शिवाजीराव जोंधळे यांचं निधन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील शिक्षणसम्राट म्हणून ख्याती असलेले कै.स.ह.जोंधळे शिक्षण समूहाचे शिवाजीराव जोंधळे यांचे शुक्रवारी (दि.१९)  दिर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून एका दीर्घ आजाराशी ते झुंज देत होते. मुंबईत ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आज (शुक्रवारी) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी १० वाजता डोंबिवली येथे त्यांच्या शिवनेरी बंगल्यावर अंतिम दर्शन करिता त्यांचे पार्थिव ठेवले जाणार असून अंत्यसंस्कार डोंबिवलीत होणार असल्याचे त्यांचे ज्येष्ठ पुत्र सागर जोंधळे यांनी सांगितले आहे.

2024-04-20T03:09:01Z dg43tfdfdgfd