Trending:


Rahul Gandhi Pune Sabha | मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस राहुल गांधींची पुण्यात प्रचारसभा

Rahul Gandhi Pune Sabha | Congress Rahul Gandhi's campaign rally in Pune to campaign for Mavia candidates


सुप्रिया सुळेंना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नोटीस


औषध उद्योगाची पुनर्बांधणी

सुमारे अडीच दशकांपूर्वीपर्यंत औषध निर्मितीच्या क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण होता. औषधांसाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच ‘एपीआय’ही भारतातच तयार होत असे; पण चीनने या क्षेत्रात घुसखोरी केली आणि स्वस्त दरात ‘एपीआय’ पाठवून भारतातील हे क्षेत्र विस्कळीत केले; परंतु कोरोना कालावधीनंतर भारताने या क्षेत्रात पुन्हा आत्मनिर्भर होण्यासाठी सुनियोजित पावले टाकली. भारत एवढ्या संख्येने औषध उद्योगाची पुनर्बांधणी करेल, याची …


Kerala Lottery Result Today LIVE: 80 लाख रुपये जिंकले, तुमचा आहे का हा नंबर?

केरळ: संपूर्ण केरळमध्ये प्रसिद्ध असलेल्या केरळ लॉटरीचा अखेर निकाल जाहीर झाला आहे. केरळ लॉटरी करुण्य प्लस केएन-520 चा निकाल गुरुवार 2 मे रोजी लाईव्ह करण्यात आला आहे. केरळ राज्य लॉटरी विभागाने लकी ड्रॉचे निकाल जाहीर केले आहेत. लाइव्ह अपडेट्स आणि जिंकण्याची संपूर्ण यादी पहा खालील क्रमांक5 व्या क्रमांकाचे विजेते , रक्कम 1,000 7873 7480 1666 6431 5553 2480 9497 0800 8399 0 960 5222 8966 5584 0090 1063 1970 9954 4529 8,000 जिंकणारे नंबर AREPA 168524PB...


Ganesh Rudraksha Benefits For Students: विद्यार्थ्यांसाठी फलदायी गणेश रुद्राक्ष,कधी आणि कसे धारण करावे जाणून घ्या

Ganesh Rudraksha Benefits For Students: एकमुखी रुद्राक्षापासून चौदा मुखांच्या रुद्राक्षापर्यंत रुद्राक्षाचे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात. विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते. गणेश रुद्राक्ष धारण केल्याने होणारे फायदे जाणून घेऊयात.


Konkan Railway Block: कोकण रेल्वे मार्गावर तब्बल 28 दिवसांचा मेगाब्लॉक; या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल, पाहा

Konkan Railway Block: रेल्वे मार्गाच्या देखभालीसाठी तसेच इतर कामांसाठी रेल्वे विभागामार्फत मेगाब्लॉक घेण्यात येतो. कोकण रेल्वे मार्गावरही तब्बल 28 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. सध्या कोकणात उन्ह्याळ्याच्या सुट्टीनिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. तसेच आगामी निवडणूकांमुळे मतदानाकरीता कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही संख्या जास्त आहे.


Navi Mumbai BJP Vs BJP | भाजपचे राजीनामा देणारे कार्यकर्ते गणेश नाईकांचे'; मंदा म्हात्रेंचा आरोप

Navi Mumbai BJP Vs BJP | of Ganesh Naik, an activist who resigned from the BJP'; Accusation of slow old men


NOTA असताना उमेदवार बिनविरोध कसा? सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल

एकच उमेदवार रिंगणात असेल तर अशावेळी NOTAला काल्पनिक उमेदवार समजलं जावं अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.


Loksabha Election 2024 Live Updates: प्रियंका गांधी निवडणूक लढणार नाहीत

Lok Sabha Elections Live Updates: प्रचारसभा, उमेदवारी, अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन हे मागील काही दिवसांपासून दिसत असलेलं चित्र आजही भारतामधील अनेक भागांमध्ये दिसत आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...


तीन आरटीओ अधिकारीच निघाले वाहनचोर; टोळी जेरबंद

कोपरखैरणे, पुढारी वार्ताहर : परराज्यांत चोरलेल्या अवजड वाहनांची महाराष्ट्रात बनावट कागदपत्रांसह नोंदणी करून नंतर ती विक्री करणारी टोळी नवी मुंबई पोलिसांच्या हाती लागली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीत अमरावती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील तीन अधिकारी आणि एका दलालाचा समावेश आहे. आरोपींकडून पोलिसांनी देशभरातून चोरलेली 5 कोटी 50 लाख 23 हजार रुपये किमतीची 29 वाहने हस्तगत …


