बातम्या

Trending:


Devendra Fadnavis: फडणवीसांचे विरोधकांना थेट आव्हान; ...तर माझ्यावर हक्कभंग आणा

Devendra Fadnavis in Maharashtra Assembly : विधान परिषदेत सुरु असलेल्या चर्चेत विरोधी पक्षाने नोकरभरतीचा मुद्दा उपस्थित केला आणि पेपरफुटीच्या प्रश्नावर देखील सरकारला घेरले. यावर प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोचक शब्दांत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.


Sandeep Thapar attack | शिवसेना नेत्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, रस्त्यावर तलवारीने सपासप वार

पंजाबमधील शिवसेना नेते संदिप थापर यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. सुरक्षा कवच काढून घेतल्यानंतर काही दिवसातच रस्त्यात अडवून हा हल्ला झाला. निहंगा वेशातील दोन अज्ञातांनी स्कुटीवरुन जात असलेल्या थापर यांना अडवलं. आधी मागे बसलेल्या सुरक्षा रक्षकाला हाकलून दिलं आणि नंतर सपासप वार केले. रस्त्यावर जमलेल्या गर्दीपैकी कुणीही पुढे येऊन हल्ला रोखण्याची तसदी घेतली नाही. थापर यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंजाबच्या लुधियानामधील सरकारी रुग्णालयासमोरच हा प्रकार घडला.


ZERO HOUR With Sarita Kaushik | लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP Majha

नुकतीच जाहीर झालेल्या लाडकी बहीण योजनेबद्दल आम्ही तुम्हाला आधीही सांगितले आहे. मध्यप्रदेशात तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जी लाडली बहना योजना आणली.... त्याचा थेट परिणाम तिथे भाजपला प्रचंड बहुमत मिळण्यात झाला असे मानल्या जाते ... अवघ्या ४ महिन्यावर आलेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये हाच फायदा होण्यासाठी म्हणून आता महाराष्ट्र सरकारने हीच योजना राज्यात घोषित केल्याचे मानल्या जाते ... सत्तेची किल्ली म्हणून जर एखाद्या योजनेकडे बघितल्या जात असेल तर मग राजकारण दूर असू शकत नाही. सत्ताधारी त्याचा फायदा उचलायचा प्रयत्न करत असतानाच, विरोधक मात्र तो त्यांना कसा मिळू नये ह्यासाठी तत्परता दाखवणारच. आणि तेच आज विधी मंडळात बघायला मिळाले. , आज विरोधकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या अर्ज पत्रिकांवरुन आरोप केलेत.. त्याचं झालं असं की, लाडकी बहीण अर्जावर पाच नेत्यांचे फोटो आहेत.. अर्जाच्या वरच्या भागात दोन कोपर्यात दोन फोटो आहेत .... पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे. तर अर्जपत्रिकेच्या खालच्या भागात आहेत अजून तीन फोटो - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे. बस, नेमके हेच पाच फोटो विरोधकांना खटकले.. आणि आरोप सुरु झाले.


Alandi Dnyaneshwar Maharaj Palkhi : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान;देवाची आळंदी नादावली

Alandi Dnyaneshwar Maharaj Palkhi : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान;देवाची आळंदी नादावली अलंकापुरीत वारकरी दाखल झाला की आधी इंद्रायणी काठ गाठतो. आज तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. त्यामुळं याच इंद्रायणी काठी आज वारकऱ्यांची मांदियाळी पहायला मिळत आहे. वारकऱ्यांनी हे इंद्रायणी काठ कसं फुलून गेलंय आणि याप्रसंगी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने ही कशी खबरदारी घेतली आहे सुरक्षेच्या कारणास्तव NDRFचं पथक आळंदीत दाखल, कोणताही अनुचीत प्रकार घडूनये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी.संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज संध्याकाळी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार, आळंदीत वारकऱ्यांची मोठी गर्दी, विठू नामाच्या गजरात वारकऱ्यांचा उत्साह . अलंकापुरीत वारकरी दाखल झाला की आधी इंद्रायणी काठ गाठतो. आज तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. त्यामुळं याच इंद्रायणी काठी आज वारकऱ्यांची मांदियाळी पहायला मिळत आहे. वारकऱ्यांनी हे इंद्रायणी काठ कसं फुलून गेलंय आणि याप्रसंगी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने ही कशी खबरदारी घेतली आहे


ECHS Recruitment 2024: ईसीएचएसअंतर्गत ८वी पास ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरी; ७५,००० रुपये पगार

ECHS Recruitment 2024 Applications: तुम्ही आठवी पास असाल आणि सरकी नोकरीच्या शोधात असाल तर हि संधी वाया जाऊ देऊ नका. माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना म्हणजेच ईसीएचएस अंतर्गत ८ वी पास, १० वी पास, १२ वी पास आणि पदवीधर उमेदवारांची रिक्त पदांवर नियुक्त करण्यासाठी भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या जागांसाठी १५ जुलैपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.


