US PRESIDENTIAL ELECTIONS 2024 | ट्रम्प यांच्यासमोर मोठे आव्हान, ओबामांचा कमला हॅरिस यांना पाठिंबा

पुढारी ऑनलाईन डेस्क

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी (US Presidential Elections 2024) कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. दोघांनी शुक्रवारी एक व्हिडिओ जारी करत कमला हॅरिस यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. त्यांनी जारी केलेल्या व्हिडिओनुसार, बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी कमला हॅरिस यांना फोन कॉलवर सांगितले की, "मिशेल आणि मी तुम्हाला पाठिंबा देताना अधिक अभिमान बाळगू शकत नाही आणि या निवडणुकीत तुम्हाला विजय मिळवून देण्यासाठी आम्ही जे काही करता येईल ते आम्ही करू."

दरम्यान, हॅरिस यांनी ओबामांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे आणि त्यांच्या दशकभराच्या मैत्रीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ओबामांना हॅरिस यांना पाठिंबा जाहीर केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आव्हान वाढले आहे.

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी २०२४ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतून (US Elections 2024) नुकतीच माघार घेतली. गेल्या रविवारी त्यांनी तसे जाहीर केले. तर माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यांना अमेरिकेच्या जनतेकडून मोठ्या प्रमाणात सहानभूती मिळताना दिसत आहे. दरम्यान, बायडेन यांच्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या घोषणेनंतर कमला हॅरिस यांना डेमोक्रॅट्सच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून समर्थन देण्यात आले होते.

2024-07-26T10:28:57Z dg43tfdfdgfd