Trending:


Beed Parli Firing : परळीतील गोळीबार, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंचा गोळीबारात मृत्यू

Beed Parli Firing : परळीतील गोळीबार, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बातमी अपडेट होत राहील हे देखील वाचा ब्रेकिंग! पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई! मुंबई, नाशिकमध्ये 33 ठिकाणी छापेमारी, पासपोर्ट अधिकारी आणि दलालांवर गुन्हे दाखल मुंबई : सीबीआयकडून (CBI) मुंबई (Mumbai) आणि नाशिक (Nashik) परिसरात एकूण 33 ठिकाणी छापेमारी (CBI Raid) करण्यात आली आहे. सीबीआयने पासपोर्ट अधिकाऱ्यांवर आणि दलालांवर एकूण बारा गुन्हे दाखल केले आहेत. पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सीबीआयचा दावा असून या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईतील परेल, मालाड परिसरात सीबीआयकडून मोठी छापेमारी करण्यात आली आहे. पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी केल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी करुन त्या बदल्यात काही एजंटच्या माध्यमातून पासपोर्ट अधिकाऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे आल्याचेही सीबीआयने म्हटले आहे. मुंबईसह नाशिक परिसरात सीबीआयने मोठे सर्च ऑपरेशन राबवत संशयास्पद कागदपत्र हस्तगत केली आहेत.


पुणे Porsche कार अपघात प्रकरणातील आरोपीचा निबंध आला समोर, नेमकं काय म्हणाला?

पुणे, प्रतिनिधी : पुण्यात 19 मे रोजी एक भीषण अपघात घडला होता. भरधाव पोर्शे कारनं दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीला चिरडलं. कल्याणीनगर परिसरात झालेल्या या अपघातामध्ये अपघातग्रस्त अभियंता तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे ही अलिशान कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच गाजलं, अपघात घडल्यानंतर तिथे असल्येल्या नागरिकांकडून या मुलाला मारहाण देखील करण्यात आली. मुलगा अल्पवयीनं असल्यानं हे प्रकरण बाल न्याय मंडळाकडे...


Nana Patole Full PC : भ्रष्ट लोकांचे सरदार नरेंद्र मोदी ; नाना पटोलेंची तिखट टीका

Nana Patole Full PC : भ्रष्ट लोकांचे सरदार नरेंद्र मोदी ; नाना पटोलेंची तिखट टीका पक्ष संघटनेत प्रत्येक ठिकाणी संघटनात्मक काम असले पाहिजे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला पाहिजे, त्या अनुषंगाने राज्यात 288 जागेवर आम्ही उमेदवारांची मागणी केली आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जागा वाटपामध्ये ज्या ज्या जागा मेरीटच्या आधारावर काँग्रेसला (Congress) सुटतील त्या त्या जागेवर आम्ही आमचा उमेदवार उभा करू. त्यामुळे पक्षाची तयारी करणं यात काही गैर नाही आणि त्यामुळे याचा कुठेही चुकीचा अर्थ लावू नये. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सर्व घटक पक्षांनी त्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. असे असले तरी आम्ही सर्व एकसाथ एका विचाराने पुढे जात आहोत. आगामी निवडणूक ही महाविकास आघाडीच्याच नावाने आम्ही लढणार आहोत. या चाचपणी संदर्भातील अर्थाचा अनर्थ कुणीही करू नये. असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या तयारीवर स्पष्टोक्ती दिली आहे. आज नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.


घोरण्यावर करा हे 9 घरगुती उपाय

घोरणे ही झोपेशी संबंधित समस्या आहे. घोरण्याचा आवाज नाकातून किंवा तोंडातून येऊ शकतो. हा आवाज झोपल्यानंतर कधीही सुरू किंवा थांबू शकतो.


Traffic Police | पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकून जळण्याचा प्रयत्न

Wadettiwar Reaction on Pune attempt to fire on Traffic Police


बुद्धीचा तो लोप

स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता वयाच्या साधारण ५७व्या वर्षानंतर असते. अलीकडे मात्र हा आकडा ‘वर’ आला आहे. अगदी तरुण मुलांना, लहान मुलांनाही विस्मरण होण्याच्या घटना बघायला मिळतात. कमी वयात साध्या-साध्या गोष्टी सहजपणे विसरणे अनेक संशोधनातून आढळून आलेले आहे. हे इंटरनेटच्या अतिवापरामुळे घडते आहे का?


Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6:30 AM : 06 JULY 2024

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6:30 AM : 06 JULY 2024 मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली ((सुरू होणार)), आजपासून ते १३ जुलैपर्यंत ही रॅली काढणार, १३ तारखेनंतर जरांगे पाटील आपली भूमिका ठरवणार. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांचा आरोप, तर आरोप करणारेच घोडेबाजार करतात, नाना पटोलेंचा पलटवार विश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, सूर्यकुमारच्या कॅचवरून रोहित शर्माची टोलेबाजी दोन वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट...टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग... टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडदरम्यान उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल मुंबई पोलिसांचं विधानभवनातही कौतुक, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि सूर्यकुमार यादवकडून कौतुकाची थाप लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मोदी आणि शिंदेंचे फोटो कशासाठी? विजय वडेट्टीवार आणि सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर..३ ते १० वर्षांची शिक्षा तसंच १ कोटी रुपये दंडाची तरतूद...मंंत्री शंभूराज देसाईंनी मांडलं विधेयक..


NEET-UG Counselings Postponed : NEET-UG परीक्षेचे समुपदेशन स्थगित, सर्वोच्च न्यायालयात ८ जुलैला होणार सुनावणी

NEET-UG Counselings Postponed : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने NEET UG समुपदेशन पुढे ढकलले आहे. नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.


Mhada Lottery 2024 : म्हाडा सोडतीतील घरांची किंमत 1,00,00,000; एरिया किती मिळतोय पाहिलं?

Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या सोडतीमध्ये सहभागी होऊ पाहणाऱ्यांसाठीची महत्त्वाची घोषणा काही दिवसांमध्येच होणार असून, आता यामध्ये कोणाच्या नशीबी हक्काच्या घराच्या चाव्या येतता हे पाहणं महत्त्वाचं असेल...


विज्ञानक्षेत्रात ‘ती’ कुठे?

जागतिक स्तरावर संशोधनात स्त्रियांचं प्रमाण ४१ टक्के असल्याचं दर्शवणारा एक नवीन अहवाल समोर आलाय. त्यानुसार सक्रिय संशोधकांमध्ये स्त्रियांचं प्रमाण वाढण्याच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.


Video : सेल्फीच्या नादात मृत्यू, चालत्या बाईकवरचा धक्कादायक अपघात कॅमेरात कैद

मुंबई : रील बनवणाऱ्यांची जगभरात कमी नाही. भारतीय लोकांमध्येतर रिल्सचं क्रेज आहे. तुम्हाला रस्त्यावर चालताना एक ना एक व्यक्ती रिल्स करताना दिेसेल. रिल्ससाठी लोक आपला जीव धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत. अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यात रील बनवताना लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, परंतु त्यानंतरही लोक त्यातून धडा घेत नाहीत.आता महाराष्ट्रातून एक व्हिडीओ समोर आला आहे. येथे चालत्या दुचाकीवरून सेल्फी घेणे महागात पडले. या दोघांपैकी एकाचा मृत्यू...


Tuljapur Chocolate Har : तुळजाभवानीला भक्ताकडून चॉकलेटचा हार

Tuljapur Chocolate Har : तुळजाभवानीला भक्ताकडून चॉकलेटचा हार तुळजाभवानी देवीला घातला चॉकलेटचा हार - चॉकलेटचा हार घातल्याने वाद उद्भवण्याची शक्यता भक्ताने दिलेला चॉकलेटचा हार पुजाऱ्याने मंदीर संस्थांच्या परवानगी विना घातला देवीला तुळजाभवानी मंदीर संस्थानला देऊन कवायत कायदा लागु असताना त्याची अमलबजावणी केली जात नसल्याचा पुजाऱ्याचा आरोप देवीच्या गाभाऱ्यात केवळ फुलांचे हार व फळांनी सजवला जातो गाभारा - ऐतिहासिक ठेवा असताना तो तसाच राहावा पुजारी मंडळाने व्यक्त केली भुमीका चॉकलेटचा हार घातल्याने वाद उद्भवण्याची शक्यता -चुकीची पध्दत नको - जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांची मागणी हेही वाचा : रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट, गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली ((सुरू होणार)), आजपासून ते १३ जुलैपर्यंत ही रॅली काढणार, १३ तारखेनंतर जरांगे पाटील आपली भूमिका ठरवणार. महायुतीचा आज संध्याकाळी मेळावा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला महत्त्व विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांचा आरोप, तर आरोप करणारेच घोडेबाजार करतात, नाना पटोलेंचा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट..राज्याच्या राजकारणासह विविध विषयांवर चर्चा विश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, सूर्यकुमारच्या कॅचवरून रोहित शर्माची टोलेबाजी. दोन वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट...टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग... पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर..३ ते १० वर्षांची शिक्षा तसंच १ कोटी रुपये दंडाची तरतूद...मंंत्री शंभूराज देसाईंनी मांडलं विधेयक..


