जी कार भाड्याने घेतली, तीच चोरली!

लंडन : ऑफिसला जायचे असेल किंवा आपल्या एखाद्या नातेवाईकांच्या घरी. बहुतांशी लोक कार भाड्याने घेणे पसंत करतात. एक तरी हे अतिशय सुरक्षित माध्यम असते. शिवाय, आपली कार असेल तर त्याचे पार्किंग, चोरीचा धोका, याची धास्ती असते. भाड्याने कार घ्यायची असेल, तर मात्र अशी काहीही भीती बाळगण्याचे कारण राहात नाही. पण, ब्रिटनमध्ये अशाच कारबाबत एक अजब घटना घडली. येथे एका महाभागाने अशीच भाड्याने घेतलेली कारच चक्क चोरली आणि यामुळे एकच खळबळ उडाली नसती तरच नवल होते!

मेट्रोने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंडमधील नॉर्थ वेल्स येथे राहणार्‍या कियान कोलियर हा व्यक्ती नेहमी कॅबने ये-जा करत असे. पण, एक दिवस त्याच्या डोक्यात कार चोरून पळून जाण्याचे वेड संचारले आणि त्याने चक्क काही अंतर दूर गेल्यानंतर ड्रायव्हरला बाहेर करत कारचा ताबा घेतला आणि तेथून वेगाने पोबारा केला. पण, हा चोरीचा प्रयत्न पुढील काही मिनिटातच त्याच्या अंगलट आला. याचे कारण म्हणजे त्या भरधाव कारवर तो नियंत्रण ठेवू शकला नाही आणि कार एका दुभाजकाला धडकत मोठा अपघात झाला.

कियान यात जागीच ठार झाला. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. 22 वर्षीय कियान मद्यधुंद अवस्थेत असल्याचे नंतर आढळून आले. कार चालवताना त्याने सीट बेल्ट परिधान केले नव्हते, हे सीसीटीव्ही कॅमेर्‍यातून स्पष्ट झाले. बैंगोर टॅक्सी फर्म प्रीमियर ग्ाु्रपने त्यापूर्वीच पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती.

फॉरेन्सिक तज्ज्ञ गॉर्डन सायनोर यांच्यानुसार, कियानच्या रक्तात 224 मिलिग्रॅम प्रति लिटर अल्कोहोल आढळून आले आणि ड्रिंक-अँड-ड्राईव्हमधील मर्यादेपेक्षा त्याच्या कारचा वेग चक्क तिपटीने अधिक होता. एरवी, भाडे पद्धतीने उपलब्ध कार चोरल्यानंतर ती लपवणे अगदीच कठीण असते. याचे कारण म्हणजे त्याचे ट्रॅकिंग होत असते. पण, कियानने मद्यधुंद अवस्थेत असल्याने ही चूक केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

2024-05-07T04:41:44Z dg43tfdfdgfd