पत्नीची फारकत; पतीने संपवला जीवनप्रवास

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

पती-पत्नीमध्ये पंचफारकत झाल्यानंतर फैजपूर शहरात राहणाऱ्या ते तीस वर्षीय तरुणाने नैराश्यातून दारूच्या निषेध गळफास घेऊन शनिवारी (दि.२०) जीवनप्रवास थांबवला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे

यावल तालुक्याती फैजपूर शहरातील सुरेश मुरलीधर कोळी (वय ३३) वास्तव्यास होते. कौटुंबिक कलहातून त्याची पत्नी कोमल कोळी हिने चार दिवसांपूर्वीच पंच फारकत घेतली होती. या नैराश्यातून दारूच्या नशेत शनिवारी (दि.२०) त्याने आपल्या राहत्या घरातच  गळफास घेत जीवन संपविले. हा प्रकार वडील मुरलीधर कोळी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यास तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणले, तेथे वैद्यकीय तपासणी करत सुरेश कोळी यास मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी वडील मुरलीधर कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार रशीद तडवी करत आहेत.

हेही वाचा:

2024-04-22T08:55:16Z dg43tfdfdgfd