NASHIK LOK SABHA SEAT : नाशिकचा तिढा सुटला, शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर

Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या रणधुमाळीत सध्या चर्चा आहे ती नाशिकची. आज अखेर शिंदे गटातर्फे हेमंत गोडसे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. नाशिकमधून छगन भुजबळ हेही खासदारकीसाठी इच्छुक होते पण त्यांनी काही दिवसांपूर्वी माघार घेतली आहे. शांतीगिरी महाराजही नाशिकच्या जागेसाठी इच्छुक असून त्यांनीही या जागेसाठी अर्ज भरला आहे पण त्यांना अद्याप एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांना अद्यापही त्याची प्रतिक्षा आहे.

नाशिकच्या जागेसाठी राजाभाऊ वाजे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जर शांतीगिरी महाराजांना एबी फॉर्म मिळाला तर नाशिकची लढत ही तिंरगी होणार आहे.

2024-05-01T08:13:20Z dg43tfdfdgfd