Jogeshwari | जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी वायकरांना क्लीन चीट

What is jogeshwari land Scam


भारत जोडोनंतर पंढरीची वारी; राहुल गांधी पवारांसोबत सहभागी होणार? सुळे म्हणाल्या

पुणे, (रायचंद शिंदे, प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वारीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहे. मात्र, आता काँग्रेस नेते राहुल गांधी देखील पवारांसोबत वारीत चालणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. भेटीत पवार आणि...


Nagpur : उपचारासाठी पैसे नसल्याने दाम्पत्याची आत्महत्या

Nagpur : Nagpur couple sucide for no money tretment


Mumbai railway megablock : मुंबईकरांनो, उद्या घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक तपासा; तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

Mumbai local train Mega block news : मुंबईत रविवारी मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. देखभाल दुरुस्तीची कामे आणि सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी हा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.


Solapur Crime: एफडीएची मोठी कारवाई, लाखो रुपयांची किडकी सुपारी जप्त

Solapur News: सोलापुरात अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी किडकी सुपारीची तीन वाहने जप्त करत मोठी कारवाई केली आहे. वाहनात लाखो रुपयांची सुपारी आढळली असून एफडीएने काही नमुने प्रयोगशाळेकडे उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. या प्रकरणात अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत पुढील कारवाई सुरू आहे.


Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीला

Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीला Hathras stampede Bhole Baba : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोलेबाबा यांच्या सत्संगावेळी चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये 121 जणांचा बळी गेला. दुर्घटनेनंतरची दृश्य ही मन विषण्ण कऱणारी होती. देवाचा धावा करण्यासाठी आलेले भाविक थेट देवाघरी पोहोचलेत.यात कुणाची आई आहे.कुणाचा बाप आहे. कुणाची बहीण, कुणाचा भाऊ आहे. तर कुणाचे इवले इवले पोटचे गोळे आहेत. सिकंदराबादच्या फुलरई गावात भोलेबाबा नावाच्या महाराजाचा सत्संग आयोजित केला होता. आणि याच सत्संगानंतर, या बाबाच्या पायाखालची माती घेण्यासाठी जत्थेच्या जत्थे धावले. आणि त्यांच्या आयुष्याची अक्षरश: माती झालीय. जिथं हा सत्संग झाला तिथं आता भयाण स्मशान शांतता पसरलीय तर ज्यांचे जीव गेले त्यांच्या घरात फक्त आणि फक्त हंबरडा आणि आक्रोश उरला आहे. हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? सत्संगासाठी 80 हजार जणांची परवानगी असतानाही त्या दिवशी 2.50 लाख भाविक जमले होते. सत्संग संपल्यावर भोलेबाबाची चरणधूळ गोळा करण्यासाठी पळापळ झाली. चरणधुळीसाठी अनेक जण बसलेल्यांच्या अंगावरून धावत गेले. यामुळे अनेक जण खाली पडले, त्यांच्या अंगावरून लोक जात राहिले. काही क्षणांत या पळापळीचं चेंगराचेंगरीत रुपांतर झालं. पुढच्या बाजूनं सत्संग समितीचे लोक भाविकांना रोखत होते. त्यामुळे मागे गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरीची तीव्रता आणखी वाढली. या दुर्देवी घटनेमध्ये जीव गुदमरून 121 जणांचा मृत्यू झाला, यामध्ये 100 पेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे. अनेकजण यामध्ये जखमीही झाले.


Maharashtra Weather Update : हवामान खात्याने दिला पावसाचा इशारा, पण…

दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


Pune Police Attack News : महिला पोलिसावर जीवघेणा हल्ला; स्वत: सांगितला थरार Exclusive

Pune Police Attack News : महिला पोलिसावर जीवघेणा हल्ला; स्वत: सांगितला थरार Exclusive विद्येचं माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात (Pune News) नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न आता संपूर्ण राज्याला पडलाय. पुण्यात घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra News) पुन्हा एकदा हादरला आहे. पुण्यात महिला वाहतूक पोलीस (Traffic Police) अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल (Petrol) ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर येत आहे. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. या घटनेनं संपूर्ण पुणेच नव्हेतर अवघा महाराष्ट्र पुरता हादरून गेला आहे. फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर काल (शुक्रवारी) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू होती. ही कारवाई सुरू असताना महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न एका वाहनचालकाना केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती मिळत आहे. आरोपी संजय फकिरा साळवे (राहणार : पिंपरी चिंचवड (मूळगाव- जालना)) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीनं दारू पिऊन हे धक्कादायक कृत्य केलं असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


