Trending:


Swati Maliwal Latest Marathi News: मुख्यमंत्री निवासस्थानी गेले तेव्हा...; स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन, दिल्लीत खळबळ, नेमकं काय घडलं?

Swati Maliwal Latest Marathi News: आम आदमी पक्षाच्या (AAP) राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांच्याबाबत दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.


Loksabha Election | अपमान झाला म्हणून लोकसभा निवडणुकीतून माघार; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

Loksabha Election chhagan bhujbal nashik


Maharashtra rain alert : महाराष्ट्रात पुढील काही तासांत मुसळधार पाऊस

महाराष्ट्राला अवकाळी पावसानं झोडपून काढलं आहे, पाऊस सुरूच आहे. दरम्यान आजही राज्यात हवामान विभागाकडून (IMD) पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका बसला आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसासोबतच गारपिटीचा देखील इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे हवामान विभागाकडून विदर्भात देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, विदर्भाच्या काही भागात देखील गारपीट होण्याची शक्यात आहे. दरम्यान नुसता पाऊसच पडणार नसून पावसासोबत वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आला आहे, या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी असू शकतो असं हवामान विभागानं म्हटलं आहे. त्यामुळे पावसासोबतच वादळाचा देखील तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून आज महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, सातारा, पुणे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर जालना, अकोला, अमरावती, नांदेड, लातूर, यवतमाळ, सोलापूर, सांगली यासह अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.मुंबईबाबत बोलायचे झाल्यास मुंबई आणि उपनगरात दिवसभर उष्ण वातावरण राहणार आहे, मात्र सायंकाळाच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


Adi Shankaracharya 2024 : महान आदि शंकराचार्यांनी प्रेरित 10 बाळांची नावे

आदि शंकराचार्य ज्यांना जगतगुरु शंकराचार्य म्हणूनही ओळखले जाते. हिंदूंना संघटित करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले होते. आदि शंकराचार्य यांचीदरवर्षी त्यांच्या भक्तांद्वारे वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी जयंती साजरी केली जाते. आदि शंकराचार्यांची 1236 वी जयंती रविवार, 12 मे 2024 रोजी साजरी झाली. या निमित्ताने त्यांच्या नावावरुन मुलांची खास नावे.


तपास यंत्रणांना धडा

मात्र, ही बातमी येण्याआधीच सन २०२१ मध्ये भारतीय तपास यंत्रणांनी ‘न्यूजक्लिक’ला चीनकडून पैसा मिळत असल्याचा ठपका ठेवला होता. तेव्हा आणि नंतर न्यायालयातही पुरकायस्थ हे सातत्याने ‘न्यूजक्लिक’ला चीनकडून एक छदामही मिळालेला नाही,’ अशी भूमिका सातत्याने मांडत आहेत.


नेपाळी नोटेचे म्हणणे काय?

Nepal New Currency: नेपाळने आपल्या नव्या चलनी नोटेवर भारतीय भूभाग दाखवून एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. खरे तर नेपाळ व भारत यांचे संबंध घनिष्ट आहेत; तरीही नेपाळने असे धाडस का करावे ?


नविन महामार्गावर बेशरमाची झाडे लावून निषेध

सेलू ,पुढारी वृत्तसेवा :शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ ब चे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. एक वर्ष ऊलटुनही पाच किलोमीटर अंतराची काम पूर्ण झाले नाही. संबंधित गुत्तेदाराने या रस्त्याची माती विकून सेलूकारांची माती केली आहे. या रस्त्यावरील डिव्हायडर मध्ये शोभेच्या झाडे लावण्यासाठी काळ्या मातीच्या ऐवजी सर्रास दगडांचा उपयोग केला जात आहे. आशा अनेक तक्रारी …


Central Railway | मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा ब्लॉक; काही ट्रेन रद्द

Central Railway block 15 days reason and time table changes


Dadar Public Reaction on Lok Sabha : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडी

Mahayuti Sabha at Shivaji Park : मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) पाचवा टप्पा येत्या 20 मे रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत (Mumbai News) सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. पाचव्या टप्प्यातील महायुतीची (Mahayuti) सांगता सभा आज दादरमधील (Dadar) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार आहे. आजच्या सभेसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित राहणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) देखील हजेरी लावणार आहेत. पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे आजच्या महायुतीच्या सभेकडे संपूर्ण राज्याचंच नाहीतर देशाचंही लक्ष लागलं आहे. दरम्यान या सभेबद्दल आणि एकुणच सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल जनतेला नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी.


