RBI RECRUITMENT : आरबीआयमध्ये ऑफिसर बनण्याची संधी, ‘इतक्या’ जागा भरणार, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

RBI Officers Recruitment 2024: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार rbi.org.in येथे आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.  या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

या भरती मोहिमेत संस्थेतील ९४ पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे. पहिला आणि दुसरा टप्पा सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये होणार आहे. त्यासाठीच्या तारखा खाली दिलेल्या सविस्तर अधिसूचनेवर दिल्या आहेत.

RRB JE Recruitment 2024 : रेल्वेमध्ये मेगा भरती! तब्बल ७ हजार ९३४ कनिष्ठ अभियंत्यांची पदे भरणार! असा करा अर्ज

पात्रता निकष

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी कोणत्याही विषयातील पदवी / समतुल्य तांत्रिक किंवा व्यावसायिक पात्रता किमान ६० टक्के गुणांसह (एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी अर्जदारांसाठी ५० टक्के) किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर / समकक्ष तांत्रिक किंवा व्यावसायिक अर्हता कमीतकमी ५५ टक्के गुणांसह (एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी अर्जदारांसाठी उत्तीर्ण गुण) सर्व सेमिस्टर / वर्षे असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेत पहिला, दुसरा टप्पा आणि मुलाखत यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षेत २०० गुणांचा एकच पेपर असेल आणि तो ८ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात येईल. उमेदवारांच्या संख्येनुसार ही परीक्षा अनेक शिफ्टमध्ये आणि इतर काही दिवशीही घेतली जाऊ शकते. पहिल्या टप्प्याच्या निकालाच्या आधारे आणि बोर्डाने निश्चित केलेल्या कट ऑफच्या आधारे शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांसाची १९ ऑक्टोबर २०२४ रोजी ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड केली जाईल.

अर्ज शुल्क

अर्ज शुल्क एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी प्रवर्गासाठी १००+ १८ टक्के जीएसटी, जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी ८५०+ १८ टक्के जीएसटी आहे. डेबिट कार्ड (रुपे/व्हिसा/मास्टरकार्ड/मेस्ट्रो), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, आयएमपीएस, कॅश कार्ड/मोबाइल वॉलेट, यूपीआय चा वापर करून पेमेंट करता येते. अधिक संबंधित माहितीसाठी उमेदवार आरबीआयची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच आयओसीएल येथे कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण, अभियांत्रिकी सहाय्यक पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली. पात्र उमेदवार iocl.com येथे आयओसीएलच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेमुळे संस्थेतील ४७६ पदे भरली जाणार आहेत. नोंदणी प्रक्रिया २२ जुलै २०२४ रोजी सुरू झाली असून २१ ऑगस्ट २०२४ पर्यंत चालणार आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

2024-07-27T11:35:45Z dg43tfdfdgfd