बातम्या

Trending:


आयपीएलमध्ये या खेळाडूंनी केले संघ मालकाचे पैसेवसूल…

कमी पैश्यांत अव्वल दर्ज्याची कामगिरी केली या खेळाडूंनी…


Arvind Kejriwal speech Bhiwandi : मत नव्हे भीक मागायला आलोय, पवारांसमोर केजरीवालांचं भाषण

Arvind Kejriwal, Bhiwandi Meeting :"विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक केले. काँग्रेस पार्टीचे बँक अकाऊंट फ्रिज केले. शिवसेना चोरली, राष्ट्रवादीचे दोन तुकडे केले, असं करुन निवडणूक लढणार आहात? मोदीजी तुम्ही भित्रे आहात", असं म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. भिवंडीत इंडिया आघाडीची सभा पार पडली. यावेळी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते. इंडिया आघाडीची मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर सभा पार पडणार आहे. तत्पूर्वी केजरीवालांनी भिवंडीतील सभेलाही हजेरी लावली आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले, मी दिल्लीतील लोकांना मोफत उपचार करुन दिले. मात्र, मला शुगर आहे, जेलमध्ये मला 15 दिवस गोळ्या घेऊ दिल्या नाहीत. मला रोज चार वेळेस इंजक्शन लागते. मी तुरुंगात असताना मला इंजक्शन देखील घेऊ देत नव्हते. मला जेलमध्ये टाकून दिल्लीतील लोकांना मोफत मिळणारी वीज बंद करु इच्छित आहेत. पुतीनने विरोधी पक्षांच्या नेत्यांना जेलमध्ये टाकले किंवा मारुन टाकले. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही तशीच अवस्था आहे. मोदीजी भारतातही तसंच करु इच्छित आहेत. मी तुमच्यासमोर देशाला वाचवण्याची भीक मागतोय अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले, मी दिल्लीवरुन आलोय. मी तुमच्यासमोर देशाला वाचवण्याची भीक मागतोय. काही दिवसांपूर्वी माझी तुरुंगातून सुटका झाली. मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो, त्यांनी माझी सुटका केली. मला वाटत नव्हते, की माझी एवढ्या लवकर सुटका होईल. मी ठरवलंय, 21 दिवस झोपणार नाही. 24 तास संपूर्ण देशात फिरुन लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे.


Railway Jobs : रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कर्मचाऱ्यांची होणार बंपर भरती

Railway Recruitment 2024 : अनेक जण रेल्वेच्या परीक्षा देण्यासाठी तयारी करत असतात. रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. तुम्हाला रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलटची सरकारी नोकरी मिळवायची असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने एईसीआर अंतर्गत नागपूर विभागात असिस्टंट लोको पायलटच्या पदांसाठी रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा केली आहे. या पदांवर नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहणारे उमेदवार अर्ज करू...


PDCC Bank Manager Suspended : मतदानाच्या आधी बँक रात्रभर सुरू, पीडीसीसी बँकेचे मॅनेजर निलंबित

PDCC Bank Manager Suspended : मतदानाच्या आधी बँक रात्रभर सुरू, पीडीसीसी बँकेचे मॅनेजर निलंबित पीडीसीसी बँकेच्या वेल्हा शाखेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, सोमवारी रात्री उशिरापर्यंत बँक सुरू ठेवल्याचा रोहित पवारांनी केला होता आरोप.


निकालविलंबाचा भुर्दंड

मुंबई विद्यापीठाकरिता असे गोंधळ काही नवे नाहीत. कित्येकदा विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्त्यांसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी अर्ज करायचे असतात, परंतु परीक्षांचे निकालच लागत नाहीत. खासकरून विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये असे प्रकार अनेकदा घडतात.


Neral-Matheran Mini Train: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! माथेरानच्या मिनी ट्रेनला वाफेच्या इंजिनाचा साज

Mumbai News : मिनी ट्रेनच्या इंजिनला वाफेच्या इंजिनचे रूपडे देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. याचे काम परळच्या रेल्वे कार्यशाळेत सुरू आहे. वाफेच्या इंजिनचे सुट्टे भाग एकत्र करून त्याची जोडणी नेरळमध्ये करण्यात येणार आहे.


