PUNE RAILWAY STATION : ब्रिटिशकालीन ऐतिहासिक पुणे रेल्वे स्थानक झाले १०० वर्षांचे! वाचा स्थानकाचा रंजक इतिहास

Pune Railway station : पुणे स्थानक मध्य रेल्वेचे महत्वाचे स्थानक आहे. देशभरातील विविध शहरांना या स्थानकाणे जोडले आहे. ब्रिटिशकालीन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले हे स्थानक आज १०० व्या वर्षात पदार्पण करत आहे. आज पुणे स्थानकाची देशातील सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक अशी ओळख झाली आहे. पुणे रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीयआहे. हे स्थानक सर्व प्रवाशांची अविरतपणे सेवा बजावत भारतीय रेल्वेच्या इतिहासाची साक्ष देत आहे.

१९१५ मध्ये तयार झाले रेल्वे स्थानकाचे पहिले प्रारूप

पुणे स्थानकाचे पहिले डिझाइन १९१५ मध्ये तयार करण्यात आले. या वास्तुचे काम ब्रिटिश अधिकारी पी. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली १९२२ मध्ये सुरू करण्यात आले. तर, १९२५ मध्ये या स्थानकाचे काम पूर्ण झाले होते. स्थानकाचे उद्घाटन २७ जुलै १९२५ रोजी तत्कालिन गव्हर्नर यांच्या हस्ते करण्यात आले. १८५३ मध्ये भारतात बोरीबंदर ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली. त्यानंतर काही वर्षांतच पुणे-मुंबई लोहमार्ग बांधून तयार करण्यात आला. आज या स्थानकातून तब्बल २७५ हून अधिक रेल्वेगाड्यांद्वारे लाखो प्रवासी दररोज ये-जा करतात. याशिवाय लोकलदेखील धावतात.

ग्रेट इंडियन पेनीनसुला रेल्वे कंपनीने पुणे जंक्शनचा केला विकास

व्हिक्टोरिया टर्मिनसचा विकास करीत असतानाच लंडनमधील ग्रेट इंडियन पेनीनसुला रेल्वे कंपनीने पुणे जंक्शनचा विकास केला. ब्रिटिश लष्कराच्या दृष्टीने पुणे हे शहर महत्त्वाचे होते. त्यादृष्टीने मार्च १८५८ मध्ये खंडाळा ते पुणे दरम्यान रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाले. त्यापूर्वी १८५६ मध्ये इथे रेल्वेची इमारत उभी राहिली होती. पुणे जंक्शनवरील गाड्यांची संख्या वाढू लागल्याने नवीन रेल्वे स्टेशनच्या इमारतीची गरज भासू लागली. त्यादृष्टीने १९१५ मध्ये या इमारतीचे डिझाईन तयार करण्यात आले. १९२२ मध्ये जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यास सुरुवात करण्यात आली. १९२५ साली ही इमारत उभी झाली. त्यावेळी तिचा खर्च ५ लाख ७९ हजार ६६५ रुपये आला होता. या नवीन रेल्वे स्टेशनच्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन हे खास रेल्वे गाडीने पुण्यात आले. २७ जुलै १९२५ रोजी या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

पुणे रेल्वे स्टेशनला हेरिटेज दर्जा

पुणे रेल्वे स्टेशनला हेरिटेज दर्जा देण्यात आला आहे. तसेच सुमारे २० वर्षांपूर्वी रेल्वे बोर्डाने मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून मान्यता देऊन गौरविले आहे. मात्र, काळाच्या ओघात पुणे रेल्वे स्टेशनकडे दुर्लक्ष झाले आहे. वाढत्या रेल्वेगाड्यांमुळे आता हे जंक्शन अपुरे पडत आहे. तरीही रेल्वेने पुणे शहरासाठी दुसरे जंक्शन विकसित करण्याकडे दुर्लक्ष केले. हडपसर, खडकी येथे रेल्वेचे जंक्शन विकसित केले जात असले तरी पुणे स्टेशनचा लौकिक आजही कायम आहे.

डेक्कन क्वीन पुणे रेल्वे स्थानकाची शान

पुणे स्थानकातून सुटणारी डेक्कन क्वीन विशेष सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. स्थानकातील ६ प्लॅटफॉर्म अपुरे पडत आहेत. स्थानकाचा विस्तार, स्थानकाच्या आवारातील सुरक्षा, अनाधिकृत प्रवेशद्वारे, पार्किंग व्यवस्था, स्थानकाच्या आवारातील वाहतूक व्यवस्था आदी काही प्रमुख आव्हाने आहेत. “पुणे स्थानकाला जागतिक दर्जाचे स्थानक करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. सध्याचे रेल्वे स्थानक बहुमजली केल्यास एकाच ठिकाणाहून लोकल, मेट्रो, बस आणि अन्य वाहतूक होऊ शकते.

Ganpati Special train : कोकणवासीयांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी आणखी ६ विशेष रेल्वे गाड्या; उद्यापासून आरक्षणास सुरुवात

रेल्वे प्रवासी वाहतूक मंच्याच्या अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या, २७ जुलै २००५ रोजी रेल्वे स्थानकाच्या वास्तूने ८१ व्या वर्षांत पदार्पण केले. त्या निमित्ताने प्रवासी संघाने स्थानकाच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचे आयोजन केले होते. त्या दिवशी प्रचंड पाऊस होता. मुंबईत पूर आल्याने रेल्वे वाहतूक ठप्प होती. त्यामुळे सर्व गाड्या पुण्यात थांबल्या. या शेकडो प्रवाशांना पाणी, जेवण आदी सुविधा देण्याचा हा कार्यक्रम तीन दिवस सुरू होता. कार्यक्रमाचे नियोजन वेगळे होते. मात्र, प्रवाशांची तीन सेवा दिवस करण्याचे भाग्य मिळाले,’ असे शहा म्हणाल्या.

2024-07-27T11:18:52Z dg43tfdfdgfd