VIRAR : गणेश विसर्जनावेळी पालिकेच्या 24 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

विरार : गणेश विसर्जनावेळी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना राज्यभरात घडल्या आहेत. विरारमध्ये महापालिकेनं नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याचाच पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं समोर आलंय. फिट आल्यानं २४ वर्षांचा तरुण पाण्यात पडला. त्यानंतर तो बुडून मृत्यूमुखी पडला. विरार पूर्वला असलेल्या टोटाळे तलावात ही घटना घडली.

याबाबत मिळालेली माहिती असी की, अमित सतीश मोहिते याला वसई विरार पालिकेनं गणेश विसर्जनासाठी नियुक्त केलं होतं. गणेश विसर्जनासाठी तो टोटाळे तलावत होता. आज पहाटे गणेश विसर्जन सुरू असताना अमितला फिट आली आणि तो पाण्यात बुडाला. यात अमितचा मृत्यू झाल्यानं त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मविआनंतर तिसऱ्या आघाडीतही एमआयएमला नो एन्ट्री; बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं..

विसर्जनासाठी नागरिकांची गर्दी होती. तसंच पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. याशिवाय पालिकेची कर्मचारीसुद्धा टोटाळा तलावात होते. पण अमित पाण्यात पडल्यानंतर त्याला वाचवता आलं नाही. यामुळे कुटुंबियांसह नातेवाईकांना तीव्र संताप व्यक्त केला. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास केला जात आहे.

नाशिकमध्ये दोघांचा मृत्यू

नाशिकमध्ये गणपती विसर्जन सुरू असताना मोठी दुर्घटना घडली आहे. गणपती विसर्जनाला गेलेल्या दोन तरुणांचा वालदेवी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात ही घटना घडली आहे. ओंकार गाडे आणि स्वयंम मोरे अशी या बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहेत. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

2024-09-18T08:34:00Z dg43tfdfdgfd