व्हिडिओ

Trending:


बीडमध्ये कोट्यवधीची योजना तरी पाणीबाणी

Beeb water issue news


Pune Crime News : महादेव अॅपमधून कोट्यावधींची उलाढाल; पोलिसांची धडक कारवाई, 45 लॅपटॉप, 89 मोबाइल जप्त

पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी नारायणगावातील (Pune Crime news) एका तीन इमारतीवर छापेमारी केली आहे. ‘महादेव बेटिंग ॲप’संबंधी केलेल्या कारवाईत पोलिसांच्या हाती मोठं धबाड लागलं आहे. तब्बल 62 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या ऑनलाईन जुगारांच्या आर्थिक व्यवहार आणि पैसा वळवण्यासाठी 452 बँक खात्यांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. या अॅपच्या माध्यमातून कोट्यावधींची उलाढाल झाल्याची माहित आहे. महादेव सट्टेबाजी अॅपच्या...


Yogi Adityanath: योगींच्या सभेने वातावरण बदलणार? डॉ. भामरेंच्या प्रचारार्थ आज मालेगावी दौरा

Yogi Adityanath Malegaon Sabha: भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज (दि. १८) मालेगावात जाहीर सभा होत आहे.


Kirit Somaiya On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे माफिया गँगचे नेते, किरीट सोमय्यांची टीका

मिहीर कोटेच्या यांच्या कार्यालयावर मुस्ताक खान या माफियाच्या ५० लोकांनी हल्ला केला असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. तसेच उद्धव ठाकरे हे माफिया गँगचे नेते आहेत, असेही सोमय्या म्हणाले. हे व्हिडिओ देखील पाहा Uddhav Thackeray on Lok Sabha : इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे ABP Majha नकली शिवसेनेच्या (Shiv Sena) टीकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) पत्रकार मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघला (RSS) संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही,असे घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे. आज मुंबईत इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे, शरद पवार, असे इंडिया आघाडीचे बडे नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले, तोडा फोडा राज्य करा असा यांचं चालू आहे. अजूनही नवाज शरीफ यांच्या केकची चव मोदींना आठवत असेल मनी वसे ते स्वप्नी दिसे त्यांना अजूनही पाकिस्तानची आठवण येत असेल. पाकिस्तानचा झेंडा मी कधी येथे फडकलेला पाहिला नाही. पाकव्याप्त काश्मिर अजून आलेला नाही. यांना कशाचे काही पडले नाही. तोडा फोडा राज्य करा असा यांचं चालू आहे. ते उद्या उठून आरएसएसला नकली बोलतील. आरएसएसवर बॅन भाजप आणेल. 100 =वर्ष पूर्ण होताय हे वर्ष धोक्याचं आहे असा दिसतंय. ते उद्या उठून आरएसएसला नकली बोलतील . संघाला तुम्ही नष्ट करायला निघालेत : उद्धव ठाकरे जे पी नड्डा म्हणाले होते एकाच पक्ष देशात राहील. म्हणजे आता हे संघाला सुद्धा नष्ट करायला निघाले आहेत . नड्डा म्हणतात भाजप स्वयंपूर्ण झालाय म्हणजे ज्यांनी राजकीय जन्म दिलाय त्या संघाला तुम्ही नष्ट करायला निघाले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.


Mumbai Tempreture: मुंबईत उकाड्यापासून दिलासा नाही; सोमवारी ३३ ते ३५ अंशादरम्यान तापमानाचा अंदाज

Mumbai Tempreture: सोमवारी मुंबईतील मतदानाच्या दिवशी ३३ ते ३५ अंशांदरम्यान तापमान असू शकेल. सध्या मुंबईत येणारा प्रचंड उकाड्याचा आणि उष्ण हवेचा अनुभव सोमवारी कायम असेल असाही अंदाज आहे.


मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम करताना…

निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचे जिकिरीचे काम टाळण्यासाठी काही महाभाग कसोशीने प्रयत्नशील असतात. या प्रक्रियेतून सुटका करून घेण्याचा मोह मला कधीच झाला नाही...


Pandharpur Darshan: विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची वार्ता! श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन २ जून पासून सुरू होणार

विठ्ठल आणि रूक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन दिनांक २ जून पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.


