PM MODI EXCLUSIVE INTERVIEW: 'अब की बार 400 पार...' हा नारा कसा आला? पंतप्रधान मोदींनी सांगितलं लोकसभेचं गणित

PM Modi Exclusive Interview: टाईम्स नाऊच्या ग्रुप एडिटर इन चीफ नाविका कुमार यांनी या मुलाखतीत पंतप्रधान मोदींना अनेक प्रश्न विचारले. देशात सुरु असलेल्या निवडणुकीचा काळातील दोन टप्प्यांचा एक भाग निघून गेला आहे. तुम्ही परीक्षेत 7 पेपर देत आहात असे गृहीत धरले तर तुम्ही दोनच्या उत्तरपत्रिका भरल्या आहेत. आताही 400 पारचे लक्ष्य गाठले जाईल असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न नाविका कुमार यांनी विचारल्यानंतर त्यावर उत्तर देताना मोदी म्हाणाले, यात आश्चर्य वाटावे असे काय आहे. आम्ही आधीच NDA+ 400 आहोत. आम्ही आधीच 2014-19 मध्ये सुमारे 400 खासदारांच्या पाठिंब्याने संसद चालवली आहे.

आम्ही आधीच 400च्या आसपास आहोत - मोदी

या प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले, तुम्ही लोकांनी एक महिन्यापूर्वी मुलाखत घेतली असती तर बरे झाले असते, तेव्हाही मी तुम्हाला नीट समजावून सांगितले असते. तुम्ही हे तर बघा की आज आमचे विद्यमान खासदार किती आहेत, तुम्ही याचा कधी विचार केला आहे का की 2019 ला आम्ही जिंकलो तेव्हाच NDA ची संख्या 359 च्या आसपास होती. हे आंध्र आणि ओडिशाचे राजकीय पक्ष कायम आमच्या सोबत होते, म्हणजे जवळपास 35 लोक. तसेच ईशान्येचे लोक नेहमीच आमच्या सोबत होते… त्यामुळे आम्ही ज्याला NDA+ म्हणतो ते आम्ही आधीच 400 च्या आसपास होतो. आधीच आम्ही 400 संसदेत होतो. मग लोकांना या 400, 400, 400 चं एवढं का आश्चर्य वाटतंय? ठीक आहे हे एका शब्दात आलं, पण वास्तव हे आहे की आम्ही आधीच 2014-19 मध्ये सुमारे 400 खासदारांच्या पाठिंब्याने संसद चालवली आहे.

काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं मोदींकडून पोस्टमार्टम

पंतप्रधान नरेद्र मोदी म्हणाले, आम्ही CAA कायदा आणला. ते जाहीरनाम्यात स्पष्टपणे नमूद केले आहे. ना कोणी बोलण्यात चूक केली, ना कोणी लिहिण्यात चूक केली, ना देशाच्या कायद्यात काही चूक आहे. तो कायदा फक्त नागरिकत्व देण्यासाठी आहे. त्यात कुठेही नागरिकत्व काढून घेण्याचा उल्लेख नाही. 2 वर्षे झाली काँग्रेस पक्ष जे खोटे बोलत आहे, ते तुम्ही कधी तथ्य तपासले आहे का? खोटे बोलणे इतके दिवस सुरू होते, तुम्ही त्यांचे प्रत्येक विधान पाहत आहात. आता त्यांनी वारसा कराचा मुद्दा उपस्थित केला आहे, मला सांगा असा प्रयोग जगातील कोणत्याही विकसनशील देशात झाला आहे का? कम्युनिस्ट विचारसरणीचा मुद्दा सोडा... तुम्हाला त्यांच्या घोषणापत्रातील आणि त्यांच्या भाषणातील गोष्टी एकत्र करून एका कॅनव्हासवर ठेवाव्या लागतील.

मुस्लिमांनी आता आत्मचिंतन करण्याची गरज - मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले, आज मी पहिल्यांदाच बोलतोय, यापूर्वी मी कधीच या विषयावर आलो नाही. मी मुस्लिम समाजाला सांगतोय, मी त्यांच्या सुशिक्षित लोकांना आत्मचिंतन करायला सांगतोय. विचार करा, देश जेवढी प्रगती करत आहे, त्यात तुमच्या समाजात कमतरता जाणवत असेल तर त्याचे कारण काय? काँग्रेसच्या काळात तुम्हाला सरकारी व्यवस्थेचा लाभ का मिळाला नाही? काँग्रेसच्या काळात तुम्ही या दुर्दशेला बळी पडलात आहात का? एकदा आत्मपरीक्षण करा आणि ठरवा. हे जे तुमच्या मनात आहे की सत्तेत आम्ही बसवू, आम्ही उतरवू, यामुळे तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य खराब करत आहात.

2024-05-06T16:11:39Z dg43tfdfdgfd