WORLD MALARIA DAY 2024: 'या' 10 लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, असू शकतो मलेरिया

World Malaria Day 2024: काही आजारांवर जर वेळीच उपचार केला नाही तर तो आजार जीवघेणा ठरु शकतो. मलेरियादेखील अशाच आजारांपैकी आहे. डास चावल्याने होणारा मलेरिया आजार हा तसा सर्वसामान्य आहे. प्लाझमोडियम परजीवी हे मलेरियाचे कारण असून संक्रमित ॲनोफिलीस डासाच्या चाव्याव्दारे पसरते. मलेरियाची लक्षणं आणि चिन्हं ही सौम्य किंवा गंभीर असू शकतात. त्यामुळे जर ही लक्षणं दिसत असली तर तात्काळ उपचार घेणं गरजेचं आहे. कारण जर मलेरियावर वेळीच उपचार घेतला नाही तर जीवही गमवावा लागू शकतो. 

मलेरियाची 10 लक्षणं कोणती?

जर तुम्हाला तुमच्या शरिरात हे 10 बदल दिसत असतील तर तुम्हाला मलेरिया झालेला असू शकतो. ही 10 लक्षणं कोणती आहेत हे जाणून घ्या. 

1) जास्त ताप आणि घाम येणे: 

जास्त ताप येणं हे सर्वसामान्यपणे आजारी पडल्याचं लक्षण आहे. तुम्हाला कोणत्याही आजारात किंवा स्थितीत ताप आलेला असू शकतो. पण सामान्यपणे मलेरिया असलेल्यांमध्येही हे लक्षण दिसून येतं. जर तुम्हाला खूप ताप आला असेल तर तात्काळ डॉक्टरांची भेट घ्या. अशा डॉक्टरांना भेटा जे तुम्हाला मलेरियाच्या निदानाची पुष्टी करण्यासाठी काही चाचण्यांची शिफारस करतील.

2) थंडी वाजणं

जर तुम्हाला थंडी वाजत असेल तर हे मलेरियाचं लक्षण असू शकतो. त्यामुळे आपल्या या लक्षणाकडे दुर्लक्ष करु नका. 

3) स्नायू दुखणे आणि डोकेदुखी 

जर मलेरिया झाला असेल तर तुम्हाला हे लक्षण सामन्यपणे जाणवेल. तुमचे स्नायू दुखतील आणि डोकंही सतत दुखेल. 

4) थकवा

तुम्हाला सतत थकवा जाणवत आहे का? रोजची कामं करताना तुम्हाला अडचण जाणवत आहे का? मग तुम्ही डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली आहे. अतिशय थकवा जाणवणं हे मलेरियाचं लक्षण आहे. 

5) मळमळ, जुलाब, उलट्या

मळमळ, जुलाब, उलट्या हे लक्षणं आरोग्याच्या इतर समस्यांसमध्येही जाणवतं. पण मलेरियातही ही लक्षणं जाणवतात. मळमळ म्हणजे उलट्या करण्याची इच्छा होणे, उलट्या करताना तोंडातून अन्न काढण्याची इच्छा होते. तसं असेल तर तात्काळ डॉक्टरांची भेट घ्या. 

6) खोकला

तुम्हाला सतत खोकला लागत आहे का? खोकल्यामुळे तुम्हाला दैनंदिन कामकाजात अडथळे येत आहेत का? सतत खोकला येत असल्याने तुम्ही इतरांच्या कामात व्यत्यय आणत आहात का? हे मलेरियाचं लक्षण असू शकतं. 

7) जलद श्वासोच्छ्वास

वेगाने श्वास घेणं हेदेखील मलेरियाचं लक्षण आहे. या लक्षणाकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. 

8) ओटीपोटात दुखणे 

जर पोटात तीव्र वेदना होत असतील तर तुम्हाला मलेरिया झालेला असू शकतो. जर आरोग्याशी तडतोड करायची नसेल तर तुम्ही तात्काळ अचूक निदान आणि उपचार करा. 

9) लघवीतून रक्त

मूत्रमार्गाच्या संसर्गाव्यतिरिक्त (यूटीआय), त्यातून रक्त येणं हेदेखील मलेरियाचं लक्षण असू शकतं.

10) पाठदुखी

तुमची पाठ सतत दुखत आहे का? पाठदुखीमुळे तुमचं कशातच लक्षत नाही आहे का? दुर्लक्ष करु नका, हे मलेरियाचं लक्षण असू शकतं. 

2024-04-24T14:03:02Z dg43tfdfdgfd