Raj Thackeray Speech Shivaji Park : ओवैसीसारख्या अवलादींचे अड्डे उद्ध्वस्त करा, राज ठाकरे यांचं घणा

राज ठाकरेंच्या मोदींकडून 5 मागण्या, भरसभेत व्यक्त केल्या अपेक्षा पुढच्या पाच वर्षांसाठी मोदीजींसमोर उभा आहे. महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आहेत. त्यातील काही गोष्टी सांगत आहे. अनेक वर्षे खितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. देशाच्या अभ्यासक्रमामध्ये 125 वर्षे मराठा सामज्र होतं, त्याचा इतिहास शालेय शिक्षणामध्ये असावा. भविष्यातील पिढ्यांना याबाबत माहिती मिळेल. समुद्रामध्ये छत्रपतींचा पुतळा कधी उभा राहिल माहित नाही. पण शिवछत्रपतींची खरी स्मारके आहेत ती म्हणजे गड किल्ले आहेत. गडकिल्ल्यांना गतवैभव मिळावं यासाठी आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करावी. भविष्यातील पिढ्यांना आमचा राजा कोण होता.त्यानं काय इतिहास गाजवला हे त्या गडकिल्ल्यावरुन कळेल, असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका उबाठा ला हिंदू म्हणवून घ्यायची लाज वाटत आहे. हिंदूहृदयसम्राट म्हणायला जीभ कचरू लागली आहे. रंग बदलणारे सरडे पाहिले, मात्र इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा कधी पाहिला नाही. काँग्रेसमध्ये उबाठा लोळतायेत. बिघडणारं पोरगं चुकीच्या वाटेला लागलेलं असं आपण म्हणतो. त्यात हे म्हणतात माझा बाप चोरला, अरे हे काय खेळणं आहे का? आम्हाला फक्त बाळासाहेबांचे विचार हवेत, तीच आमची संपत्ती आहे.


RTE Admission : आरटीई प्रवेश प्रक्रियेत आजपासून अर्ज करा; शिक्षण विभागाची माहिती

Right To Education Admission : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा नव्याने उद्या शुक्रवारी १७ मे पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे यापूर्वी, प्रवेशासाठी अर्ज केलेल्या पालकांसोबतच आरटीईतून प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या पालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.


Cyber Crime : व्यावसायिकाला तब्बल एक कोटीचा गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाला एक कोटी 20 लाखांचा आर्थिक गंडा घातला आहे. व्यावसायिकाने आपले पैसे सायबर चोरट्यांच्या हवाली तर केलेच; शिवाय बहिणीचे देखील पैसे दिले. याप्रकरणी भवानी पेठेतील 55 वर्षीय व्यावसायिकाने शिवाजीनगरमधील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान …


Traffic Jam | मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Mumbai Goa National Highway Massive Traffic Jam Of 7 KM


Devendra Fadnavis : Uddhav Thackeray यांच्या भाषणातून हिंदू शब्द गायब झाला, फडणवीसांचा घणाघात

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : मुंबईत सोमवारी (दि.16) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये पाऊस सुरु असतानाच घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून सोमवारी मोठी दुर्घटना घडली. घाटकोपरच्या पोलीस मैदानावरील पेट्रोल पंपावर 250 टन वजनाचे होर्डिंग वादळामुळे कोसळलं. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान, होर्डिंग कोसळल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. दरम्यान घाटकोपरच्या या होर्डिंग दुर्घटनेवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ज्या दिवशी होर्डिंग पडलं आणि निष्पाप लोकांचा जीव गेला. त्यादिवशी मी ठरवलं होतं की, या होर्डिंगचा मालक कोणत्याही बिळात लपला असला तरी शोधून काढेन. आज आम्ही त्याचा मालक शोधून काढलाय. त्यांचा पर्दाफाश झालेला आहे. सर्व बेकायदेशीर परवानग्या उद्धव ठाकरेंच्या सरकारने दिलेल्या आहेत. बंधू-भगिनींनो 140/120 चे होर्डिंग होतं. कोणतेही नियम नाही. कोणत्याही परवानग्या नाहीत. थेट तुम्ही लावलं आणि त्याला तुम्ही लीज देता. त्याला तुम्ही सर्व मान्यता देता. आज खऱ्या अर्थाने हा अपघात नाही. एकप्रकारे या लोकांचा खून झालाय. तो त्यावेळेसच्या सरकारच्या आशीर्वादाने झालाय. लोकांचं जीवन उद्धव ठाकरेंना स्वस्त वाटत असेल मी तुम्हाला शब्द देतो, कोणत्याही परिस्थितीत हे जे 16 लोक गेलेत. यांचं जीवन वाया जाऊ देणार नाही. अपघात म्हणून मी त्याला सुटू देणार नाही. आम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही सिद्ध करु. त्याला त्याची शिक्षा भोगावी लागेल. लोकांचं जीवन उद्धव ठाकरेंना स्वस्त वाटत असेल. आम्हाला वाटत नाही, असंही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.


