SINDHUDURG RAIN : आठवडाभर पाऊस सुरूच

सिंधुदुर्ग : पुढारी वृत्तसेवा

गेल्या आठवडाभरापासून कोसळणार्‍या पावसाचा जोर शुक्रवारीही कायम होता. ठरावीक वेळेच्या अंतराने मुसळधार वादळी सरी कोसळत असल्याने अनेक ठिकाणी घरांवर तसेच रस्त्यांवर झाडे कोसळून नुकसान झाले. वीजतारांवर झाडे पडल्याने जिल्ह्याचा वीजपुरवठाही आठ दिवसांपासून विस्कळीत आहे. नद्यांची पूरस्थिती गंभीर नसली तरी सर्वच नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत होत आहे.

गुरुवार रात्रीपासूनच जिल्ह्यात वादळी वार्‍यासह मुसळधार सरी कोसळत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोसळून रहदारी ठप्प झाली. विशेषत: देवगड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर दिसून आला. शुक्रवारी सकाळी दिगवळे येथे कनेडी-नरडवे मार्गावर फणस व सागाचे झाड पडल्याने वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. ही झाडे लगतच्या वीज लाईनवर पडल्याने वीजेचे चार खांब जमिनदोस्त झाले तसेच वीज वाहिन्याही तुटल्या. नाटळ-कानडेवाडी शाळेच्या इमारतीवर झाड पडल्याने स्वच्छतागृह जमिनदोस्त झाले. तर शाळेच्या छप्पराची कौले व वासे तुटून नुकसान झाले.

सिंधुदुर्ग : नांदगाव तिठ्ठा येथे विद्यार्थ्यांनी भरविला बाजार

कुडाळ तालुक्यात कघरांची पडझड

कुडाळ तालुयात पावसाने घर, गोटे यांची पडझड होऊन काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी वादळी वार्‍यामुळे घरांवर झाडे पडून नुकसानीचे प्रमाण वाढले आहे. पडवे आंब्याचे गाळू येथील नारायण परब यांच्या घराच्या भिंत कोसळली. .बांबर्ड तर्फ कळसुली येथील तुकाराम पोळ यांच्या घरावर झाड पडले. पणदूर येथील शाम साईल यांच्या मांगरावर तर विलास शिरोडकर यांच्या घरावर आंब्याची फांदी पडून नुकसान झाले.

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यात पूरस्थिती

देवगड तालुक्यात लाखोंचे नुकसान

देवगड तालुक्यात शुक्रवारी वादळी वार्‍यासह झालेल्या अतिवृष्टीत ठिकठिकाणी पडझड होऊन सुमारे 1 लाख 11 हजार 700 रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात एकूण 42 मीमी पाऊस पडला असून शुक्रवार सकाळपासून पावसाने थोडीशी विश्रांती घेतली होती. मिठबाव नरेवाडी येथील शिवदास नरे यांच्या घर व गोठ्यावर फणसाचे झाड पडले. बुरंबावडे येथील प्राजक्ता शिंदे यांच्या घरावर रिठाचे झाड तर चिंचवड येथील सखाराम चौगुले व कुवळे येथील अंकुश तेली यांच्या मांगरावर तसेच गोवळ येथील विष्णू घाडी यांच्या घराच्या शेड वरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले.

2024-07-27T00:10:01Z dg43tfdfdgfd