RAHUL GANDHI IN PUNE: 'सत्तेत आल्यावर जातनिहाय जनगणना करणार'

Rahul Gandhi rally in Pune Lok Sabha: पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धनगेकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची सभा आयोजित करण्यात आली. पुण्यातील या सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकिकडी इंडिया आघाडी संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी, आरएसएस संविधान संपवण्याचं काम करत आहे असंही राहुल गांधींनी म्हटलं.

आरक्षणाचा मर्यादा मोदी वाढवणार का?

राहुल गांधी यांनी म्हटलं, ज्या दिवशी भाजपने संविधान संपवेल त्या दिवसापासून हिंदुस्थानची ओळख संपेल. जे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलं आहे ते संविधान आम्ही कधीही संपवू देणार नाही. भाजपचे नेते कधी म्हणतात संविधान संपवू तर कधी म्हणतात आरक्षण संपवणार. मोदीजींनी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की, आरक्षणाची मर्यादा 50 टक्के आहे ती 50 टक्क्यांवरुन वाढवून अधिक करणार का?. आम्ही निर्णय घेतला आहे की, निवडणुकीनंतर आरक्षणाची मर्यादा वाढवणार. या मर्यादेमुळे अनेकांचं नुकसान होत आहे आणि त्यामुळे आम्ही ही आरक्षणाची मर्यादा हटवणार.

सत्तेत आल्यावर जातनिहाय जनगणना करणार

राहुल गांधी यांनी म्हटलं, सध्या देशात अशी परिस्थिती आहे की एक टक्के भारतीयांकडे 40 टक्के भारताचा पैसा आहे. कोणत्याही संस्थेत तुम्ही पाहा तुम्हाला एकही दलित, आदिवासी कर्मचारी दिसणार आहे. 90 टक्के जनसंख्या असलेल्यांची कुठेही भागिदारी नाही. दलित, आदिवासी कुठे दिसतील तर ते मजदूरांच्या यादीत दिसतील. दलित, गरीब भारतीय मनरेगात काम करत आहे किंवा कुठेतरी मजदुरी करत आहे.

आमचं सरकार आल्यावर आम्ही जातनिहाय जनगणना करणार आणि भारतातील प्रत्येक संस्थेचा आढावा घेणार. कोणत्या कंपनीत किती मागासवर्गीय आहेत याची माहिती घेणार आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल. हे एक क्रांतीकारक पाऊल आहे. ज्या दिवशी जातनिहाय जनगणना होईल त्या दिवशी भारतातील नागरिकांना भारताचं सत्य कळेल. तुम्हाला कळेल की तुम्हाला कशा प्रकारे फसवलं जात आहे.

2024-05-03T13:52:07Z dg43tfdfdgfd