‘एआय’ने टाकले माणसाला मागे!

लंडन : कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवाच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेने निर्माण केली. आता या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ‘एआय’ने माणसालाही मागे टाकले आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या ‘एआय’ने आज अनेक कामांमध्ये मानवाला मागे टाकले असल्याचे दिसून आले आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने 2024 चा एआय इंडेक्स जारी केला आहे. त्यानुसार, द़ृश्य तर्क, प्रतिमानिर्मिती आणि इंग्रजी आकलनासह अनेक महत्त्वाच्या पॅरामीटर्सवर ‘एआय’ने मानवांना मागे टाकले आहे. आता ‘एआय’साठी नवीन मानके तयार करावे लागतील.

अहवालानुसार, एआय अजूनही काही जटिल कार्यांमध्ये मानवांपेक्षा मागे आहे. जसे की स्पर्धात्मक गणित, नियोजन आणि सामान्य ज्ञान. अहवालात एआयच्या जगातून काही चिंताजनक ट्रेंडदेखील उघड झाले आहेत. उदाहरणार्थ, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये कंपन्या एआयचा वापर झपाट्याने वाढवत आहेत. टीटहब या कॉमन कोड शेअरिंग प्लॅटफॉर्मवर एआय कोडिंग प्रकल्पांची संख्या 2011 मध्ये सुमारे 800 वरून 2023 मध्ये 18 लाखांपर्यंत वाढली. अहवालात असेही म्हटले आहे की, एआय कामगारांना अधिक उत्पादक बनविण्यात आणि कामाचा दर्जा प्रदान करण्यात यशस्वी झाला आहे.

नवीन ग्राहक निर्माण करण्यासाठी एआयचा वापर वाढला आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 55% कंपन्यांनी गेल्या वर्षी एआय वापरत असल्याचे सांगितले. 2022 मध्ये केवळ 50% कंपन्या असे म्हणतात, तर 2017 मध्ये फक्त 20% होत्या. एआय इंडेक्सचे मुख्य संपादक नेस्टर मास्लेझ म्हणतात, ‘एक दशकापूर्वी एआय बेंचमार्क कंपन्या किंवा संस्थांना 5 ते 10 वर्षे सेवा देत असत. आता काही वर्षांतच ते निरूपयोगी झाले आहेत. एआय टूल्स व सेवांनी त्यांना त्रास दिला का? असे विचारले असता, 69% ऑस्ट्रेलियन्सनी ‘होय’ असे उत्तर दिले. 65% ब्रिटिश, 63% यूएस व कॅनडाने एआयबद्दल चिंता व्यक्त केली. भारतात 58% लोकांनी एआयबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

2024-04-20T02:54:01Z dg43tfdfdgfd