H5N1 Bird Flu Spreading: चिंता वाढली! केरळमध्ये वेगाने पसरतोय बर्ड फ्लू, या राज्यात अलर्ट जारी

H5N1 Bird Flu Spreading: देशातून कोरोनाचे संकट पूर्णपणे मिटले नसताना आता H5N1 फ्लूने डोके वर काढले आहे. केरळमध्ये H5N1 बर्ड फ्लू वेगाने पसरत आहे. केरळमध्ये बदकांमध्ये हा विषाणू आढळल्यानंतर आता उत्तराखंडमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. शास्त्रज्ञाच्या मते एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) विषाणू सर्व प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये पसरू शकतो. केरळात आतापर्यंत तीन हजारांहून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.


पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवार अन् एकनाथ खडसेंची घरवापसी; विनोद तावडेंची विशेष भूमिका?

विनोद तावडे यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या मटा कट्टा या कार्यक्रमात प्रश्नांना बिनधास्त उत्तर दिली. देशाची निवडणूक मोदीच्या भोवतीच, असं म्हणत विनोद तावडेंनी देशाचा मूड सांगितला. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नाची सडेतोड उत्तरे या मुलाखतीत विनोद तावडेंनी दिली. पक्षाने साईड लाईन केलेल्या पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंचं राजकीय बस्तान पुन्हा बसवण्यात विनोद तावडेंचा महत्वाचा हात होता का? याविषयी देखील तावडेंनी उत्तर दिलं


ABP Majha Headlines : 08.00 AM : 18 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मालेगावमध्ये प्रचार करणार, सकाळी १० वाजता सुरू होणार योगींची सभा ((मालेगावमध्ये गरजणार योगी आदित्यनाथ)) निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार, सोमवारी मुंबई, ठाणे, कल्याणसह १३ जागांवर मतदान ((आज थंडावणार प्रचाराच्या तोफा)) निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार, सोमवारी मुंबई, ठाणे, कल्याणसह १३ जागांवर मतदान ((आज थंडावणार प्रचाराच्या तोफा)) चार जूननंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, फक्त मोदीच राहतील, उद्धव ठाकरेंची टीका, मोदींनी उद्धव ठाकरेंना संपवून दाखवावं, ठाकरेंचा घणाघात. राज ठाकरेंच्या भर मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सात मागण्या, जे सत्तेत येणारच नाहीत त्यांच्यावर का बोलता म्हणत इंडिया आघाडीला टोला. भटकती आत्माच्या टीकेवरुन शरद पवारांची पुन्हा मोदींवर टीका, हा आत्मा तुम्हाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, पवारांचा हल्लाबोल. ४ जूनला मोदी पुन्हा सत्तेत आले तर ठाकरे, पवार तुरुंगात जाणार, बीकेसीतील सभेतून अरविंद केजरीवाल यांचा घणाघआात, मोदींची रशियाच्या पुतीनशी तुलना सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य ,पण अजित पवार दोषी नाहीत, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, खात्याचे मंत्री म्हणून जबाबदार मात्र अजितदादांविरुद्ध पुरावा नाही, फडणवीसांची स्पष्टोक्ती मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ राडा... पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आरोप... मुंबईतला उकाडा सोमवारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज, हवेतील आर्द्रता प्रचंड वाढल्यामुळे मुंबईकर घामाघूम ((मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचेच)) मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आज आणि उद्या दीड तास बंद राहणार, ओव्हरहेड गँट्रीच्या कामासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक सकाळी साडे दहा ते दुपारी १२ पर्यंत बंद ठेवणार ((एक्स्प्रेसवे दीड तास बंद राहणार)) तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील बेपत्ता अभिनेता गुरुचरण सिंग २५ दिवसांनी घरी परतला, आध्यात्मिक यात्रेवर गेल्याचा दावा ((२५ दिवसांनी परतला गुरुचरण सिंग))


मतपेटीसाठी लोकसंख्येचा बागुलबुवा

मुस्लीम लोकसंख्या हा कायम चिंता, चर्चा आणि चिंतनाचा विषय बनवला आहे. मात्र ही चिंता कमी व्हावी आणि परिस्थितीत बदल व्हावा यादृष्टीने ठोस उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक चिंतन करण्यापेक्षा असत्य आणि अर्धसत्य संदर्भ आणि संख्याशास्त्रीय आधार घेऊन हेतुपूर्वक चर्चा होत असते.


Loksabha Election : संजय राऊत यांची Uncut मुलाखत

Loksabha Election : Uncut


Priyanka Gandhi Nandurbar Speech : इंदिरा गांधी ते मणिपूर हिंसाचार; प्रियंका गांधींचं जोरदार भाषण

Priyanka Gandhi Nandurbar Speech : इंदिरा गांधी ते मणिपूर हिंसाचार; प्रियंका गांधींचं जोरदार भाषण


Maharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्या

Maharashtra HSC and SSC Result 2024 : महाराष्ट्रातील दहावी, बारावीच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. निकाल कधी लागणार आणि कुठे ते पाहा.