गाईच्या शेणापासून गणेशमूर्तींची निर्मिती

उत्तम कदम

आष्टा : येथील काशिलिंग गो संगोपन केंद्रात चक्क देशी गाईच्या शेणापासून पर्यावरण पूरक सुबक व आकर्षक गणपतीच्या मूर्तींची निर्मिती करण्यात येत आहे. केंद्रचालक हणमंतराव आऊबा ढोले यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात येत असलेल्या या मूर्तींना आष्टा शहर व परिसरातून मागणी वाढत आहे.

फडणीसवाड्यातील गणेश जन्मोत्सव सोहळ्याला 300 वर्षांची परंपरा

हणमंत ढोले म्हणाले, गणेश मूर्ती शेणापासून बनवलेली आहे. तसेच या मूर्तीसाठी वापरलेले रंगसुद्धा नैसर्गिक असल्याने सर्वकाही पर्यावरण पूरक आहे. यावर्षी आम्ही प्रायोगिक तत्त्वावर 8 इंची, 11 इंची व 12 इंची या आकाराच्या फक्त 50 मूर्ती बनवल्या आहेत. यातील 32 मूर्तींचे बुकिंग झाले आहे. हायड्रोलिक मशीनच्या सहाय्याने मूर्ती बनविण्यात आलेल्या आहेत. शेणापासून गणेश मूर्ती बनविण्याची संकल्पना जुनी आहे, परंतु आपल्याकडे ती नवीन आहे. मी एका ठिकाणाहून ही कला शिकून आलो. त्यानंतर मी आष्टा येथे अशाच प्रकारच्या मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे साचे मी स्वत: तयार करून घेतले. दोन किलो शेणाला मोल्डमध्ये प्रेस करून ही मूर्ती काढली जाते. तिला पाच टनांचे प्रेशर देऊन या मूर्तीमधील हवा आणि पाणी बाहेर काढले जाते. यानंतर ही मजबूत मूर्ती तयार होते.

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती खरेदी कराव्यात

गाईचं शेण आणि गोमूत्र याचे आध्यात्मिक, वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही अनन्य साधारण महत्त्व व पावित्र्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी गाईच्या शेणापासून बनविलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती खरेदी करून आमच्या गो शाळेला मदत करावी.

सामाजिक बांधिलकीतून 175 देशी गाईंचे संगोपन

काशिलिंग गो शाळा ही येथील बिरोबा देवस्थानची गो शाळा असून यामध्ये लहान-मोठ्या 175 गाई आहेत. या सर्व गाईसाठी वैरण, औषधे, कामगार पगार व अन्य खर्च असा, या गो शाळेचा एकूण वार्षिक खर्च 25 लाखरुपये इतका आहे. सामाजिक बांधिलकीतून ही गो शाळा ढोले चालवित आहेत. शेणखत विक्रीतून काही रक्कम मिळते.

Ganesh Chaturthi 2024 : 'श्री' बाप्पाच्या प्रतिष्ठापनेनंतर गणेश भक्तांनी 'या' गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात

2024-09-07T01:36:33Z dg43tfdfdgfd