Nana Patole Full PC : भ्रष्ट लोकांचे सरदार नरेंद्र मोदी ; नाना पटोलेंची तिखट टीका

Nana Patole Full PC : भ्रष्ट लोकांचे सरदार नरेंद्र मोदी ; नाना पटोलेंची तिखट टीका पक्ष संघटनेत प्रत्येक ठिकाणी संघटनात्मक काम असले पाहिजे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला पाहिजे, त्या अनुषंगाने राज्यात 288 जागेवर आम्ही उमेदवारांची मागणी केली आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जागा वाटपामध्ये ज्या ज्या जागा मेरीटच्या आधारावर काँग्रेसला (Congress) सुटतील त्या त्या जागेवर आम्ही आमचा उमेदवार उभा करू. त्यामुळे पक्षाची तयारी करणं यात काही गैर नाही आणि त्यामुळे याचा कुठेही चुकीचा अर्थ लावू नये. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सर्व घटक पक्षांनी त्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. असे असले तरी आम्ही सर्व एकसाथ एका विचाराने पुढे जात आहोत. आगामी निवडणूक ही महाविकास आघाडीच्याच नावाने आम्ही लढणार आहोत. या चाचपणी संदर्भातील अर्थाचा अनर्थ कुणीही करू नये. असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या तयारीवर स्पष्टोक्ती दिली आहे. आज नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.


Bullet Train Route Video: बोगदे, नद्या अन् पूल; पाहा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लाईनचा थक्क करणारा व्हिडिओ

Ahmedabad-Mumbai Bullet Train Route Video: बुलेट ट्रेनने अहमदाबाद ते मुंबई दरम्यानचा प्रवास 2 तास 7 मिनिटांत पूर्ण होईल. सध्या या दोन शहरांमधील प्रवासासाठी बसने 9 तास आणि ट्रेनने 6 तास लागतात. बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जातो. याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.


Manoj Jarange Rally : मनोज जरांगेंची आजपासून 13 जुलैपर्यंत शांतता रॅली

आज सकाळी मनोज जरांगे पाटील हिंगोलीतील शांतता जनजागृती रॅलीसाठी सकाळी समर्थकांसह अंतरवलीहून हिंगोलीकडे रवाना झाले आहेत. साधारणतः सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे हिंगोली जिल्ह्यात दाखल होतील. बळसोंड येथे सकाळी साडेदहाच्या आसपास क्रेनच्या साहाय्यानं 30 फुटांच्या गुलाबाच्या फुलांच्या हरानं त्यांचं जंगी स्वागत केलं जाईल. त्यानंतर सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ते छत्रपती शिवरायांना अभिवादन करतील. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता शांतता रॅलीला सुरुवात होईल आणि दुपारी 3 वाजता या शांतता रॅलीचा समारोप होईल. रॅलीचा समारोप मनोज जरांगे यांच्या भाषणानं होईल. त्यानंतर मनोज जरांगे पत्रकार परिषदही घेणार आहेत.


Theft Apology Letter: माफ करा, एका महिन्यात सर्वकाही परत करेन; चोरीनंतर चोराने लिहिला माफीनामा

Tamil Nadu theft thief gave guarantee to repay the money : एका सेवानिवृ्त्त शिक्षकाच्या घरी चोरी केल्यानंतर चोरांनी चक्क माफीनामा लिहून ठेवल्याची विचित्र घटना समोर आली आहे. या माफीनाम्यात चोरांनी महिनाभरात चोरीचा माल परत करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेची देशभरात चर्चा सुरू झाली आहे.


बुद्धीचा तो लोप

स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता वयाच्या साधारण ५७व्या वर्षानंतर असते. अलीकडे मात्र हा आकडा ‘वर’ आला आहे. अगदी तरुण मुलांना, लहान मुलांनाही विस्मरण होण्याच्या घटना बघायला मिळतात. कमी वयात साध्या-साध्या गोष्टी सहजपणे विसरणे अनेक संशोधनातून आढळून आलेले आहे. हे इंटरनेटच्या अतिवापरामुळे घडते आहे का?