ABP Majha Headlines : 12 PM : 18 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

संघला संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही, उद्धव ठाकरेंचा घणाघात, नकली शिवसेनेच्या टीकेला उत्तर देताना हल्लाबोल बुलडोझर चालवणार नाही तर राम मंदिराचं उर्वरित काम पूर्ण करू, मोदींच्या टीकेला उत्तर देतान ठाकरेंचा पलटवार, तर सर्वधर्मीय स्थळांचं संरक्षण ही आमची भूमिका, पवारांचं वक्तव्य सत्ता आल्यास देशात सरसकट एकच जीएसटी, इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत खरगेंची घोषणा, प्रचारात मोदी जनतेला भडकवत असल्याचा आरोप भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो, भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचं मोठं वक्तव्य((संघाबद्दल नड्डा यांचं मोठं वक्तव्य)) मुंबईतल्या भाजपाच्या प्रचारासाठी राज ठाकरेंकडून बैठका, आशिष शेलारांच्या साथीनं घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरात शाखाभेटी मुंबईतील मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून तीन कोटी ५६ लाखांचा निधी खर्च, संजय राऊतांचा आरोप, मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी((रोड शोसाठी बीएमसीवर ३.५६ कोटींचा बोजा?)) भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांचा मोठा दावा, रोड शोदरम्यान मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी महामुंबईसह नाशिक, धुळ्यातल्या प्रचारासाठी अखेरचा दिवस, सर्वच पक्षांच्या सभा आणि रॅलींचा धुरळा((आज थंडावणार प्रचाराच्या तोफा)) संभाजीनगर गर्भलिंग निदान प्रकरणी आयुर्वेदिक डॉक्टर रोशन ढाकरेला अटक, रॅकेटमध्येे १५ ते २० एजंट्सचा सहभाग असल्याचं तपासात समोर((डॉक्टरच घ्यायचा अर्भकांचा जीव)) नागपूरह विदर्भाला दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्यानं वर्तवली वादळी पावसाची शक्यता((विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट))


आयपीएलमध्ये या खेळाडूंनी केले संघ मालकाचे पैसेवसूल…

कमी पैश्यांत अव्वल दर्ज्याची कामगिरी केली या खेळाडूंनी…


प्रत्येक टप्प्यातील प्रचाराची दिशा आधीच निश्चित

सात टप्प्यात मतदान होणार असल्याने प्रत्येक टप्प्यात कोणते मुद्दे मांडायचे याची रणनीती आखण्यात आली.


Shivaji Park Security Tightened : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईत भव्य सभा; पोलिसांचा चोख बंदोबस्त

Shivaji Park Security Tightened : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईत भव्य सभा; पोलिसांचा चोख बंदोबस्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या निमित्ताने संपूर्ण शिवाजी पार्क कापडाच्या माध्यमातून झाकण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शिवाजी पार्कच्या चारही बाजूला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून राज्य राखीव पोलीस दल शीघ्र कृती दल तसेच दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलेला आहे. या मैदानाच्या चारी बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे कट आउट देखील लावण्यात आलेले आहेत. आजच्या सभेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्क परिसरात येणार आहेत त्यामुळे आजच्या त्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागला आहे यासोबतच राज ठाकरे काय भूमिका मांडतायेत हे देखील महत्त्वाचं राहणार आहे. मैदानाचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी


Baba Vanga Prediction : बाबा वेंगा यांचं हवामानाबाबत भाकीत काय सांगतं? खरंच येत्या काळात उष्णतेमुळे...

Baba Vanga Prediction : बाबा बांगा यांनी हवामानाबाबत भाकीत केलं असून येत्या काळात उष्णतेमुळे काय परिणाम होणार याबद्दल सांगितलंय.


Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला जुळून येताय शिवयोगासह हे 4 संयोग, जाणून घ्या महत्त्व

Buddha Purnima 2024: पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथी येते. प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व वेगळे असून यात बुद्ध पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गौतम बुद्धांची पूजा केली जाते. मान्यतेनुसार बुद्ध हे श्री हरी विष्णूंचे अवतार आहे. त्यामुळे या दिवशी श्री हरी विष्णू आणि सत्यनारायण पूजा देखील केली जाते. पंचांगानुसार, यंदा 23 मे रोजी वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा आहे.


RTE Admission : आरटीई प्रवेश प्रक्रियेत आजपासून अर्ज करा; शिक्षण विभागाची माहिती

Right To Education Admission : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा नव्याने उद्या शुक्रवारी १७ मे पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे यापूर्वी, प्रवेशासाठी अर्ज केलेल्या पालकांसोबतच आरटीईतून प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या पालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.


