पूजा खेडकर आणि कुटुंबीयांना धक्का! महानगरपालिकेनं घेतला मोठा निर्णय

पुणे (गोविंद वाकडे, प्रतिनिधी) : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. पूजा खेडकर यांच्याशी संबधित असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कंपनीचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील एमआयडीसी परिसरात पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे ही कंपनी आहे.

मनोरमा खेडकर यांच्या नावे असलेल्या थर्मोव्हेरिटा इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने महानगरपालिकेचा लाखोंचा कर थकवला आहे. त्यामुळे, ही कंपनी कर संकलन विभागाकडून सील करण्यात आली होती. आता मात्र थकीत कर निर्धारित वेळेत न भरल्यास ही कंपनी लिलावत काढली जाणार आहे. लवकरच लिलाव प्रक्रियेला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती कर संकलन विभागाचे प्रमुख निलेश देशमुख यांनी दिली आहे.

पूजा खेडकर गायब! ना पुण्यात, ना मसूरीच्या ट्रेनिंग सेंटरला; युपीएससीचा आदेश डावलून गेल्या कुठे?

पिंपरी चिंचवड शहरातील अशाच पद्धतीने कर बुडविणाऱ्या इतर सुमारे 80 मालमत्तांचा देखील लिलाव केला जाणार आहे. देशमुख यांनी याबद्दलही माहिती दिली आहे.

आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या युपीएससीकोटाच्या बनावट कागदपत्रांमुळे चर्चेत आहे. तिचं कुटुंबीयही या वादात सापडलं आहे. बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याच्या आरोपानंतर पूजा खेडकर वादात अडकलीय. तिला मंगळवारी २३ जुलै रोपी मसूरीतील लाल बहाद्दुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत दाखल व्हायचं होतं. पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबवून त्यांना तातडीने मसुरीला य़ेण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र तिने रिपोर्ट केलं नसल्याची माहिती समोर आलीय. तसंच तिने याबाबत मसूरीत अकादमीलासुद्धा काही कळवलेलं नाही.

2024-07-27T06:33:34Z dg43tfdfdgfd