बिहारची ‘अफसर बिटिया’

टिनू सिंगने २०२३ च्या मध्यंतरीच्या काळात लागोपाठ कॉम्प्युटर ऑपरेटर, सहाय्यक शाखा अधिकारी, बीपीएससी शिक्षक भरतीमधील तीन वेगवेगळ्या अशा एकूण पाच परीक्षा दिल्या होत्या. या सर्व परीक्षांचा निकाल डिसेंबर २०२३ मध्ये सलग पाच दिवस लागणार होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे टिनूच्या मेहनतीला यश आले आणि तिने ज्या पाच परीक्षा दिल्या होत्या त्या सर्व परीक्षांमध्ये ती अव्वल क्रमांकाने पास झाली. टिनूच्या या यशाने जमुई जिल्हाच नाही तर बिहारमध्ये ती चर्चेचा विषय...


Traffic Police | पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकून जळण्याचा प्रयत्न

Wadettiwar Reaction on Pune attempt to fire on Traffic Police


IRCTC Shirdi Packages: चला शिर्डी साईबाबाच्या दर्शनाला, आयआरसीटीसीच्या खास पॅकेजमध्ये त्र्यंबकेश्वरलाही भेट देता येणार

IRCTC Shirdi Special Packages: शिर्डीला जाण्याची इच्छा असलेल्या भाविकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण आयआरसीटीसीने तुमच्यासाठी एक खास पॅकेज लॉन्च केले आहे.या पॅकेजमध्ये तुम्हाला शिर्डीसोबतच त्र्यंबकेश्वरलाही भेट देता येणार आहे.


Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6:30 AM : 06 JULY 2024

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6:30 AM : 06 JULY 2024 मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली ((सुरू होणार)), आजपासून ते १३ जुलैपर्यंत ही रॅली काढणार, १३ तारखेनंतर जरांगे पाटील आपली भूमिका ठरवणार. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांचा आरोप, तर आरोप करणारेच घोडेबाजार करतात, नाना पटोलेंचा पलटवार विश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, सूर्यकुमारच्या कॅचवरून रोहित शर्माची टोलेबाजी दोन वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट...टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग... टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडदरम्यान उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल मुंबई पोलिसांचं विधानभवनातही कौतुक, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि सूर्यकुमार यादवकडून कौतुकाची थाप लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मोदी आणि शिंदेंचे फोटो कशासाठी? विजय वडेट्टीवार आणि सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर..३ ते १० वर्षांची शिक्षा तसंच १ कोटी रुपये दंडाची तरतूद...मंंत्री शंभूराज देसाईंनी मांडलं विधेयक..


Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींची टीका, मोदींता करारा जवाब

नवी दिल्ली : काही लोकांनी निवडणुकीच्या वेळी सर्व मार्गांचा अवलंब केला, पण त्यामध्ये त्यांना यश आलं नाही, काही लोकांच्या वेदना मी समजू शकतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधकांना टोला लगावला. खोटं पसरवूनही विरोधकांचा पराभव झाल्याचं ते म्हणाले. आपल्या कार्यकाळात देशातील 25 कोटी जनता गरिबीच्या बाहेर आली असं नरेंद्र मोदी म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देण्यास सुरूवात करताच लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी सभासदांना समज दिली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा खासदार झालेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केलं. तसेच जनतेने तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी देशवासियांचे आभार मानले.


Mumbai Police Special Report :मुंबई पोलीस,क्राऊड मॅनेजमेंटचे हिरो; त्यांच्या 'कर्तव्यदक्षते'ला सलाम