Covishield vaccine: कोविशील्डमुळे वाढले हार्ट अटॅकचे प्रकरण? या गोष्टी किती तथ्य

अ‍ॅस्ट्राझेनेका या ब्रिटनमधल्या फार्मास्युटिकल कंपनीने अशी कबुली दिली आहे, की त्यांच्या कंपनीने विकसित केलेल्या कोविड-19 लशीमुळे काही साइड इफेक्ट्स होऊ शकतात. भारतातल्या सिरम इन्स्टिट्यूटने अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीच्या फॉर्म्युलापासूनच कोविशील्ड लस उत्पादित केली होती. ब्रिटनमधल्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीच्या विरोधात 51 खटले सुरू असून, त्यांपैकी अनेक खटल्यांमध्ये असा आरोप ठेवण्यात आला आहे, की त्या लशीमुळे प्राण गेले आहेत. तसंच अनेक जण गंभीररीत्या आजारी पडले आहेत. या संदर्भात भारतातले डॉक्टर्स काय म्हणतात, याविषयी जाणून घेऊ या. ज्या डॉक्टर्सनी कोरोना महासाथीचा बारकाईने अभ्यास केला होता, त्यांच्याशी इंडिया टुडेने संवाद साधला. आज तकने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये न्यूरॉलॉजिस्ट असलेल्या डॉ. सुधीर कुमार यांनी सांगितलं, की अॅस्ट्राझेनेका कंपनीने कोर्टात असं सांगितलं आहे, की कोविशील्ड आणि वॅक्सझेवरिया ब्रँडनेमने विकल्या जाणाऱ्या त्यांच्या लशीमुळे टीटीएस अर्थात थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम विथ थ्रोम्बोसिस हा साइड इफेक्ट होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्याआधीही कोविडसह अन्य लशींच्या प्रतिकूल प्रभावामुळे अॅक्वायर्ड टीटीएसची नोंद झाली आहे. टीटीएस म्हणजे एक अशी दुर्मीळ परिस्थिती, ज्यात रक्त गोठू लागतं आणि रक्तात प्लेटलेट्सची संख्या कमी होत जाते. डॉ. सुधीर कुमार यांनी सांगितलं, की लस घेतल्यानंतर साइड इफेक्ट झालेच, तर ते एक ते सहा आठवड्यांत दिसून येतात. त्यामुळे भारतात त्यांनी दोन वर्षांपूर्वी लस घेतली होती, त्यांनी घाबरण्याची काहीही गरज नाही. नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशनचे सहअध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी सांगितलं, की लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर पहिल्या महिन्यातच साइड इफेक्ट्स दिसून येऊ शकतात, त्यानंतर नाही. डॉ. जयदेवन यांनी असंही सांगितलं, की 'हे सारं ब्रिटनमधल्या माध्यमांनी प्रसारित केलं आहे. लशीमुळे होणाऱ्या टीटीएसवर आधीही चर्चा झाली आहे. डब्ल्यूएचओने मे 2021मध्ये यावर एक रिपोर्टही प्रसिद्ध केला होता.' डॉ. सुधीर यांनी सांगितलं, की लशीनंतर टीटीएस झाल्याच्या प्रकाराची अद्याप भारतात नोंद झालेली नाही. वेगवेगळ्या प्रकरणांत त्याची नोंद झाली आहे. कोविड लसीकरणानंतर टीटीएस होणं खूप दुर्मीळ आहे. ब्रिटन आणि युरोपीय संघात आतापर्यंत 1.7 कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली असून, गेल्या आठवड्यापर्यंत टीटीएसची 40 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. डॉ. सुधीर असंही म्हणाले, की 2021पासून कोविड लसीकरणानंतर जगभरात टीटीएसची अनेक प्रकरणं घडली आहेत. हे खुलासे नवे नाहीत. डॉ. सुधीर यांनी सांगितलं, की टीटीएस हा विकार 100 वर्षांपासून आपल्याला माहिती आहे. 1924 साली पहिल्यांदा या विकाराची नोंद झाली होती. डॉ. सुधीर यांनी सांगितलं, की कोविड लसीकरणामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढू शकतो; मात्र ती जोखीम खूप कमी आहे. कार्डिअॅक अरेस्ट किंवा हृदयविकाराचा झटका येण्यामागे लसीकरणाचं कारण असण्याची शक्यता नगण्य आहे. भारतासह अन्य अनेक देशांतल्या वैज्ञानिक संशोधनात हे सिद्ध झालं आहे. कोविडचा संसर्ग झाल्यास रक्ताच्या गुठळ्या बनण्याचा धोका वाढतो. तो कोविड लसीकरणाच्या तुलनेत किती तरी अधिक आहे. तरुणांना हृदयविकार होण्यामागे बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, डायबेटीस, कमी झोप, ताण, हाय कोलेस्टेरॉल, पॅकेज्ड फूड अशी अनेक कारणं असू शकतात. कोविड संसर्गामुळे हृदयविकाराचा धोका वाढला; मात्र खूपच कमी प्रकरणांमध्ये हृदयविकाराला कोविड लस कारणीभूत असू शकेल, असं डॉ. सुधीर म्हणाले. तरुणांना हृदयविकार होण्यामागे बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, डायबेटीस, कमी झोप, ताण, हाय कोलेस्टेरॉल, पॅकेज्ड फूड अशी अनेक कारणं असू शकतात. कोविड संसर्गामुळे हृदयविकाराचा धोका वाढला; मात्र खूपच कमी प्रकरणांमध्ये हृदयविकाराला कोविड लस कारणीभूत असू शकेल, असं डॉ. सुधीर म्हणाले. टीटीएस हा विकार एन्फ्लुएंझा, न्यूमोकोकल, एच वन एन वन, रेबीज आदी विकारांच्या लसीकरणामुळेही झाल्याच्या नोंदी आहेत, असंही डॉ. सुधीर यांनी सांगितलं. कोविड लशींची तुलना करण्यासाठी पुरेसा डेटा नसल्याचंही ते म्हणाले. डॉ. जयदेवन यांनी सांगितलं, की कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन्ही लशी प्रभावी आहेत. प्रत्येक लस आणि उपचारांचे काही ना काही साइफ इफेक्ट्स असतात. भारतात लस घेतलेले कोट्यवधी नागरिक जिवंत आहेत आणि व्यवस्थित आहेत. लशीचा वापर झाला नसता, तर अनेक जण आज जिवंत असले नसते.


