नागपुरात जोरदार पाऊस, वादळासह गारपीट

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नागपूरसह विदर्भात पारा 44 अंश सेल्सियसच्या जवळपास पोहोचला असताना अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीट यामुळे वातावरणात काही काळ गारवा तर नंतर प्रचंड उकाडा निर्माण झाला.

अनेक भागात काल व आजही वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार पाहायला मिळाला. काल रात्री साडेबारानंतर दक्षिण नागपूरसह विविध भागातील खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत व्हायला आज दुपार झाल्याने प्रचंड उकाड्याचा त्रास नागपूरकराना सहन करावा लागला. येणारा आठवडा वादळी वाऱ्यासह पाऊस असाच विदर्भात असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 14

मेपर्यंत यलो अलर्ट

नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सुचनेनुसार दि. 7 ते 14 मे या कालावधीत चंद्रपूर, नागपूर व पूर्व विदर्भात यलो अलर्ट जारी केला असून विजांच्‍या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्‍यता वर्तविली आहे. जिल्‍ह्यात एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वारा (ताशी 40-50 किमी वेगाने) आणि गडगडाट वादळासह गारपीटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी योग्य काळजी घ्‍यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्‍यात आले आहे.

2024-05-07T18:03:36Z dg43tfdfdgfd