Mumbai Police Special Report :मुंबई पोलीस,क्राऊड मॅनेजमेंटचे हिरो; त्यांच्या 'कर्तव्यदक्षते'ला सलाम T20 विश्वचषक जिंकूण भारतीय संघाचे गुरूवारी मुंबईत जल्लोषात स्वागत झालं, मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम या मार्गावर टीम इंडियाची विजयी मिरवणूक पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. अपेक्षा पेक्षा जास्त नागरिक मिरवणूकीत सहभागी झाल्याने नागरिकांना आवरणंही पोलिसांसाठी जिकरीचं होतं. उत्तरप्रदेशच्या हातरसमध्ये घडलेल्या घटनेची पुर्नरावृत्ती होते की काय अशी परिस्थिती असताना. मुंबई पोलिसांनी 'सदरक्षणाय खलनिग्रणाय' या ब्रिद वाक्याप्रमाणे आपली भूमिका चोख बजावली. कालचा विजयोत्सव मुंबई पोलिसांनी कुठलेही गालबोट न लागता यशस्वी करून दाखवला. टिम इंडियाच सर्वांनीच कौतुकं केलं, मात्र समोर उसळलेला मानवी सागर आणि त्यात पोलिसांची भूमिका पाहून विश्वविजेत्यांनी पोलिसांचेच आभार मानले मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर भारतीय संघाचे आगमन झाले. विमानतळाबाहेरच चाहत्यांनी गर्दी केली होती. भारतीय खेळाडूंची बस ही मरीनड्राइव्हच्या दिशेने जात असताना रस्त्यांच्या दुतर्फा नागरिक भारतीय संघाला अभिवादन करण्यासाठी उभे होते. तर दुसरीकडे मरीनड्राइव्ह येते विजयी मिरवणूकीसाठीची गर्दी वाढतच होती. नियंत्रणाबाहेर गेलेली गर्दी संभाळण्यासाठी पोलिसांना वाढीवकूमक बोलवावी लागली. मरीनड्राइव्हचा परिसरात पाय ठेवायलाही जागा नसताना. टिम इंडिया NCPA पर्यंत पोहचणार कशी असा प्रश्न निर्माण झाला असताना. पोलिसांनी टिम इंडियाची बस मेट्रो सर्कलहून पुढे उच्च न्यायालयाच्या मार्गाने मंत्रालय वाल्मिकी चौकातून, उषा मेहता चौकातून NCPA पर्यंत पोहचवली. ऐनवेळी रूट बदलल्यामुळे क्रिकेटपट्टूंची सुरक्षाही तितकीच महत्वाची होती.


Chanakya Niti: या 5 ठिकाणी क्षणभरही थांबू नये, नाहीतर संकटांना द्याल आमंत्रण

आचार्य चाणक्य यांची गणना जगातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये केली जाते. त्यांनी रचलेली चाणक्य नीती आजही लाखो लोकांना आपल्या जीवनात मार्गदर्शन करते. चाणक्य नीतीद्वारे अनेक विद्यार्थी यशाच्या मार्गावर पुढे जातात. कारण चाणक्य नीतीमध्ये माणसाने आपल्या आयुष्यात काय केले पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे सांगितले आहे. आचार्य चाणक्यांच्या धोरणांमुळे महान चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी मगधमध्ये मौर्य वंशाची स्थापना केली होती. आचार्य...


UCO Bank Recruitment: परीक्षा न देता बँकेत नोकरी, युको बँकेने 'या' पदांसाठी मागवले अर्ज

UCO Bank Apprentice Recruitment 2024: युको बँकेत एकूण ५४४ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवार nats.education.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.


Tuljapur Chocolate Har : तुळजाभवानीला भक्ताकडून चॉकलेटचा हार

Tuljapur Chocolate Har : तुळजाभवानीला भक्ताकडून चॉकलेटचा हार तुळजाभवानी देवीला घातला चॉकलेटचा हार - चॉकलेटचा हार घातल्याने वाद उद्भवण्याची शक्यता भक्ताने दिलेला चॉकलेटचा हार पुजाऱ्याने मंदीर संस्थांच्या परवानगी विना घातला देवीला तुळजाभवानी मंदीर संस्थानला देऊन कवायत कायदा लागु असताना त्याची अमलबजावणी केली जात नसल्याचा पुजाऱ्याचा आरोप देवीच्या गाभाऱ्यात केवळ फुलांचे हार व फळांनी सजवला जातो गाभारा - ऐतिहासिक ठेवा असताना तो तसाच राहावा पुजारी मंडळाने व्यक्त केली भुमीका चॉकलेटचा हार घातल्याने वाद उद्भवण्याची शक्यता -चुकीची पध्दत नको - जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांची मागणी हेही वाचा : रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट, गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली ((सुरू होणार)), आजपासून ते १३ जुलैपर्यंत ही रॅली काढणार, १३ तारखेनंतर जरांगे पाटील आपली भूमिका ठरवणार. महायुतीचा आज संध्याकाळी मेळावा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला महत्त्व विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांचा आरोप, तर आरोप करणारेच घोडेबाजार करतात, नाना पटोलेंचा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट..राज्याच्या राजकारणासह विविध विषयांवर चर्चा विश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, सूर्यकुमारच्या कॅचवरून रोहित शर्माची टोलेबाजी. दोन वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट...टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग... पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर..३ ते १० वर्षांची शिक्षा तसंच १ कोटी रुपये दंडाची तरतूद...मंंत्री शंभूराज देसाईंनी मांडलं विधेयक..


