RAIGAD ROPEWAY | किल्ले रायगड रोपवे दुपारी दोनपर्यंत पर्यटकांसाठी बंद, हे आहे कारण

नाते : पुढारी वृत्तसेवा

एनडीआरएफच्या वतीने गुरुवारी (19 सप्टेंबर) रायगड रोप वे येथे मॉक ड्रिल (सुरक्षा सराव) आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे रोप वे दुपारी दोन वाजेपर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रात रोपवे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, प्रतिवर्षी शासनाच्या एनडीआरएफ या सुरक्षा पथकाकडून या परिसरात सुरक्षा सराव केला जातो. पावसाळा हंगाम संपत आला असून श्री गणेशोत्सवाची सुट्टी देखील पूर्ण झाल्याने शाळा महाविद्यालय पुन्हा सुरू होणार असले तरीही रोपवे प्रशासनाकडे येणार्‍या गणेश भक्तांच्या संख्येत सातत्याने होणारी वाट लक्षात घेता गुरुवारी होणार्‍या या सुरक्षा सरावामुळे गणेश भक्तांना त्रास होऊ नये यासाठी किल्ले रायगडावर येणार्‍या शिवभक्त पर्यटकांनी याची नोेंद घ्यावी असे आवाहन रोप वे प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

2024-09-19T07:20:19Z dg43tfdfdgfd