Aditya Thackeray On Adani : मुंबई गिळायची नाही त्याला आमचा कडाडून विरोध, ठाकरेंचा संताप

Aditya Thackeray On Adani : मुंबई गिळायची नाही त्याला आमचा कडाडून विरोध, ठाकरेंचा संताप


Ajit Pawar on Jayant Patil : जयंतराव, तुम्ही म्हणाल तिथे घेऊन जायला मी तयार

Ajit Pawar on Jayant Patil : जयंतराव, तुम्ही म्हणाल तिथे घेऊन जायला मी तयारजयंत पाटील यांनी अजित दादांच्या अर्थ संकल्पवर कवितेतून टीका केल्यानंतर अजित दादांनी देखील कवितेतून उत्तर दीले एवढं लक्षात ठेवा हे हे कवितेचे शीर्षक आहे कवितेतून जयंत पाटील याना टोला तुम्ही केलेल्या आरोपात काही तथ्य नाही जयंत पाटील हल्ली खूप शायरी करू लागलेत त्यामुळे मला देखील त्यांना उत्तर द्यावे लागेल शायरीतून अजित दादा यांचा जयंत पाटील याना पुन्हा टोला हल्ली सर्वांना वारीत चालावे असे वाटते त्यामुळे मी देखील पालखीत चालणार आहे जयंत राव येतील असे मला वाटत नाही ते आले तर मी मी त्यांना कुठेही घेऊन जायला तयार आहे काही काही लोकांना फक्त व्हिडीओ काढायचा उद्योग आहे काढायचे व्हिडीओ आणि टाकायचे महिलांनो कुणालाही पैसे देऊ नका...कोण तुमच्याकडे पैसे मागत असेल तर सांगा तुम्हाला ऑगस्ट मध्ये देखील पैसे आले तरी 1 जुलै पासून मिळतील रांगा लागू लागल्याने आम्ही अर्ज भरायची मुदत देखील वाढवून दिलीय पृथ्वीराज बाबा तुम्ही म्हणालात 1500 रुपये कसेल देता 5 हजार द्या अरे बाबा तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा दमडीही दिली नाही बाबा सांगतात आम्ही केंद्रात आलो असतो तर महिना साडे आठ हजार देऊ जर एवढं द्यायचं झालं तर अडीच लाख कोटी लागतील अरे आपल बजेट किती अजित पवार शब्दाचा पक्का आहे हा अजित दादांचा वादा आहे कधी खोटं बोलत नाही केंद्रातील योजना असली तरी हिशोब काढा 25 लाख कोटी लागतील काहीही पण न पटेल असे 2003 आणि 2004 ला सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते यांनी मोफत बिल ची घोषणा केली एकदा दीले आणि म्हणाले ही चूनावी घोषणा आहे आम्ही तेव्हा दुसऱ्या रांगेत बसायचो त्यामुळे फार काही चालत नव्हत आम्ही 9 हजार मेगा व्हॉट सौर वीज तयार करत आहोत..


Chandrapur News : बाबा आमटे यांच्या आनंदवनातील तरुणीच्या खून प्रकरणातील आरोपीचे टोकाचे पाऊल; पोलीस कोठडीतच संपवलं जीवन

Chandrapur Crime News : चंद्रपूर जिल्ह्यातील बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पात 4 दिवसांपूर्वी एका विवाहितेच्या खूनाचा खळबळजनक प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसानी आरोपीला अटक करून त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली होती. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या (Crime News) केल्याचा धक्कादायक प्रकार आज उजेडात आला आहे. समाधान माळी (वय वर्ष 25) असं गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या आरोपीचं नाव असून वरोरा पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्येच हा...


आज डब्यात काय द्यावे?

शाळा सुरू झाल्या आणि डब्यात काय द्यायचे, हा प्रश्न आईसमोर निर्माण झाला. रोजच्या पोळी- भाजीला मुले कंटाळतात, त्याची तक्रार करतात आणि मग डबा परत आणतात. डबा आवडता नसेल, तर मित्रांमध्ये वाटणे किंवा मुद्दाम सांडवणे, कुठे तरी विसरणे असेही प्रकार घडतात. मुलांना डबा देताना काय आवर्जून करावे, काय टाळावे, डब्यात विविधता कशी असावी याबाबतची ही माहिती. यासाठी पाच ते दहा या वयोगटातील विद्यार्थ्यांचा विचार केला आहे.


Devendra Fadnavis: फोटोग्राफर मुख्यमंत्री झाल्यास अडचण; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: एखाद्या व्यक्तीला फोटोग्राफीची आवड असेल आणि ते मुख्यमंत्री झाले, तर तिथे अडचण होते, असे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.