महाबळेश्वरात जुलैमध्ये 102 इंच पाऊस

महाबळेश्वर : पुढारी वृत्तसेवा

गेल्या आठ दिवसांपासून महाबळेश्वर शहरासह ग्रामीण भागात पावसाची कोसळधार सुरूच आहे. त्यामुळे अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीतच तब्बल 136.58 इंच पावसाची नोंद महाबळेश्वरमध्ये झाली आहे. एकट्या जुलैमधील 25 दिवसांमध्ये 102 इंच पाऊस झाला आहे. गेल्या काही वर्षातील यंदाच्या हंगामातील हा उच्चांकी पाऊस आहे. पावसाची कोसळधार अशीच सुरू राहिल्यास महाबळेश्वरमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस नोंदला जावू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या महाबळेश्वरमध्ये पावसाची दीड शतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे. शुक्रवारी सकाळी 8.30 पर्यंत महाबळेश्वरात तब्बल 297 मिमी म्हणजेच 11 इंच पावसाची नोंद झाली आहे.

नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला जावली, महाबळेश्वरमधून विरोध

पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. असाच पाऊस पुढील दोन तीन दिवसात झाल्यास 150 इंच पावसाची नोंद होईल. 1 जून ते 30 जून या एका महिन्यात महाबळेश्वरमध्ये 870.60 मिमी म्हणजेच 34.27 इंच पावसाची नोंद झाली होती. तर जुलै महिन्यातील 26 दिवसांमध्ये तब्बल 102 इंच पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

जुलै महिन्याच्या प्रारंभीच पावसाने जोर धरला. त्यानंतर दुसर्‍या आठवड्यात काहीशी उसंत घेतली. दरवर्षी याच कालावधीत सर्वाधिक पावसाची नोंद होते. याचवेळी महाबळेश्वरकरांना सूर्यदर्शन झाले. मात्र, तिसर्‍या आठवड्यात धुवांधार पाऊस झाला आहे. त्यामुळे एकाच महिन्यात 100 हून अधिक इंच पावसाची नोंद झाली. याच पावसामुळे वेण्णा लेक ओव्हर फ्लो झाला. या पावसामुळे महाबळेश्वरमधील जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर ते तापोळा या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर चिखली शेड, वाघेरा, खांबिल गोल अशा ठिकठिकाणी वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. वेण्णा लेक ओसंडून वाहत असल्याने लिंगमळा परिसर जलमय झाला आहे. या भागातील संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे.

महाबळेश्वर : खरोशी येथे उपचाराअभावी डालग्यातच सोडावा लागला ‘प्राण’

लिंगमळा धबधब्याने देखील प्रचंड पाण्याच्या लोटामुळे रौद्ररूप धारण केल्याचे पाहावयास मिळत आहे महाबळेश्वर तालुक्यातील सर्वच प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांसाठी तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलयामुळे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना केवळ शहरानजीक वेण्णालेक परिसरात, बाजारपेठेत फेरफटका मारावा लागत आहे. अशा धुंद वातावरणात रिमझिम पावसात पर्यटक पर्यटनाचा आनंद घेता येत आहे. आजपर्यंत तालुक्यात 3 हजार 469.2 मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

2024-07-27T00:26:33Z dg43tfdfdgfd