लवकरच घरोघरी पोहोचणार BSNL 4G नेटवर्क, सरकारची मोठी अपडेट

BSNL 4G launch date: जिओ, एअरटेल आणि Vi सारख्या खासगी दूरसंचार कंपन्यांनी नुकतेच आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्यामुळे BSNL खूप लोकप्रिय झाले आहे. या कंपन्यांनी प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्लॅनच्या किंमतीत 15 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे BSNLचे प्लॅन स्वस्त असल्याने बरेच लोक BSNL वापर आहेत.

4G नेटवर्कचे वेगात काम सुरू

आता लोकांची मागणी अधिक असल्यानं BSNL ने या संधीचा फायदा घेत अधिकाधिक लोक BSNL कडे यावेत यासाठी आपले 4G नेटवर्क वेगाने पसरविण्याचे काम सुरू केले आहे. जर तुम्ही आधीच BSNL वापरत असाल किंवा तुम्हाला BSNLमध्ये यायचे असेल तर BSNL ने सांगितले आहे की, ते कधीपर्यंत सगळीकडे 4G नेटवर्क सुरू करणार. त्यामुळे तुम्हाला देखील वेगवान नेटवर्कचा फायदा घेता येईल.

25 हजार गावे नेटवर्कमध्ये येणार

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, BSNL येत्या काही वर्षांत आपले 4G नेटवर्क वाढवेल आणि 2025 च्या मध्यापर्यंत 1 लाख नवीन 4G टॉवर जोडेल. त्याचबरोबर ज्या गावात इंटरनेटची सुविधा नाही असे देशातील 25 हजार गावे ही दूरसंचार सेवेशी जोडली जातील, असेही ते म्हणाले.

स्वदेशी 4 जी विकासात अग्रेसर होणार?

BSNL ने 2024 पर्यंत 75,000 4G साइट्स बसविण्याची योजना आखली होती. परंतु आतापर्यंत केवळ 25,000 साइट्स स्थापित केल्या आहेत. भारत स्वत:चे 4G नेटवर्क विकसित करण्यासाठी कटिबद्ध आहे. जिओने आपल्या 5G तंत्रज्ञानासह प्रगती केली आहे. परंतु अद्याप आपल्या 4G पायाभूत सुविधांसाठी बाह्य विक्रेत्यांवर अवलंबून आहे. स्वदेशी 4G विकासात अग्रेसर होण्याचे BSNL चे ध्येय आहे आणि आधीच 5G ची चाचणी घेत आहे. टीसीएस सी-दूरसंचार आणि तेजस नेटवर्कसह BSNL च्या 4G रोलआउटसाठी तांत्रिक कणा प्रदान करीत आहे.

4G नेटवर्क 2025 पर्यंत पूर्ण होणार?

भारताला 4G आणि 5G च्या पलीकडे जाऊन 6G तंत्रज्ञानात जगातील 10 टक्के साध्य करायचे आहे. BSNL चे 4G नेटवर्क 2025 च्या मध्यापर्यंत पूर्ण होईल, परंतु विलंबाने लॉन्च केल्याने नवीन ग्राहकांना आकर्षित करणे कठीण होऊ शकते. पुन्हा बाजारात आपले स्थान निर्माण करण्यासाठी कंपनीला स्पर्धात्मक किंमती आणि सेवा द्याव्या लागतील.

जिओ, एअरटेल, Vi या खासगी कंपन्या आणि दुसरीकडे सरकारी BSNL कंपनी या दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांची स्पर्धा दिसून येते. दरम्यान, आता BSNL ने वेगानं काम सुरू केल्यानं दूरसंचार क्षेत्रातील खासगी कंपन्यांना टक्कर देण्याची शक्यता आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-09-16T13:50:45Z dg43tfdfdgfd