ABP Majha Headlines : 12 PM : 17 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

छगन भुजबळ नाराज असल्याचं कानावर, जयंत पाटलांची प्रतिक्रिया तर भुजबळ फक्त जागावाटपार्यंतच नाराज होते, तटकरेंचं स्पष्टीकरण शरद पवारांचा मुक्काम असलेल्या हॉटेलला सुनील तटकरेंची भेट, अनिल देशमुखांचा दावा, संपर्कात आलं तरी कोणालाही परत घेणार नसल्याचं वक्तव्य ११ मे पासून माध्यमापासून दूर असणारे अजित पवार महायुतीच्या सभेत भाषण ठोकणार अजितदादा पुन्हा सक्रिय झाल्याची तटकरेंची माहिती मुंबईतल्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या महायुतीच्या सांगता सभेत मोदी आणि राज ठाकरेंची तोफ धडाडणार , सभेपूर्वी मोदी चैत्यभूमी, सावरकर स्मारक आणि बाळासाहेब स्मृतीस्थळाला भेट देणार गेल्या १० वर्षांपासून बहुमत असतानाही संविधान बदलण्याचा प्रयत्न नाही,.... केवळ राजकीय स्थैर्यासाठीच ४०० जागा हव्यात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं स्पष्टीकरण महामुंबईसाठी बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची महासभा.. शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगेंसह अरविंद केजरीवालही उपस्थित राहणार मुंबई पोलिसांना चकवा देण्यासाठी चार शहरं फिरणारा भावेश भिंडे अखेर उदयपूरमधून गजाआड, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई, तपास गुन्हे शाखेकडे दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल मे महिन्यातच, बारावीचा येत्या आठवड्यात तर दहावीचा शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर होणार मुंबईत उष्णतेसोबत आर्द्रता वाढणार, दमट वातावरणामुळे उकाड्यात आणखी भर पडणार, २४ तास उष्ण आणि दमट वातावरण यंदा मान्सून महाराष्ट्रात वेळेवर दाखल होणार, ७ जून रोजी मान्सून तळकोकणात दाखल होण्याचा अंदाज तर जून महिन्यात चांगल्या पावसाचा शक्यता


Food Poisoning: प्रसादातून 90 जणांना विषबाधा, वाचा कुठे घडलीये घटना

Food Poisoning: नांदेड जिल्ह्यातील एका मंदिरात आयोजित कार्यक्रमात महाप्रसाद खाल्ल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात किमान 90 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. भाविकांनी आंबील आणि खीर खाल्ल्याची घटना नायगाव येथे घडली. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.


Pm Modi Rally Mumbai : मोदी-राज सभेचे पडसाद, दोन मुंबईकर मित्र एकमेकांत भिडले

Mahayuti Sabha at Shivaji Park : मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) पाचवा टप्पा येत्या 20 मे रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत (Mumbai News) सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. पाचव्या टप्प्यातील महायुतीची (Mahayuti) सांगता सभा आज दादरमधील (Dadar) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार आहे. आजच्या सभेसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित राहणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) देखील हजेरी लावणार आहेत. पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे आजच्या महायुतीच्या सभेकडे संपूर्ण राज्याचंच नाहीतर देशाचंही लक्ष लागलं आहे. तसेच, आज सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईत रोड शो देखील होणार आहे. याच पार्श्वभूमीवर दादर परिसरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. महायुतीच्या सभेची सांगता मोदींच्या भाषणानं मुंबईत आज महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दोन मोठ्या सभा होत आहेत. महाविकास आघाडीच्या सभेसाठी शरद पवार, अरविंद केजरीवाल, मल्लिकार्जुन खर्गे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर असतील मात्र प्रश्न हा आहे की, मुख्य भाषणाची आणि शेवटच्या भाषणाची संधी कुणाला मिळणार? तर दुसरीकडे मनसेची स्थापना झाल्यानंतर शिवाजी पार्कवर पहिल्यांदाच राज ठाकरे यांना शेवटचं भाषण करता येणार नाही.