Ravikant Tupkar | तुपकर काय भूमिका घेणार?

Ravikant Tupkar Today decide political decision


bihar bridge collapses : पडझडीचे वर्तमान

bihar ten bridges collapsed : बिहारमध्ये १५ दिवसांत एक, दोन नव्हे, तब्बल १० पूल कोसळले आहेत. पूल कोसळण्याच्या या दहा दुर्घटनांत मनुष्यहानी झालेली नाही, हा त्यातल्या त्यात दिलासा; पण, त्यामुळे कदाचित त्याचे गांभीर्यही अद्याप फारसे अधोरेखित झालेले नसेल.


Book Review : जगाचे पोट भरणारा शास्त्रज्ञ

leon hesser biography : खराब रस्ते, कृषी संशोधन केंद्रेही तशीच, अशा विपरीत परिस्थितीत बोरलॉग यांनी कृषिसंशोधन कसे केले? अन्नधान्य उत्पादन कसे वाढवले? त्यासाठी काय-काय प्रयत्न त्यांना करावे लागले? या सगळ्याचा आढावा या पुस्तकातून घेतला आहे.


Beed Two Wheeler Accident : धावत्या दुचाकीवरुन सेल्फीच्या नादात तरुणाने गमावला जीव

सध्या सेल्फिचा ट्रेण्ड आहे. धावत्या दुचाकीवरून सेल्फी रिल बनवीत असतानाच अपघात होवून एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय. घटना राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपास वर घडली आहे. अपघात होतानाची दृश्ये त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडीओत कैद झाली आहेत. दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत.


Uddhav Thackeray Apologized: 'दानवेंच्या वक्तव्याबद्दल मी माफी मागतो', उद्धव ठाकरेंनी मागितली राज्यातील माता-भगिनींची माफी

Uddhav Thackeray Apologized For Ambadas Danve's Statement: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात सोमवारी सभागृहात जोरदार राडा झाला होता. यावेळी अंबादास दानवे यांनी लाड यांना शिविगाळ केल्याची घटना घडली. त्यानंतर आज दानवेंचे निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी दानवेंच्या वक्तव्यासाठी राज्यातील माता भगिनींची माफी मागितली आहे.


विज्ञानक्षेत्रात ‘ती’ कुठे?

जागतिक स्तरावर संशोधनात स्त्रियांचं प्रमाण ४१ टक्के असल्याचं दर्शवणारा एक नवीन अहवाल समोर आलाय. त्यानुसार सक्रिय संशोधकांमध्ये स्त्रियांचं प्रमाण वाढण्याच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.


ईडब्ल्यूएस, एसईबीसीसह ओबीसी विद्यार्थिनींसाठी सरकारची मोठी घोषणा

मुंबई : महायुती सरकारने आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणा केल्या आहेत. खास महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. अशात आता विद्यार्थ्यांनाही सरकारने गुड न्यूज दिली आहे. राज्य सरकारने ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा केली आहे.राज्य मंत्री मंडळ बैठकीत मोठा निर्णयव्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग(एसईबीसी) आणि इतर...


पुणे Porsche कार अपघात प्रकरणातील आरोपीचा निबंध आला समोर, नेमकं काय म्हणाला?

पुणे, प्रतिनिधी : पुण्यात 19 मे रोजी एक भीषण अपघात घडला होता. भरधाव पोर्शे कारनं दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीला चिरडलं. कल्याणीनगर परिसरात झालेल्या या अपघातामध्ये अपघातग्रस्त अभियंता तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे ही अलिशान कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच गाजलं, अपघात घडल्यानंतर तिथे असल्येल्या नागरिकांकडून या मुलाला मारहाण देखील करण्यात आली. मुलगा अल्पवयीनं असल्यानं हे प्रकरण बाल न्याय मंडळाकडे...


गांधी कुटुंबातला पहिला वारकरी!

