PM NARENDRA MODI IN AHMEDNAGAR SABHA : 4 जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट निश्चित झाली आहे- नरेंद्र मोदी

महाराष्ट्राच्या सहकाराच्या चळवळीत बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव अभिमानाने घेतले जाते. तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. भाजप आणि एनडीएला मोठ्या प्रमाणावर मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाने हे सिद्ध केलं आहे की, 4 जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट निश्चित झाली आहे. 4 जूननंतर इंडिया आघाडीचा झेंडा उचलणाराही कोणी दिसणार नाही असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित अहमदनगर येथील सभेत केले.

या वेळची निवडणूक संतुष्टीकरण आणि पुष्टीकरण या दरम्यान होत आहे. या वेळची निवडणूक देशवासियांना संतुष्ट करण्यासाठी आहे. काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा हा मुस्लिम लीगच करून टाकला आहे. तुम्ही स्वत: पाहा भाजप-एनडीएचे मुद्दे पाहा. विकास, गरीब कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, देशाचा स्वाभिमान, देशाचा सन्मान. तुम्ही मला सांगा काँग्रेस यातल्या एका तरी गोष्टीवर बोलण्यास इच्छुक आहे का? काँग्रेसकडे बोलण्यासारखं काहीही राहिलेले नाही. त्यांनी 50 वर्षात गरिबी हटाव सारखे खोटे वादे केले. त्यांनी गरिबांचा विश्वासघात केला. मोदी 4 कोटी पक्क्या घरांची वार्ता करणार, 80 कोटी जनतेला मोफत रेशन देण्याविषयी सांगणार. पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना 1.50 लाख कोटींची रक्कम मिळाली आहे.

काँग्रेस त्यांच्या तोंडावर पट्टी बांधणार आहे. एवढ्या दिवसांपासून मी वारंवार सांगतो आहे की, काँग्रेस आणि त्यांचे सहकारी मोठा घातपात करण्याच्या तयारीत आहे. कोर्टाने ज्यांना शिक्षा दिली आहे चारा घोटाळ्यात ज्यांना दोषी ठरवले त्यांनी मीडियासमोर थेट सांगितले की, या निवडणुकीत इंडिया आघाडी निवडून आली तर मुस्लिमांना पूर्ण आरक्षण देण्यात येईल.

आता इंडिया आघाडीचे म्हणणे आहे की, हे संपूर्ण आरक्षण काढून घेऊन मुसलमानांना देण्यात येईल. जे काम करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी रोखलं होतं. अन्य इतरांनीही रोखलं होतं. हे पाप काँग्रेस आणि आघाडीवाले करू इच्छितात. हे इंडिया आघाडीवाले संविधान बदलण्याच्या तयारीत आहेत. कारण आपल्या खास व्होट बँकेला यांना खूश करायचे आहे. सर्वांनी यांना नाकारले आहे. म्हणून हे आता कोणत्याही थराला जाण्यास तयार आहेत. पण तुम्ही असे होऊ द्याल?

इंडिया आघाडीचा कोणताच प्रयोग यशस्वी होताना दिसत नाही. काँग्रेसचा हा हताशपणा सीमापार दिसून येतो आहे. काँग्रेसची बी टीम सीमापार अॅक्टिव्ह झाली आहे. या बदल्यात काँग्रेस पाकिस्तानला दहशतवादी हल्ल्यात क्लिन चीट देऊ लागली आहे.

मुंबईत 26/11 चा दहशतवादी हल्ला पाकिस्तानने केला होता की नव्हता केला. कोणी केला होता? आपल्या जवानांना कोणी शहीद केलं होतं. आपल्या निर्दोष लोकांना कोणी शहीद केलं होतं? पाकिस्तानने स्वत:ही हे स्वीकार केलं आहे पण काँग्रेस दहशतवाद्यांना चांगले असण्याचे प्रमाणपत्र देण्यात गुंतले आहेत. मुंबई हल्ल्यात मारल्या गेलेल्या निर्दोष नागरिकांचा अपमान आहे. हा शहीद तुकाराम ओंबळे यांचा अपमान आहे.

देशाला काँग्रेस कुठे घेऊन चालली आहे. अशा इंडिया आघाडीला महाराष्ट्रात एक तरी सीट मिळायला हवी का? मोदीने गेल्या 10 वर्षात सुरक्षा आणि विकास दोन्हींची गॅरंटी दिली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस लूटमध्ये व्यस्त होती. आम्ही वर्षानुवर्षे रखडलेले निळवंडे धरणाचे रखडलेले आम्ही मार्गी लावली आहे. धरणाच्या नावाखाली काँग्रेस नेत्यांचे खिसे भरत होती आणि शेतकऱ्यांची शेती सुकलेलीच राहिली. देवेंद्रजींनी या प्रकल्पाला गती दिली. यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

भाजप एनडीए साठी शेतकऱ्यांचे कल्याण करणे यालाच प्रथम प्राधान्य आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेंतर्गत 30 हजार कोटींहून अधिक पैसे देण्यात आले आहेत. आम्ही 3 कोटी महिलांना लखपती दिदी बनवणार आहोत.

या क्षेत्रात आहिल्यानगर , सोलापूर रिंगरोडचे काम प्रगतीपथाव फोकस आहे. अहमदनगर मधून डॉ. सुजय विखे आणि शिर्डीतून महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना अधिकाधिक मताधिक्याने निवडून द्या. तुम्ही पोलिंग बूथ जिंकून दिलं तर मला लोकसभा जिंकणं सोपं होईल.

2024-05-07T11:46:42Z dg43tfdfdgfd