Sharad Pawar Sabha Hoarding Collapse : शरद पवारांच्या भाषणावेळीच कोसळले स्टेजवरचे होर्डिंग

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिक लोकसभा मतदारसंघातील सटाणा येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार व अवकाळी पाऊस (Rain) पडत आहे. त्यामुळे, राजकीय नेत्यांनाही या अवकाळी व बदलत्या हवामानाचा फटका बसल्याचं दिसून आलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह काही नेत्यांच्या सभाही अवकाळीमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. तर, मुंबईतील घाटकोपर येथे महाकाय बॅनर कोसळून मोठी दुर्घटना झाली. आता, पुन्हा एकदा बॅनर कोसळल्याची घटना घडली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सटाणा (Nashik) सभा सुरू असताना सोसाट्याचा वारा सुरू झाला. मात्र, तरीही पवारांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं होतं. मात्र, यावेळी, व्यासपीठावरील बॅनर कोसळल्याची घटना घडली.


RTE admission 2024: आरटीई प्रवेशाचा मार्ग मोकळा, 17 मेपासून भरता येणार ऑनलाइन अर्ज

RTE admission 2024: राईट टू एज्यूकेशन कायद्यामध्ये सरकारकडून बदल करण्यात आला होता. या कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटर परिसरातील सरकारी किंवा सरकारी अनुदानीत शाळांमध्ये प्रवेश देण्याच निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली. न्यायालयाच्या स्थगितीनंतर नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली होती.


Delhi BJP Office Fire : दिल्ली भाजप कार्यालयात लागली आग, जाणून घ्या सविस्तर

Delhi BJP Office Fire : दिल्ली भाजपच्या मीडिया विभागाने सांगितले की, या घटनेत कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही. तसेच कोणत्याही व्यक्तीचे नुकसान झाले नाही.


मी कुटुंबवत्सल..मी माझ्या कुटुंबाचा विचार करणारच- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on Family: मी माझ्या कुटुंबाचा विचार करणारच असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय.


पावसाची गॅरंटी

Monsoon 2024: ​​साधारण मे महिन्याच्या मध्यावर मान्सूनच्या आगमनाचा एक अंदाज जाहीर होत असतो; तो तसा बुधवारी जाहीर झाला. त्या अंदाजानुसार, केरळमध्ये ३१ मे रोजी मान्सून दाखल होणार आहे. ही तारीख चार दिवस इकडे-तिकडे होऊ शकते.


Sanjay Raut Full Speech : 4 जूनच्या निकालानंतर भाजपला त्यांची जागा समजेल : संजय राऊत

देशात परीवर्तन आणि देशाचे संविधान वाचवायचे आहे . ४ जूनच्या निकालानंतर यांना कळेले त्यांची जागा कुठे आहे. पंतप्रधानांच्या रोड शोमुळे लोकांचे हाल ,मुंबईचे रस्ते रेल्वे मार्ग आणि मेट्रो बंद करण्यात आले . महाराष्ट्र आणि देशभरात मोदी आणि शाह यांना विरोध होत आहे .४ जून नंतर भाजपला विरोधीपक्ष म्हणून संमानाने जागा दिली जाईल


Raj Thackeray: मनसे प्रमुखांसोबत 'असा' योग पहिल्यांदाच; पार्कात आज मोदींचा जलवा, राज ठाकरेंचा नंबर कितवा?

Raj Thackeray: आज महायुतीची शिवाजी पार्कात सभा भव्य होत आहे. या सभेला पंतप्रधान मोदी उपस्थित असतील. मनसे प्रमुख राज ठाकरेदेखील या सभेला हजर राहणार आहेत.


Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेमध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वे अंतर्गत कोणत्या पदांवर भरती करण्यात येणार आहे ते नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.


आजचा अग्रलेख: आश्रितांची आधारभूमी

CAA Citizenship Certificates: केंद्रातील मोदी सरकारने नागरिकत्व कायदा दुरुस्ती (सीएए) विधेयक सन २०१९मध्येच मंजूर करून घेतले होते; त्याला ही पार्श्वभूमी होती. आता निवडणुकांची ऐन रणधुमाळी चालू असताना १४ आश्रितांना नागरिकत्वाची प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. या पहिल्या टप्प्यात किमान ३५० जणांचे नागरिकत्वासाठीचे आवेदन सरकारने मान्य केले आहे.


चाबहारची बहार!