Ajit Pawar Speech Mahayuti Sabha : मोदींचं कौतुक, विरोधकांना टार्गेट; शिवतीर्थावरुन अजित पवार UNCUT

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यात आज मुंबईत दिग्गज नेत्यांच्या सभांची पर्वणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आजच्या सभेच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. मुंबईतील शिवाजी पार्कवर ही ऐतिहासिक सभा होत असल्याने मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्राला या सभेची उत्सुकता लागून राहिली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचीही सभा होत असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत बीकेसीत ही सभा होत आहे. शरद पवार, उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेते या सभेला संबोधित करणार आहेत. आजच्या या सभेतून अजित पवारांनी उपस्थित सभेला संबोधित केले. शिवाजी पार्क हे ऐतिहासिक मैदान असून याच मैदानाच्या साक्षीने विकासाचं नवं पर्व मोदींच्या नेतृत्वात सुरू होत आहे. गेल्या 10 वर्षातील मोदींचं काम गौरवास्पद आहे, त्यांच कणखर नेतृत्वच भारत देशाला पुढे घेऊन जाणार आहे. त्यामुळेच, तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करण्याचा निर्धार आपण सर्वांनी करायचा आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. तसेच, विरोधक विकासाच्या मुद्द्याला फाटा देऊन नको त्या विषयावर भाषणं करत असल्याचे म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. आपल्या महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं. ज्या पद्धतीने हिंदवी स्वराज्याची स्थापन करताना शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन राज्य स्थापन केलं. त्याच प्रमाणे मोदींजींच्या नेतृ्त्वात आपण काम करत आहोत. पण, एखाद्या समाजात संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. सध्या देशात संविधान बदलण्याची भाषणं सर्वजण करत आहेत, पण संविधान दिन साजरा करण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वात होत असल्याचे सांगत अजित पवार यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. दरम्यान, अजित पवार यांनी शिवाजी पार्क येथील सभेला हजेरी लावली. त्यामुळे, गेल्या 2 दिवसांपासून अजित पवार यांच्या गायब झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीतील शिवाजी पार्क येथील सभेत अजित पवार व्यासपीठावर दिसले, मतदारांना आवाहन करत त्यांनी थोडक्यात आपलं भाषणही केले.


Arvind Kejriwal speech Bhiwandi : मत नव्हे भीक मागायला आलोय, पवारांसमोर केजरीवालांचं भाषण

Arvind Kejriwal, Bhiwandi Meeting :"विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक केले. काँग्रेस पार्टीचे बँक अकाऊंट फ्रिज केले. शिवसेना चोरली, राष्ट्रवादीचे दोन तुकडे केले, असं करुन निवडणूक लढणार आहात? मोदीजी तुम्ही भित्रे आहात", असं म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. भिवंडीत इंडिया आघाडीची सभा पार पडली. यावेळी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते. इंडिया आघाडीची मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर सभा पार पडणार आहे. तत्पूर्वी केजरीवालांनी भिवंडीतील सभेलाही हजेरी लावली आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले, मी दिल्लीतील लोकांना मोफत उपचार करुन दिले. मात्र, मला शुगर आहे, जेलमध्ये मला 15 दिवस गोळ्या घेऊ दिल्या नाहीत. मला रोज चार वेळेस इंजक्शन लागते. मी तुरुंगात असताना मला इंजक्शन देखील घेऊ देत नव्हते. मला जेलमध्ये टाकून दिल्लीतील लोकांना मोफत मिळणारी वीज बंद करु इच्छित आहेत. पुतीनने विरोधी पक्षांच्या नेत्यांना जेलमध्ये टाकले किंवा मारुन टाकले. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही तशीच अवस्था आहे. मोदीजी भारतातही तसंच करु इच्छित आहेत. मी तुमच्यासमोर देशाला वाचवण्याची भीक मागतोय अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले, मी दिल्लीवरुन आलोय. मी तुमच्यासमोर देशाला वाचवण्याची भीक मागतोय. काही दिवसांपूर्वी माझी तुरुंगातून सुटका झाली. मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो, त्यांनी माझी सुटका केली. मला वाटत नव्हते, की माझी एवढ्या लवकर सुटका होईल. मी ठरवलंय, 21 दिवस झोपणार नाही. 24 तास संपूर्ण देशात फिरुन लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे.


