व्हॉट्सअ‍ॅपवर प्रफुल्ल पटेलांचा डीपी लावून कतारच्या राजघराण्याच्या फसवणूकीचा कट

Ncp Leader Praful Patel: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नावे बनावट व्हॉट्सअॅप अकाउंट बनवून कतारमधील राजघराण्याची फसवणूक करणाऱ्या एका व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. राहुल कांत असं आरोपीचे नाव असून तो व्यावसायिक आहे. मुंबईतील जुहू येथून त्याला अटक करण्यात आली आहे. 

राजघराण टार्गेट

आरोपी राहुल कांत याने स्वतः प्रफुल्ल पटेल असल्याचे भासवून व्हॉट्सअॅपवर त्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअॅप खाते बनवून कतारच्या राज घराण्याकडे पैशांची मागणी केली होती. आईला कर्करोग आहे आणि तिच्या उपचारांसाठी पैशांची गरज आहे असे सांगण्यात आले होते. एका अॅपच्या मदतीने राहुल यांने तो प्रफुल्ल पटेल आहे असा बनाव केला होता. आरोपीचे कतारच्या राज घरण्याकडून पैशांची मागणी केली होती. 

प्रफुल्ल पटेल यांच्या नावाने मेसेज येताच कतारच्या राज घराण्याने लगेचच पटेल यांना माहिती दिली होती. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी सायबरमध्ये तक्रार नोंदवली होती. त्यानंतर महाराष्ट्र सायबरने चौकशी सुरू केली होती. 23 जुलै रोजी हा प्रकार घडला होता. आरोपीला झटपट पैसे कमवायचे होते त्यामुळं त्याने हा मार्ग निवडला असल्याचे तपासात समोर आले आहे. 

अन् कट उधळला गेला

दरम्यान, आरोपी राहुल कांत याने एका अॅपच्या मदतीने प्रफुल्ल पटेल यांचा मोबाइल नंबर शोधून काढला होता. त्यानंतर त्यांचा फोटो व नाव वापरून बनावट व्हॉट्सअॅप अकाउंट तयार करण्यात आले होते. व्हॉट्सअॅप अकाउंटवरुन कतारच्या राजघराण्याबरोबरच विदेशातील अन्य व्यक्तींनाही टार्गेट करण्यात आले होते. मात्र, कतारच्या राजघराण्याने तात्काळ प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधला त्यामुळं हा कट उधळकीस आला आहे. 

ओम बिर्ला यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट

ओम बिर्ला यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. त्याविरोधात महाराष्ट्र सायबर क्राइमने कारवाई केली आहे. ७-८ लोकांविरोधात गुन्हे दाखल करून नोटिस बजावण्यात आली आहे. ओम बिर्ला यांच्या मुलीने अयोग्य मार्गाने यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा अपप्रचार करण्यात येत होता. त्याविरोधात सायबर क्राइमने कारवाई करुन एफआयआर दाखल केली आहे. 

2024-07-27T04:12:08Z dg43tfdfdgfd