संतोष गोरे, प्रतिनिधीलोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणार आहेत. राहुल गांधी 14 जुलैला वारीत सहभागी होणार आहेत. शरद पवारांनी दिलेलं निमंत्रण राहुल गांधींनी स्वीकारलं. मात्र आता जोरदार राजकारण सुरू झालं आहे. शरद पवारांना हा अधिकार कुणी दिला? असा सवाल भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसलेंनी उपस्थित केला आहे. तर भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी, पालखी सोहळ्यात कॅटवॉक करण्यापेक्षा...


भूगोलाचा इतिहास : असाही एक ‘वायुदूत’

आपल्याकडे वायू हा पंचमहाभूतांपैकी एक मानला असून वायुदेवतेचा उल्लेख वेद, महाकाव्ये, पुराणे व अनेक दंतकथा आणि काव्यात आहे.


आज डब्यात काय द्यावे?

शाळा सुरू झाल्या आणि डब्यात काय द्यायचे, हा प्रश्न आईसमोर निर्माण झाला. रोजच्या पोळी- भाजीला मुले कंटाळतात, त्याची तक्रार करतात आणि मग डबा परत आणतात. डबा आवडता नसेल, तर मित्रांमध्ये वाटणे किंवा मुद्दाम सांडवणे, कुठे तरी विसरणे असेही प्रकार घडतात. मुलांना डबा देताना काय आवर्जून करावे, काय टाळावे, डब्यात विविधता कशी असावी याबाबतची ही माहिती. यासाठी पाच ते दहा या वयोगटातील विद्यार्थ्यांचा विचार केला आहे.


Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाचा ‘जांगडगुत्ता’!

Maharashtra Sadan Delhi : अयोध्येत, जम्मू-काश्मीरमध्ये सरकारने नवी महाराष्ट्र सदने सदने जरूर बांधावीत. पण आधी राजधानीतल्या दोन्ही सदनांतील प्रशासकीय अनास्थेचा, गडबड-गोंधळाचा ‘जांगडगुत्ता’ सोडवावा. ती इच्छाशक्ती राज्य सरकार कधी दाखवणार?


Beed Parli Firing : परळीतील गोळीबार, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंचा गोळीबारात मृत्यू

Beed Parli Firing : परळीतील गोळीबार, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बातमी अपडेट होत राहील हे देखील वाचा ब्रेकिंग! पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई! मुंबई, नाशिकमध्ये 33 ठिकाणी छापेमारी, पासपोर्ट अधिकारी आणि दलालांवर गुन्हे दाखल मुंबई : सीबीआयकडून (CBI) मुंबई (Mumbai) आणि नाशिक (Nashik) परिसरात एकूण 33 ठिकाणी छापेमारी (CBI Raid) करण्यात आली आहे. सीबीआयने पासपोर्ट अधिकाऱ्यांवर आणि दलालांवर एकूण बारा गुन्हे दाखल केले आहेत. पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सीबीआयचा दावा असून या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईतील परेल, मालाड परिसरात सीबीआयकडून मोठी छापेमारी करण्यात आली आहे. पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी केल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी करुन त्या बदल्यात काही एजंटच्या माध्यमातून पासपोर्ट अधिकाऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे आल्याचेही सीबीआयने म्हटले आहे. मुंबईसह नाशिक परिसरात सीबीआयने मोठे सर्च ऑपरेशन राबवत संशयास्पद कागदपत्र हस्तगत केली आहेत.


Mhada Lottery 2024 : म्हाडा सोडतीतील घरांची किंमत 1,00,00,000; एरिया किती मिळतोय पाहिलं?

Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या सोडतीमध्ये सहभागी होऊ पाहणाऱ्यांसाठीची महत्त्वाची घोषणा काही दिवसांमध्येच होणार असून, आता यामध्ये कोणाच्या नशीबी हक्काच्या घराच्या चाव्या येतता हे पाहणं महत्त्वाचं असेल...


NEET-UG Counselings Postponed : NEET-UG परीक्षेचे समुपदेशन स्थगित, सर्वोच्च न्यायालयात ८ जुलैला होणार सुनावणी

NEET-UG Counselings Postponed : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने NEET UG समुपदेशन पुढे ढकलले आहे. नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.


maratha reservation : जरांगेची हिंगोलीतून जनजागृती रॅली सुरू होणार

maratha reservation : Jarange marathwada rally


NEET प्रकरणातील आरोपींची आज CBI कोठडी संपणार, लातूर कोर्टात हजर करणार

Today Neet Accused CBI Custody Will Over


विरारमध्ये पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदार कैलास टेकवडे (४७) यांनी विरार येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.