सप्तपदी हवीच...

भारतीय समाजमान्यतेनुसार विवाह हा संस्कार आणि पवित्र बंधन असल्याने त्यात सप्तपदीचे महत्त्व आहे. या ठराविक विधींखेरीज हिंदू विवाहाला मान्यता मिळू शकणार नाही,’ असे स्पष्ट प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाने केले आहे.


Nashik City Transport : 'टोइंग' मुळे बेशिस्ती धारेवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नसताना तसेच रस्त्यांलगत अतिक्रमण कायम आहे. या समस्या जैसे थे असताना शहर पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी टोइंग कारवाईला १ मे पासून सुरुवात केली आहे. तीन वर्षांपूर्वीच्या जुन्या कंत्राटाला मुदत वाढ देत बेशिस्त वाहने टोइंग करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. त्यामुळे वाहनतळांऐवजी टोइंगचा मार्ग प्रशस्त …


बकुळीच्या फुलाचा गंध

परवा सहज म्हणून कपाट उघडले आणि काय व किती लिहिले आहे, याचा धांडोळा घेतला तर अलिबाबाची गुहाच सापडल्याचा आनंद झाला. इसवी सन १९८०च्या सुमारास लेखणी हातात धरली. बालकथा हा माझा अगदी आवडीचा प्रांत. अनेक वृत्तपत्रांतून अनेक बालकथा लिहिल्या. त्या बालकथांचे पुढे पुस्तक झाले. आणि अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. कुणी भेटून, गोष्ट आवडली म्हणून सांगे; ...


गोदरेज उद्योगसमूहाचे विभाजन

कुलपांपासून ते फ्रीजपर्यंत आणि साबणापासून रिअल इस्टेटपर्यंत अनेकविध व्यवसायांत हा समूह कार्यरत आहे. मात्र, स्थापनेनंतर १२७ वर्षांनी प्रथमच या समूहाच्या मालकीचे अधिकृत विभाजन झाले आहे.


तडका : माघारीचा विक्रम

सध्या निवडणुकांच्या काळात इंदूर आणि सुरत या स्वच्छ शहरांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसाही या दोन्ही शहरांचा आणि मराठी माणसांचा खूप जवळचा संबंध आहे. छत्रपती शिवरायांनी सुरतेवर स्वार्‍या करून इतिहासात सुरतेचे नाव अजरामर करून ठेवले आहे. इंदूरमध्ये असंख्य मराठी भाषिक लोक आहेत आणि होळकर कुटुंबाचे साम्राज्यही इंदूरमध्येच होते. सध्या सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये या दोन्ही …


SSC & HSC Result Date 2024: १० वी, १२ वीचा निकाल कधी लागतो? कुठे व कसा पाहावा, गतवर्षीची आकडेवारी काय सांगते?

मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेला तब्बल २६ लाख विद्यार्थी उपस्थित होते


शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनामुळे ठाणेकर कोंडीत

ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के हे शुक्रवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास निघाले आहे.


नवमतदारांच्या नजरेतून..

मूलभूत गरजांकडे लक्ष देऊ शकणाऱ्या आणि नवनवीन योजना राबवू शकणाऱ्या लोकप्रतिनिधीला निवडून देण्याकडे प्राधान्य असेल.’


कुतूहल : जेम्स लाइटहिल

या अहवालात असे संकेत आहेत की बुद्धिबळाच्या खेळात संगणकासारखे यंत्र माणसाला हरवू शकत नाही


'शहजादे' घाबरुन वायनाडमधून रायबरेलीत...! पीएम मोदींचा राहुल गांधींवर निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेठी आणि रायबरेलीचा तिढा काँग्रेसने अखेर शेवटच्या क्षणी सोडवला. काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या आई सोनिया गांधी यांचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून लोकसभा लढणार आहेत. काँग्रेसने शुक्रवारी याची घोषणा केली. तर दीर्घकाळ सोनिया गांधींचे प्रतिनिधी राहिलेले किशोरीलाल शर्मा अमेठीतून लढणार आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी …