कोणत्याच दिशेनं बाहेर पडता येईना. सुदैवाने वाघ संतप्त झाला नाही नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती. माहितीनुसार इथं जिप्सींना एकाच रांगेत चालण्याची परवानगी आहे. असं असताना जिप्सीनं दोन्ही बाजूनं रस्ता अडवला.


अर्थकारण : परदेशस्थांचा आर्थिक आधार

गेल्या काही वर्षांत भारतातून शिक्षण, रोजगार आदी कारणांमुळे परदेशात स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्याचबरोबर परदेशातून मायदेशी येणारा पैशाचा ओघही वाढतो आहे. यातील मोठा वाटा आखाती देशातून येतो आणि तेथे भारतीय उत्पादन, ठोक, सुरक्षा, वाहतूक तसेच निम्नकुशल उद्योगांत काम करतात. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या जागतिक स्थलांतर अहवाल-2024 ने जारी केलेले आकडे संशोधकांना, धोरणकर्त्यांना, एवढेच …


बहार विशेष : मैत्रीचे डावे वळण

युक्रेन युद्धानंतरच्या काळात रशिया आणि चीन या अमेरिकेच्या दोन शत्रूंमधील संबंध कमालीचे घनिष्ट होत गेले. रशिया-चीन मैत्रीचा पाया अमेरिकाविरोधावर आधारलेला आहेच; पण त्याचबरोबरीने बदलत्या काळात या देशांचे आर्थिक परस्परावलंबित्वही वाढत चालले असून, मैत्री ही त्यांची गरज बनली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या अलीकडेच पार पडलेल्या चीन दौर्‍याकडे पाहावे लागेल. शीतयुद्धोत्तर काळात …


सहाव्या टप्प्यात 59 टक्के मतदान

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात 8 राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशात (जम्मू आणि काश्मीर) मिळून सरासरी 58.82 टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वात जास्त 78.79 टक्के मतदान पश्चिम बंगाल येथे, तर सर्वात कमी 51.41 टक्के मतदान जम्मू-काश्मीरमध्ये झाले. दरम्यान, पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात त्रिपुरामध्ये सर्वाधिक, तर …


Pune Porsche Car Accident : बारावीला 60 टक्क्यांचा बार उडवल्यानंतर बारमध्ये दीड तासात 48 हजारांचा खूर्दा

पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात रोज (Pune Porsche Car Accident) नवनवे खुलासे समोर येत आहे. बिल्डर मुलासह त्याचे वडिल आणि आजोबाला अटक करण्यात आली आहे. त्यातच आता पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलाने एका पार्टीचं बिल 48 हजार रुपये दिल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता बारावीला 60 टक्के मिळाले म्हणून या पार्टीचं नियोजन करण्यात आलं होतं. साधारण 20-25 जणांना सोबत घेऊन ही पार्टी केली आणि काही तासात चक्क 48 हजार उडवल्याचं समोर आलं...


म्हणा…

समाजाची स्पंदने सर्वाधिक कुणाला वाचता येत असतील तर उत्तम कथालेखकाला. सूक्ष्म निरीक्षणशक्ती असलेले आणि लिखाणात विविध प्रयोग करणारे ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर यांनी समकालाला समोर ठेवून लिहिलेल्या तीन कथांच्या गुच्छापैकी ही दुसरी कथा.


पडझडीचा नवा अंक

रीडर्स डायजेस्ट बंद पडण्याचे जाहीर झाल्यावर ब्रिटनमध्येही अनेकांना धक्का बसला. आठवणींचे कढ आले. आपले समाजजीवन दरिद्री होण्यातली ही एक पायरी आहे, हे अनेकांनी जाणले. ‘द गार्डियन’ने ही लोकभावना ओळखली आणि वाचकांना ‘तुमच्या रीडर्स डायजेस्ट’च्या आठवणी कळवा, असे आवाहन केले. मग पाऊस पडू लागला. ८६ वर्षांच्या नात्याला ब्रिटिश वाचक सध्या असा निरोप देत आहेत.


TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 May 2024 : ABP Majha

TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 May 2024 : ABP Majha गुजरातच्या राजकोटमधल्या गेमझोनमध्ये आगीचं तांडव..३० जणांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये १२ लहान मुलांचा समावेश... पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात आरोपीच्या वडील आणि आजोबांकडून ड्रायव्हरला गोवण्याचा प्रयत्न... सुरेंद्र अगरवालला २८ मेपर्यंत पोलिस कोठडी...विशाल अगरवालची अडचण वाढली... पुणे अपघाताच्या दुसऱ्या दिवशी सुरेंद्र अगरवाल यांचं ड्रायव्हरसोबत चॅटिंग.. सुरेंद्र अगरवाल यांच्याकडून ड्रायव्हरला पैशांचे आमिष, गुन्हे शाखेच्या तपासात उघड डोंबिवली स्फोटात आतापर्यंत तीन कंपन्यांमधून १२ कामगार बेपत्ता, तर मृतांची संख्या दहावर, अद्याप ७ मृतदेहांची ओळख पटवणं बाकी. मालेगावमधील कंधाने रोडवरील पेट्रोल पंपावर गोळीबार... दोन हल्लेखोरांकडून पैशांची मागणी.. कामगाराचा मोबाईल हिसकावून चोरट्यांचा पोबारा राज्यातल्या अनेक भागात दुष्काळाचं संकट गहिरं...मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण...तर धुळ्यात ८ ते ९ दिवसांनी पाणीपुरवठा.. नागरिकांचे प्रचंड हाल बंगालच्या उपसागरात 'रेमल' चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज... पश्चिम बंगालसह ओडीशामध्ये एनडीआरएफच्या १२ तुकड्या तैनात