ZIMBABWE ELEPHANT CULLING : भुकेने त्रस्त लोकांसाठी झिम्बाब्वे २०० हत्ती मारणार

पुढारी ऑनलाईन :

झिम्बाब्वेमध्ये चार दशकांतील सर्वात भीषण दुष्काळ पडला आहे. पिके नष्‍ट झाली आहेत. लोकांजवळ खाण्यासाठी काहीही उरलेले नाही. यासाठी इथल्‍या वाईल्‍डलाईफ अथॉरिटीने एक धक्‍कादायक निर्णय घेतला आहे. तो म्‍हणजे येथील जंगलातील तब्‍बल २०० हत्‍तींना मारण्यात येणार आहे. यातून जे मास मिळणार आहे. ते मास लोकांना खाण्यासाठी पुरवण्यात येणार आहे. या ठिकाणी लोकांना खाण्यासाठी अन्नधान्याचा मोठया प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला. (zimbabwe drought)

दक्षिण आफ्रीकी देशांमध्ये सध्या अल-निनामुळे मोठ्या प्रमाणात दुष्‍काळ पडला आहे. जवळपास ६.८० कोटी लोकांना याची झळ सोसावी लागत आहे. या पूर्ण भागात खाद्‍य सामग्रीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. झिम्बाब्वे पार्क्स आणि वन्यजीव प्राधिकरणाचे प्रवक्ते तिनाशे फारावो म्हणाले की, आम्ही पुष्टी करू शकतो की प्राधिकरण 200 हत्तींना मारणार आहे.

तिनाशे यांनी म्‍हटलंय की, आम्‍ही हा विचार करतोय की हे काम कशा प्रकारे करता येईल. हत्‍तींचे मास अशा ठिकाणी पाठवण्यात येईल ज्‍या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दुष्‍काळ पडलेला आहे. लोक भूकेने व्याकुळ आहेत. झिम्बाब्वेमध्ये हत्तींना मारण्याची अधिकृत सुरुवात 1988 मध्ये झाली. विशेषत: ह्वांगे, माबिरे, शोलोशो आणि चिरेझी जिल्ह्यात.

शेजारील देश नामिबियातही ८३ हत्ती मारले गेले

गेल्‍या वर्षी शेजारील देश नामिबियात ८३ हत्‍तींना मारण्यात आले. भूकेने व्याकूळ लोकांना मास पुरवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. आफ्रिकेच्या पाच क्षेत्रात २ लाखांहून अधिक हत्‍ती आहेत. यामध्ये झिम्‍बाब्‍वे, जांबिया, बात्‍सावाना, अंगोला आणि नामीबिया या प्रदेशांचा समावेश आहे. पूर्ण जगात सर्वाधिक हत्‍ती याच आफ्रिकी देशांमध्ये आहेत.

हत्‍तींना मारल्‍यामुळे त्‍यांची सख्या नियंत्रित राहते

तिनाशे यांनी सांगितले की, हत्‍तींना मारल्‍यामुळे एक फायदाही होतो. यामुळे त्‍यांच्या संख्येवरही नियंत्रण ठेवता येते. जंगलातील गर्दी कमी होते. आमची जंगले फक्‍त ५५ हजार हत्‍तींनाच सांभाळू शकतात. मात्र सध्या आमच्या देशात जवळपास ८४ हजारहून अधिक हत्‍ती आहेत. जर २०० हत्‍ती जरी मारले गेले, तर समुद्रातून एक पाण्याचा थेंब बाजुला काढल्‍यासारखेच आहे असे ते म्‍हणाले.

या देशात ५०२२ कोटी रुपयांचे हस्तिदंत पडून आहेत

झिम्‍बाब्‍वेमध्ये सलग दुष्‍काळ पडत आहे. यामुळे हत्‍ती आणि लोकंध्ये संघर्ष वाढत आहे. ज्‍यामुळे नैसर्गिक स्‍त्रोतही कमी होत चालले आहेत. गेल्‍या वर्षी झिम्‍बाब्‍वेमध्ये हत्‍तींच्या हल्‍ल्‍यांमध्ये जवळपास ५० लोकांचा मृत्‍यू झाला होता. हत्तींच्या वाढत्या लोकसंख्येसाठी प्रसिद्ध असलेला झिम्बाब्वे सध्या युएन कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एन्डेंजर्ड स्पीसीज (CITES) साठी प्रयत्न करत आहे. जेणेकरून हत्‍तींच्या दात आणि जिवंत हत्‍तींच्या व्यवसायासाठी काही मार्ग काढता येईल. झिम्‍बाब्‍वेकडे जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात हस्‍ती दंताचा खजिना आहे. या ठिकाणी जवळपास ५०२२ कोटी रूपयांचे हस्‍तीदंत पडून आहेत. ज्‍याला झिम्‍बाब्‍वे विकू शकत नाही आहे. जर CITES वर स्‍वाक्षरी झाली तर या देशात अन्नाची कमी भासणार नाही.

2024-09-18T08:06:53Z dg43tfdfdgfd