महायुती मजबूत; महाआघाडीत खिचडी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : देशामध्ये मजबूत युती तयार झाली आहे. तर, दुसरीकडे महागडी राहुल गांधीच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी आहे. आपल्या युतीला विकासाची इंजिन असून त्यामध्ये डबे असून त्यामध्ये विविध समाजांना सामावून घेण्यासाठी जागा आहे व ते पुढे जात आहे. तर, दुसरीकडच्या इंजिनमध्ये डब्बेच नाहीत. सर्व इंजिनच आहेत असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. ते आज रावेर महायुतीच्या प्रचार सभेत भुसावळ येथे बोलत होते.

 महायुतीच्या रावेर लोकसभेच्या प्रचार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंचावर उपस्थितांचे सर्वांचे स्वागत केले व शेवटी ज्यांचे नाव सुटले असेल ही माझी चुकी नाही लाव लिहून देणाऱ्याची चुकी आहे असे म्हणताच उपस्थित सर्व हसू लागले .

यानंतर ते म्हणाले की, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, ना की नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधानसभेची नसून देशाची आहे. कोणाच्या हातात देश सुरक्षित राहू शकतो? कोण देशाचे सुरक्षित ठेवू शकतो? याचा विचार करून आपल्याला मतदान करायचे आहे. मजबूत प्रकारची युती तयार झालेली आहे. दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात महाआघाडीची खिचडी झाली आहे.

आपल्याकडे डबे तरी आहेत. मात्र, दुसरीकडे सगळेच इंजिन आहेत. कारण या इंजिनमध्ये सर्वसामान्यांना जागा नसते त्यात राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांना जागा आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे यांना जागा आहे. तर शरद पवार यांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळे यांना जागा आहे. मात्र महायुतीच्या इंजिनमध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून सर्वांनाच जागा असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाषणा दरम्यान गेली लाईट

देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असताना लाईट गेल्यावर आपल्याला कोणीही या ठिकाणी थांबवू शकणार नाही. काही काळजी करू नका लाईट बंद झाली असली तरी देखील बघा तुमच्यात लाईट सुरु झाली, अरे आपला करंटच असा आहे की ह्या लाईटची आवश्यकता नाही.

2026 नंतर आमचा मंच असा चालणार नाही. या मंचावरच्या 50 टक्के जागा आम्हाला महिलांना द्यावे लागतील. कारण 2026 नंतर 33% विधानसभेचे आमदार या महिला असतील आणि लोकसभेमध्ये 33% खासदार या महिला असतील. तर मी महिलांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे आणि तर जळगाव जिल्ह्यामध्ये मोदी राज आणलेला आहे. ऑलरेडी महिला राज आले आ.हे इकडे रक्षा तर तिकडे स्मिता वाघ.

सभेत बोलताना खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, स्थानिक वाद काही असो मात्र या युतीच्या मंचावर आज आमदार चंद्रकांत पाटील हे उपस्थित झाले. ते आमच्या सोबत आहे व राष्ट्र निर्माण करण्यासाठी ते मदत करणार आहे.

यावेळी नामदार गिरीश महाजन, आमदार चंद्रकांत पाटील, विजू चौधरी, अमोल जावडे, युवराज लोणारी, आमदार सुखचंद संचेती, मनोज बियाणी, राजू सूर्यवंशी, अजय घोडे, उल्हास पाटील, उमेश नेमाडे व आमदार संजय सावकारे उपस्थित होते.

2024-05-07T17:38:47Z dg43tfdfdgfd