बातम्या

Trending:


IndiGo flight News: मुंबईला येणाऱ्या विमानातील प्रवाशानं हद्दच केली, टॉयलेटमध्ये गेला अन्…

Delhi-Mumbai IndiGo flight: दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानाच्या स्वच्छतागृहात धुम्रपान केल्याप्रकरणी एका ३८ वर्षीय प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


Mumbai : मुंबईत आज महायुतीचा मेळावा

Mumbai : Todays Mumbai Mahayuti meeting


शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्व्हेक्षणासाठी विशेष मोहीम

या मोहिमेतंर्गत होणारे सर्व्हेक्षण गावात, शहरात, गजबजलेल्या वस्त्या, रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाजार, झोपडपट्टी, गावाबाहेरील पाल आदी ठिकाणी होणार आहे.


IRCTC Shirdi Packages: चला शिर्डी साईबाबाच्या दर्शनाला, आयआरसीटीसीच्या खास पॅकेजमध्ये त्र्यंबकेश्वरलाही भेट देता येणार

IRCTC Shirdi Special Packages: शिर्डीला जाण्याची इच्छा असलेल्या भाविकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण आयआरसीटीसीने तुमच्यासाठी एक खास पॅकेज लॉन्च केले आहे.या पॅकेजमध्ये तुम्हाला शिर्डीसोबतच त्र्यंबकेश्वरलाही भेट देता येणार आहे.


NEET-UG Counselings Postponed : NEET-UG परीक्षेचे समुपदेशन स्थगित, सर्वोच्च न्यायालयात ८ जुलैला होणार सुनावणी

NEET-UG Counselings Postponed : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने NEET UG समुपदेशन पुढे ढकलले आहे. नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.


Book Review : जगाचे पोट भरणारा शास्त्रज्ञ

leon hesser biography : खराब रस्ते, कृषी संशोधन केंद्रेही तशीच, अशा विपरीत परिस्थितीत बोरलॉग यांनी कृषिसंशोधन कसे केले? अन्नधान्य उत्पादन कसे वाढवले? त्यासाठी काय-काय प्रयत्न त्यांना करावे लागले? या सगळ्याचा आढावा या पुस्तकातून घेतला आहे.


Ajit Pawar on Jayant Patil : जयंतराव, तुम्ही म्हणाल तिथे घेऊन जायला मी तयार

Ajit Pawar on Jayant Patil : जयंतराव, तुम्ही म्हणाल तिथे घेऊन जायला मी तयारजयंत पाटील यांनी अजित दादांच्या अर्थ संकल्पवर कवितेतून टीका केल्यानंतर अजित दादांनी देखील कवितेतून उत्तर दीले एवढं लक्षात ठेवा हे हे कवितेचे शीर्षक आहे कवितेतून जयंत पाटील याना टोला तुम्ही केलेल्या आरोपात काही तथ्य नाही जयंत पाटील हल्ली खूप शायरी करू लागलेत त्यामुळे मला देखील त्यांना उत्तर द्यावे लागेल शायरीतून अजित दादा यांचा जयंत पाटील याना पुन्हा टोला हल्ली सर्वांना वारीत चालावे असे वाटते त्यामुळे मी देखील पालखीत चालणार आहे जयंत राव येतील असे मला वाटत नाही ते आले तर मी मी त्यांना कुठेही घेऊन जायला तयार आहे काही काही लोकांना फक्त व्हिडीओ काढायचा उद्योग आहे काढायचे व्हिडीओ आणि टाकायचे महिलांनो कुणालाही पैसे देऊ नका...कोण तुमच्याकडे पैसे मागत असेल तर सांगा तुम्हाला ऑगस्ट मध्ये देखील पैसे आले तरी 1 जुलै पासून मिळतील रांगा लागू लागल्याने आम्ही अर्ज भरायची मुदत देखील वाढवून दिलीय पृथ्वीराज बाबा तुम्ही म्हणालात 1500 रुपये कसेल देता 5 हजार द्या अरे बाबा तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा दमडीही दिली नाही बाबा सांगतात आम्ही केंद्रात आलो असतो तर महिना साडे आठ हजार देऊ जर एवढं द्यायचं झालं तर अडीच लाख कोटी लागतील अरे आपल बजेट किती अजित पवार शब्दाचा पक्का आहे हा अजित दादांचा वादा आहे कधी खोटं बोलत नाही केंद्रातील योजना असली तरी हिशोब काढा 25 लाख कोटी लागतील काहीही पण न पटेल असे 2003 आणि 2004 ला सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते यांनी मोफत बिल ची घोषणा केली एकदा दीले आणि म्हणाले ही चूनावी घोषणा आहे आम्ही तेव्हा दुसऱ्या रांगेत बसायचो त्यामुळे फार काही चालत नव्हत आम्ही 9 हजार मेगा व्हॉट सौर वीज तयार करत आहोत..


Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6:30 AM : 06 JULY 2024

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6:30 AM : 06 JULY 2024 मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली ((सुरू होणार)), आजपासून ते १३ जुलैपर्यंत ही रॅली काढणार, १३ तारखेनंतर जरांगे पाटील आपली भूमिका ठरवणार. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांचा आरोप, तर आरोप करणारेच घोडेबाजार करतात, नाना पटोलेंचा पलटवार विश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, सूर्यकुमारच्या कॅचवरून रोहित शर्माची टोलेबाजी दोन वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट...टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग... टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडदरम्यान उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल मुंबई पोलिसांचं विधानभवनातही कौतुक, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि सूर्यकुमार यादवकडून कौतुकाची थाप लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मोदी आणि शिंदेंचे फोटो कशासाठी? विजय वडेट्टीवार आणि सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर..३ ते १० वर्षांची शिक्षा तसंच १ कोटी रुपये दंडाची तरतूद...मंंत्री शंभूराज देसाईंनी मांडलं विधेयक..


bihar bridge collapses : पडझडीचे वर्तमान

bihar ten bridges collapsed : बिहारमध्ये १५ दिवसांत एक, दोन नव्हे, तब्बल १० पूल कोसळले आहेत. पूल कोसळण्याच्या या दहा दुर्घटनांत मनुष्यहानी झालेली नाही, हा त्यातल्या त्यात दिलासा; पण, त्यामुळे कदाचित त्याचे गांभीर्यही अद्याप फारसे अधोरेखित झालेले नसेल.


Chanakya Niti: या 5 ठिकाणी क्षणभरही थांबू नये, नाहीतर संकटांना द्याल आमंत्रण

आचार्य चाणक्य यांची गणना जगातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये केली जाते. त्यांनी रचलेली चाणक्य नीती आजही लाखो लोकांना आपल्या जीवनात मार्गदर्शन करते. चाणक्य नीतीद्वारे अनेक विद्यार्थी यशाच्या मार्गावर पुढे जातात. कारण चाणक्य नीतीमध्ये माणसाने आपल्या आयुष्यात काय केले पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे सांगितले आहे. आचार्य चाणक्यांच्या धोरणांमुळे महान चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी मगधमध्ये मौर्य वंशाची स्थापना केली होती. आचार्य...


Weather update : महाराष्ट्रावर धडकणार मोठं संकट; पुढील 2 दिवस महत्त्वाचे

महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (IMD)देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागात आज पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सोबतच वादळी वाऱ्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. विदर्भात समाधानकारक पाऊस झाला नव्हता मात्र गेले दोन दिवस पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान पुढील 24 तासांमध्ये विदर्भात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकणाबाबत बोलायचं झाल्यास पुढील 24 तासांमध्ये कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ढगाळ वातावरण राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. मुंबईत पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या काळात मुंबईचं तापमान 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान या काळात नुसता पाऊसच पडणार नसून, वादळाच्या रुपानं मोठं संकट देखील समोर आहे. या काळात ताशी 50 ते 60 किमी वेगानं वारं वाहू शकतं असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून आज पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.


चंद्रमौळी

डोक्यावर चंद्र धारण करणारा, अशा अर्थाने या दोन्ही ठिकाणी ‘चंद्रमौळी’ असा शब्द वापरला जातो. गरिबी असली, अगदी छतही नीट शाकारलेले नसले, तरी घरामध्ये चंद्र उतरणे ही बाब साहित्यिकांनी शब्दबद्ध केली.


Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?

Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी कोणीच मागे न घेतल्याने 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. 12 जुलैला विधान परिषदेसाठी विधीमंडळात मतदान पार पडणार आहे. गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. महायुतीचे नऊ उमेदवार रिंगणात 12 जुलै रोजी होणाऱ्या महाराष्ट्रातील 11 जागांवर होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी 12 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज कायम आहेत....


