RAJ THACKERAY: भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याच्या मोबदल्यात राज ठाकरेंना काय मिळणार? भाजपचा बडा नेता म्हणाला...

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी  लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि भाजपला (BJP)   बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.   नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून आपण या लोकसभा निवडणुकीवेळी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे राज यांनी सांगितले.  मात्र राज ठाकरेंनी पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंना त्या बदल्यात काय मिळाले? या चर्चांना उधाण आले होते. अखेर  भाजपला पाठिंबा दिल्याचा मोबादला राज ठाकरेंना भविष्यात मिळणार आहे. ही माहिती एबीपी माझाला भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.   

लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिल्याचा मोबदला भविष्यात ठाकरेंना मिळणार आहे. विधानसभेत राज ठाकरेंच्या पक्षाचा विचार केला जाणार आहे. राज ठाकरे जर आधी चर्चेला आले असते, तर लोकसभेला जागा मिळाल्या असत्या.  मात्र राज ठाकरे यांच्यासोबत अंतिम टप्प्यात चर्चा सुरू झाल्याने ठाकरेंच्या दृष्टीकोनातून बोलणी होऊ शकली नाही, अशी माहिती  भाजपमधील खात्रीलायक  वरिष्ठ सूत्रांनी  दिली आहे.  

राज ठाकरेंच्या निर्णयानंतर मनसेत राजीनामासत्र

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले राज ठाकरेंचे कट्टर चाहते असलेल्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय मान्य करुन विधानसभेची तयारी सुरु केली आहे. तर मनसेतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राज ठाकरेंचा हा निर्णय फारसा न रुचल्याने मनसेत राजीनामा सत्र झाले.त्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी मनसेला रामराम करत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला.

ईडीचे चक्र मागे म्हणून  पाठिंबा दिल्याच्या चर्चांना उधाण

राज ठाकरेंनी पाठिंबा दिल्यानंतर ईडीचे चक्र मागे लागले म्हणून पाठिंबा दिला, अशी देखील त्यांच्यावर टीका झाली.   राज ठाकरे मेळाव्यात चुकचुकल्यासारखे आणि सैरभैर दिसत होते. त्यांना काय म्हणायचं होतं हेच कळत नव्हते. त्यांनी मोदींवर टीका केली, नोटाबंदी, बेरोजगारीवर बोलले, त्यांचं काम आतापर्यंत नीट नव्हतं म्हणून टीका केलीमधूनच उद्धव ठाकरेंवरही टोला मारायचे. भाजपाला पाठिंबा जाहीर करण्याच्या आधी ते म्हणाले की व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. आणि स्वतःच त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला. ईडीचं चक्र होतं म्हणूनच बिनशर्त पाठिंबा दिला का? असा टोला अंजली दमानिया यांनी लगावला होता. 

हे ही वाचा :

CM Eknath Shinde: लंडन ते लखनौ, ठाकरेंची सर्व कागदपत्रे माझ्याकडे, मर्यादा पाळा अन्यथा सर्व बाहेर काढेन: एकनाथ शिंदे

2024-04-24T05:54:04Z dg43tfdfdgfd