येत्या शैक्षणिक वर्षात शाळांना ७६ सुट्ट्या

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शाळांचे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांचे नियोजन जाहीर करण्यात आले असून दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टी आणि सोळा दिवसांच्या दिवाळी सुट्ट्यांसह एकूण ७६ सुट्टया या वर्षात मिळतील.

शाळांच्या या सुट्ट्यांमध्ये शासन निर्धारित २०, विभागीय आयुक्त निर्धारित ३ आणि मुख्याध्यापक स्तरावरील दोन सुट्ट्यांचा समावेश आहे. मार्च-एप्रिल महिन्यात शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा संपल्या. आता १ मे रोजी निकाल जाहीर होतील. २ मे पासून उन्हाळी सुट्टी असेल हे शैक्षणिक वर्ष संपत असताना शालेय शिक्षण विभागाने आगामी सुट्ट्यांचे नियोजन जाहीर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी कार्यालयांना दिले होते.

उन्हाळी सुट्ट्या : २ मे ते १४ जून

दिवाळी सुट्ट्या : २८ ऑक्टो. ते १२ नोव्हें

शासन निर्धारित सुट्ट्या : २० दिवस

2024-04-23T03:27:51Z dg43tfdfdgfd