मतदाराने ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून लावली काडी; सोलापुरात नेमकं काय घडलं

सोलापूर : सोलापूर व माढा लोकसभेसाठी आज सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. उन्हाळा असल्यामुळे सकाळी साडेसात वाजल्यापासूनच अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी 8 वाजेपर्यंत सोलापूर लोकसभेसाठी बारा टक्के तर माढा लोकसभेसाठी दहा टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे ईव्हीएम मशीनबाबत छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून एका मतदाराने जाळण्याचा प्रयत्न केला.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे शांतपणे मतदारप्रक्रिया सुरू होती. अशात एका मतदाराने ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे ईव्हीएम मशीनटे थोडे नुकसान झालं आहे. या घटनेनंतर बागलवाडी येथे काही काळ मतदान प्रक्रिया शांत झाली होती. सांगोला येथील सहायक्क निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घडल्या घटनेबाबत बोलण्यास नकार दिला. नवीन ईव्हीएम मशीन आणून मतदानाला सुरुवात झाली. बागलवाडी मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.

वाचा - 'मी शिवी दिलीच नाही, ग्रामीण भाषेत बोललो' त्या व्हायरल व्हिडीओवर भरणेंची पहिली प्रतिक्रिया

सोलापूर लोकसभा मतदारसंघात सकाळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे, उज्वलाताई शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर त्यांच्यासह माढा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

2024-05-07T10:17:06Z dg43tfdfdgfd