इराणचे राष्ट्राध्यक्ष सय्यद मोहंमद खातमी यांनी 2003 मध्ये केलेला भारत दौरा हा भारत-इराण संबंधांना ऐतिहासिक कलाटणी देणारा ठरला. त्यावेळी उभय देशांत विविध क्षेत्रांतील करार झाले; परंतु त्यात सर्वात महत्त्वाचा होता, तो चाबहार बंदरविषयक करार. मात्र त्यानंतरच्या काळात भारत अमेरिकेच्या अधिक जवळ गेला, तर इराण व अमेरिकेतील वैमनस्य वाढत गेले. त्यामुळे चाबहार बंदराच्या विकासाची प्रक्रिया मंदावली. …


India Alliance BKC Rally : मुंबईतील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सांगता सभा ABP Majha

Mumbai Lok Sabha Election 2024 : मुंबई : देशात लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) धुरळा पाहायला मिळतोय. अशातच 20 मे रोजी देशात पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यामध्ये मुंबईचाही (Mumbai News) समावेश आहे. मुंबई जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. येत्या 20 मे रोजी मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये (Mumbai Lok Sabha Constituency) मतदान प्रक्रिया (Voting) पार पडणार आहे. त्यामुळे सध्या मुंबईतील प्रचार शिगेला पोहोचला आहे. मुंबईत आज महायुती (Mahayuti) आणि इंडिया आघाडीच्या (India Alliance) प्रचारसभा पार पडणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्कवर महायुतीची सभा आणि बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची प्रचारसभा पार पडणार आहे. मुंबईत आज महायुती आणि इंडिया आघाडीची प्रचार सभा होणार आहे. ऐतिहासिक शिवाजी पार्कवर मोदी आणि राज ठाकरेंची एकत्र सभा होत आहे. या सभेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार उपस्थित असतील. तर दुसरीकडे आज मुंबईत इंडिया आघाडीचीही प्रचारसभा बीकेसी मैदानावर होत आहे. या सभेला उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत.


MBA Result : एमबीए सीईटीचा निकाल जाहीर; असा पाहता येणार निकाल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यभरातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल सीईटी सेल कक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगीनमध्ये निकालाचे गुणपत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. या गुणावरच एमबीए प्रवेश होणार आहे. तब्बल दोन महिने निकाल जाहीर झाला नसल्याने विद्यार्थ्यांना चिंता होती. बुधवारी निकाल जाहीर केला आहे. राज्य …


Ghatkopar Hoarding Accident Kartik Aaryan : घाटकोपर होर्डिंग अपघाताने कार्तिक आर्यनवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या नातेवाईकाचे निधन

Ghatkopar Hoarding Accident Kartik Aaryan : घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंगमुळे (Ghatkopar Hoarding Accident) 16 मुंबईकरांना नाहक प्राण गमावावे लागले. या घटनेने बॉलिवूडचा अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात कार्तिकच्या नातेवाईकांना प्राण गमवावे लागले. मुंबईत 13 मे रोजी आलेल्या वादळी वाऱ्याने घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर असलेल्या मोठ्या आकाराचे होर्डिंग कोसळले. त्यात अनेक नागरीक त्याखाली अडकले....


Gondia Crime News: मुख्याध्यापक आणि शिक्षकाच्या वादाने घेतला लिपिकाचा बळी, गोंदियातील घटना

Gondia Crime News: शिक्षक आणि मुख्याध्यापकाचं भांडण सोडवणं लिपिकाच्या जीवावर बेतले आहे. दोघांच्या भांडणात पडणे किंवा ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणे किती धोकादायक असू शकते याचा प्रत्यय गोंदियातील या घटनेतून आला आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या लिपिकाचा मृत्यू झाल्याची ही घटना गोंदियातील देवरी तालुक्यात असलेल्या सिद्धार्थ विद्यालय तथा महाविद्यालयात घडली आहे.


Girish Mahajan Meet Chhagan Bhujbal : नाराजीच्या चर्चेनंतर गिरीश महाजन भुजबळांच्या निवासस्थानी

Girish Mahajan : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Constituency) निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. नाशिकमध्ये महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे (Hemant Godse), महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) तर अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाशिकमध्ये लोकसभेसाठी इच्छुक होते. छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगल्या आहेत. यामुळे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) हे तातडीने भुजबळ फार्म (Bhujbal Farm) येथे छगन भुजबळांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. महायुतीत शिवसेना शिंदे गटाला नाशिकची जागा मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरु होती. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे प्रचारात सक्रीयपणे सहभागी होताना दिसले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला भुजबळांनी हजेरी लावली होती. त्यामुळे भुजबळांची नाराजी दूर झाली असे दिसत होते. मात्र आज सकाळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छगन भुजबळ नाराज असल्याचे मला समजले, असे वक्तव्य केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा उधाण आले आहे.