Loksabha Election : संजय राऊत यांची Uncut मुलाखत

Loksabha Election : Uncut


Girish Mahajan Meet Chhagan Bhujbal : नाराजीच्या चर्चेनंतर गिरीश महाजन भुजबळांच्या निवासस्थानी

Girish Mahajan : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Constituency) निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. नाशिकमध्ये महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे (Hemant Godse), महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) तर अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाशिकमध्ये लोकसभेसाठी इच्छुक होते. छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगल्या आहेत. यामुळे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) हे तातडीने भुजबळ फार्म (Bhujbal Farm) येथे छगन भुजबळांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. महायुतीत शिवसेना शिंदे गटाला नाशिकची जागा मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरु होती. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे प्रचारात सक्रीयपणे सहभागी होताना दिसले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला भुजबळांनी हजेरी लावली होती. त्यामुळे भुजबळांची नाराजी दूर झाली असे दिसत होते. मात्र आज सकाळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छगन भुजबळ नाराज असल्याचे मला समजले, असे वक्तव्य केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा उधाण आले आहे.


एमबीए – एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने ९ ते ११ मार्च या कालावधीत महाराष्ट्र राज्य आणि अन्य राज्यातील विविध १७८ केंद्रांवर ही परीक्षा घेतली होती.


भूगोलाचा इतिहास : दंतकथा बनलेला इंजिनीअर

आधुनिक भारताला आकार देणाऱ्या थोर विभूतींपैकी एक भारतरत्न इंजिनीअर डॉ. एम. विश्वेश्वरैया भारतमातेचे केवढे महान सुपुत्र होते हे अभ्यासानंतरच कळते.


Parbhani : गोविंदपूर येेथे महिलेचा विनयभंग

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : पूर्णा तालूक्यातील गोविंदपूर येथील एका विवाहितेच्या पतीच्या मोबाईलवर मित्रासोबत काढलेले फोटो व अश्लील भाषेत मेसेज पाठवून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. अनिल विठ्ठलराव उखळतकर (रा.बरबडी) असे संशयिताचे नाव आहे. फिर्यादी विवाहित महिलेस तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुझे मित्रासोबत काढलेले फोटो व्हायरल करतो. असे म्हणत तीन ते चार वर्षापासुन सतत …


निकालविलंबाचा भुर्दंड

मुंबई विद्यापीठाकरिता असे गोंधळ काही नवे नाहीत. कित्येकदा विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्त्यांसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी अर्ज करायचे असतात, परंतु परीक्षांचे निकालच लागत नाहीत. खासकरून विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये असे प्रकार अनेकदा घडतात.


छत्तीसगडमधील तरुणीवर कोल्हापुरात अत्याचार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नोकरीचे आमिष दाखवून छत्तीसगडमधील तरुणीला फूस लावून कोल्हापुरात आणून अत्याचार केल्याचे शुक्रवारी उघड झाले. संबंधित तरुणीने शिरोलीतील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी संबंधित तरुणीला घेऊन कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिसप्रमुखांचे कार्यालय गाठले. तरुणीच्या तक्रारीवरून माजीद खान या तरुणाविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली. त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाली. दरम्यान, लव्ह जिहादचा संशय व्यक्त करत …


India GDP Growth: अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची बातमी, UN ने आर्थिक विकासदराचा अंदाज बदलला

UN on India Economic Growth: भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ पाहून जगभरातील रेटिंग एजन्सी चकित झाल्या आहेत. जगभरातील अर्थव्यवस्था आर्थिक आघाडीवर संघर्ष करत असताना भारतीय इकॉनॉमी मात्र सुस्साट वेगाने अग्रेसर आहे. अलीकडेच IMF आणि जागतिक बँकेने भारताच्या वाढीबाबत सकारात्मक रेटिंग दिले तर आता भारताचा वेग आम्ही विचार केला होता त्यापेक्षा अधिक वेगवान असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.


'भाजपला आता संघाची गरज नाही, आम्ही सक्षम' जे पी नड्डा यांच्या वक्तव्याने राजकारण पेटलं

JP Nadda on RSS : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डांनी RSSबद्दल केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होतीय. ऐन निवडणुकीच्या मध्यातच नड्डा यांनी हे वक्तव्य केलंय. भाजपला आता संघाची गरज नसल्याचं वक्तव्य जे.पी.नड्डांनी केलंय. त्यामुळे नड्डांच्या वक्तव्यावरून नवा वाद पेटलाय.