रुग्णवाहिकेतच जुळ्यांना दिला जन्म

खांब-श्याम लोखंडे

रायगड माणगाव येथून अत्यावशक सेवेतील 108 रुग्णवाहिका गरोदर महिलेला अलिबाग येथे घेऊन जात असताना त्या महिलेने चक्क दोन जुळ्या मुलांना जन्म दिल्याची घटना रविवारी 15 सप्टेंबर रोजी घडली आहे.

108 रुग्णवाहिकेची अत्याधुनिक सुविधा आणि कर्मचारी यांची सावधगिरी म्हणून महीला माता आणि बाळ सुखरूप असल्याने अलिबाग जवळील चिखली येथे महिलेवर पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत. सदरच्या घटनेची माहिती अशी आहे की, एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दवाखान्यात घेऊन जाता असताना या महिलेने चक्क 108 रुग्णवाहिकेतच दोन जुळ्या मुळांना जन्म दिल्याची घटना रायगड जिल्ह्यातल्या माणगाव येथे घडली आहे. या महिलेला प्रसूतीच्या वेदना जाणवत असताना पुढील उपचाराकरिता अलिबाग रुग्णालयात घेऊन जात असताना या महिलेला जास्त वेदना जाणवू लागल्याने रुग्णवाहिकेत असणार्‍या 108 चे आरोग्य कर्मचारी यांनी हुशारी दाखवत या महिलेसाठी आपल्या जीवाची बाजी लावली. त्यांनतर या महिलेने रुग्णवाहिकेत प्रसूती केली. यावेळी चक्क दोन जुळ्या मुलांना या मातेने जन्म दिला असल्याचे माहिती 108 रुग्णवाहिका रायगड उपजिल्हा व्यवस्थापक कांचन बिडवे यांनी सांगितले.

तर अत्यवश्यक सेवेत वेळोवेळी तत्काळ सेवा देणारी रायगड जिल्ह्यातील 108 रुग्णवाहिका ही जीवनदायी ठरत असल्याने रायगड जिल्हा आरोग्य विभागाचे तसेच या वाहिकेचे तसेच त्यावर काम करणार पायलट आणि डॉक्टर सुविधा यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

2024-09-16T04:33:58Z dg43tfdfdgfd