NAGPUR NEWS: नागपुरातील दीक्षाभूमी आंदोलन तीव्र, परिसरातील शाळांना आज सुट्टी

Nagpur News: नागपूर येथील दीक्षाभूमी नुतनीकरण प्रकल्पातील अंडरग्राऊंड पार्किंगच्या मुद्द्यावरुन समाज अनुयायी आक्रमक झाले आहे. सध्या राज्यभर हा मुद्दा गाजत आहे. या अंडरग्राऊंड पार्किंगच्या विरोधात दीक्षाभूमी परिसरात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरातील काही शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे. दीक्षाभूमी परिसरातील आंदोलन आणि ट्राफीकच्या समस्या लक्षात घेता ही सुट्टी देण्यात आली आहे.

दीक्षाभूमीवरील नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या विकासकामसह परिसरात अंडरग्राऊंड पार्किंग केली जात आहे. या अंडरग्राऊंड पार्किंगला नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. आंदोलकांनी या विकासकामात मनमानी पद्धतीने कामकाज होत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, या विकासकामात दीक्षाभूमी स्मारक समिती मनमानी कारभार करत आहे. नागरिकांना विश्वासात न घेता हे विकासकाम केले जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्मारक समितीच्या सदस्यांनी समाजाच्या अनुयायांसोबत अंडरग्राऊंड पार्किंग विषयी चर्चा केली होती. त्यानंतर शनिवार 29 जून रोजी समिती सदस्यांनी पुन्हा काही मान्यवरांशी चर्चा करून एनएमआरडीएसोबत भूमिगत वाहनतळाच्या पुनर्विचाराचे संकेत दिले होते. त्यानंतर सोमवारी बैठकीची तयारी दर्शविली होती. मात्र, समाज अनुयायांनी दीक्षाभूमीवर बैठकीला येऊ नये, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर, समाजाच्या अनुयायांनी या अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध दर्शवित आंदोलनाचा पावित्रा घेतला. दरम्यान, हे आंदोलन तीव्र झाले आणि राज्यभर गाजत आहे. दीक्षाभूमी परिसरात सुरु असलेल्या या आंदोलनामुळे मोठा जमाव आणि वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीसह इतर बाबी लक्षात घेता दीक्षाभूमी परिसरातील कुर्वेज मॅाडेल स्कूल व इतर या शाळांना आज म्हणजेच बुधवारी सुट्टी देण्यात आली आहे.

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे या परिसरातील काछीपुरा ते अण्णाभाऊ साठे स्मारक चौक ते लक्ष्मीनगर चौक ते बजाजनगर या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. एकिकडे अंबाझरीचा मार्ग बंद, दुसरीकडे व्हीएनआयटी गेट ते श्रद्धानंद चौकापर्यंत दीक्षाभूमी नुतनीकरण प्रकल्पातील बांधकाम साहित्य पडले आहे. यामुळे दीक्षाभूमी परिसरातील वाहतूक बंद आहे.

2024-07-03T06:24:16Z dg43tfdfdgfd