भाजप प्रवेशाची तारीख वडेट्टीवारच ठरवतील: धर्मारावबाबा आत्राम

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : निवडणूक कालावधीत विरोधी पक्ष नेते आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात बोललो होतो. मात्र, आता निवडणूक संपली, आता सगळं संपलं ‘बात गयी हो गयाʼ आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भाजप प्रवेश कधी करतील, हे तेच ठरवणार आहेत. त्यांची मर्जी आहे, तेव्हा तारीख तेच ठरवतील, जे व्हायचं ते होणारच आहे, असे सूचक वक्तव्य राज्याचे अन्न व औषध पुरवठा मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मारावबाबा आत्राम यांनी आज (दि.१) केले.
गोंदियाच्या कारंजा येथील पोलीस मुख्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात आले असता ते  प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तत्पूर्वी पालकमंत्री आत्राम यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर मैदानावरील परेडचे निरीक्षण केले. प्रसंगी पोलीस बँड पथकाने महाराष्ट्र गीत सादर केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रसंगी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्यावर ‘भटकती आत्माʼ अशा शब्दात नाव न घेता टीका केली होती. याविषयी त्यांना विचारले असता निवडणुकीपर्यंत सगळे एकमेकांवर टीका करतात. त्यानंतर आम्ही सर्व एकत्रित येत असल्याचे आत्राम यावेळी म्हणाले.
हेही वाचा 

2024-05-01T10:00:08Z dg43tfdfdgfd