विज्ञानक्षेत्रात ‘ती’ कुठे?

जागतिक स्तरावर संशोधनात स्त्रियांचं प्रमाण ४१ टक्के असल्याचं दर्शवणारा एक नवीन अहवाल समोर आलाय. त्यानुसार सक्रिय संशोधकांमध्ये स्त्रियांचं प्रमाण वाढण्याच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.


Sant Tukaram Maharaj Palkhi 2024: पुणेकरांसाठी मोठी बातमी! पालखींच्या आगमनानिमित्त उद्या वाहतुकीत बदल; कोणते रस्ते बंद?

Sant Tukaram Maharaj Palkhi: शहरात पालखी मार्गावरील रस्ते दुपारी दोनपासून आवश्यकतेनुसार बंद केले जाणार आहेत. या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.


ठाणे महापालिकेतील पाच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, उपायुक्त मनिष जोशी यांच्यासह इतर पाचजणांचा समावेश, उपायुक्त जोशी यांनी आरोप फेटाळून लावले

ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनिष जोशी यांच्यासह पाच जणांवर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल केला आहे.


Zika Virus Advisory: झिका व्हायरसचा धोका वाढतोय? आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना ॲडव्हायझरी जारी

Union Health Ministry Issues Advisory to States in view of Zika virus: महाराष्ट्रातील झिका विषाणूची प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना अॅडव्हायजरी जारी केली आहे. झिका विषाणूच्या संसर्गासाठी गर्भवती महिलांची तपासणी करून आणि झिका पॉझिटिव्ह आलेल्या गर्भवती मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवत राज्यांनी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रुग्णालयांचा परिसर एडिस डासमुक्त ठेवण्यासाठी, निरीक्षण करण्यासाठी...


maratha reservation : जरांगेची हिंगोलीतून जनजागृती रॅली सुरू होणार

maratha reservation : Jarange marathwada rally


Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीला

Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीला Hathras stampede Bhole Baba : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोलेबाबा यांच्या सत्संगावेळी चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये 121 जणांचा बळी गेला. दुर्घटनेनंतरची दृश्य ही मन विषण्ण कऱणारी होती. देवाचा धावा करण्यासाठी आलेले भाविक थेट देवाघरी पोहोचलेत.यात कुणाची आई आहे.कुणाचा बाप आहे. कुणाची बहीण, कुणाचा भाऊ आहे. तर कुणाचे इवले इवले पोटचे गोळे आहेत. सिकंदराबादच्या फुलरई गावात भोलेबाबा नावाच्या महाराजाचा सत्संग आयोजित केला होता. आणि याच सत्संगानंतर, या बाबाच्या पायाखालची माती घेण्यासाठी जत्थेच्या जत्थे धावले. आणि त्यांच्या आयुष्याची अक्षरश: माती झालीय. जिथं हा सत्संग झाला तिथं आता भयाण स्मशान शांतता पसरलीय तर ज्यांचे जीव गेले त्यांच्या घरात फक्त आणि फक्त हंबरडा आणि आक्रोश उरला आहे. हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? सत्संगासाठी 80 हजार जणांची परवानगी असतानाही त्या दिवशी 2.50 लाख भाविक जमले होते. सत्संग संपल्यावर भोलेबाबाची चरणधूळ गोळा करण्यासाठी पळापळ झाली. चरणधुळीसाठी अनेक जण बसलेल्यांच्या अंगावरून धावत गेले. यामुळे अनेक जण खाली पडले, त्यांच्या अंगावरून लोक जात राहिले. काही क्षणांत या पळापळीचं चेंगराचेंगरीत रुपांतर झालं. पुढच्या बाजूनं सत्संग समितीचे लोक भाविकांना रोखत होते. त्यामुळे मागे गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरीची तीव्रता आणखी वाढली. या दुर्देवी घटनेमध्ये जीव गुदमरून 121 जणांचा मृत्यू झाला, यामध्ये 100 पेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे. अनेकजण यामध्ये जखमीही झाले.


Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha


Pune District Magistrate Jogendra Katyare Suspended पुण्याचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारेंच निलंबन

Pune District Magistrate Jogendra Katyare Suspended