Trending:


ABP Majha Headlines : 10 AM : 18 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचं मोठं वक्तव्य ((संघाबद्दल नड्डा यांचं मोठं वक्तव्य)) मुंबईतील मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून तीन कोटी ५६ लाखांचा निधी खर्च, संजय राऊतांचा आरोप, मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ((रोड शोसाठी बीएमसीवर ३.५६ कोटींचा बोजा?)) मुंबईतील मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून तीन कोटी ५६ लाखांचा निधी खर्च, संजय राऊतांचा आरोप, मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ((रोड शोसाठी बीएमसीवर ३.५६ कोटींचा बोजा?)) मुंबईतील मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून तीन कोटी ५६ लाखांचा निधी खर्च, संजय राऊतांचा आरोप, मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ((रोड शोसाठी बीएमसीवर ३.५६ कोटींचा बोजा?)) मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, कारण मात्र गुलदस्त्यातच ((राज ठाकरे, शेलारांमध्ये खलबतं)) संभाजीनगर गर्भलिंग निदान प्रकरणी आयुर्वेदिक डॉक्टर रोशन ढाकरेला अटक, रॅकेटमध्येे १५ ते २० एजंट्सचा सहभाग असल्याचं तपासात समोर ((डॉक्टरच घ्यायचा अर्भकांचा जीव)) नागपूरह विदर्भाला दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्यानं वर्तवली वादळी पावसाची शक्यता ((विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट)) मुंबईतला उकाडा सोमवारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज, हवेतील आर्द्रता प्रचंड वाढल्यामुळे मुंबईकर घामाघूम ((मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचेच)) मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आज आणि उद्या दीड तास बंद राहणार, ओव्हरहेड गँट्रीच्या कामासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक सकाळी साडे दहा ते दुपारी १२ पर्यंत बंद ठेवणार ((एक्स्प्रेसवे दीड तास बंद राहणार)) हरियाणाच्या नूहमध्ये भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा मृत्यू तर २४ जण जखमी ((हरियाणात बसला आग, ८ भाविक मृत्युमुखी)) तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील बेपत्ता अभिनेता गुरुचरण सिंग २५ दिवसांनी घरी परतला, आध्यात्मिक यात्रेवर गेल्याचा दावा ((तारक मेहता फेम 'सोढी'ची घरवापसी))


निकालविलंबाचा भुर्दंड

मुंबई विद्यापीठाकरिता असे गोंधळ काही नवे नाहीत. कित्येकदा विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्त्यांसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी अर्ज करायचे असतात, परंतु परीक्षांचे निकालच लागत नाहीत. खासकरून विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये असे प्रकार अनेकदा घडतात.


जंगलात चरण्यासाठी गेलेल्या जनावरांना विषबाधा


Cyber Crime : व्यावसायिकाला तब्बल एक कोटीचा गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाला एक कोटी 20 लाखांचा आर्थिक गंडा घातला आहे. व्यावसायिकाने आपले पैसे सायबर चोरट्यांच्या हवाली तर केलेच; शिवाय बहिणीचे देखील पैसे दिले. याप्रकरणी भवानी पेठेतील 55 वर्षीय व्यावसायिकाने शिवाजीनगरमधील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान …


बारामतीपाठोपाठ शिरूरच्या EVM गोडाऊनमधली CCTV डिस्प्ले 24 तास बंद!

शिरूर, (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी) : बारामती लोकसभेच्या ईव्हीएमवर सुरक्षिततेसाठीच्या सीसीटीव्हीचा डिस्प्ले 45 मिनिटे बंद पडल्याने मोठा वाद उभा राहिला. पण दुसरीकडे शिरूर लोकसभेच्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमच्या सीसीसीटीव्हीचा डिस्प्ले 24 तास बंद होता. याची उमेदवारांच्या प्रतिनिधींना थोडीसुद्धा कल्पना नव्हती. कारण जागेवर कुणीच नव्हते. सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिली असून, अधिकार्‍यांच्या ही बाब लक्षात...


Loksabha election 2024 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

CM Eknath Shinde Serious Allegation On Uddhav Thackeray


अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्याला सश्रम करावास

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – घरामध्ये अल्पवयीन मुलगी एकटी असल्याची संधी साधून तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या चोपडा तालुक्यातील गोरगावले येथील आरोपीस अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने पंधरा वर्षाचा सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, घरामध्ये असणाऱ्या आई-वडील व आजोबा हे शेतात तूर कापण्यासाठी गेले असताना मुलगी घरात एकटी …


Mumbai Mega Block : मुंबईकरांनो,रविवारी मुलांना घेऊन फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर थांबा! ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची

मुंबई : मुंबईकरांनो (Mumbai News) मुलांना रविवारी बाहेर घेऊन जाण्याचा विचार करात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे वीकेंडला घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक तपासा आणि नियोजन करुनच घराबाहेर पडा. मुंबई उपनगरी रेल्वेमार्गांवर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. मध्य रेल्वेने रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घोषीत केला आहे. माटुंगा ते मुलुंड आणि...


VIDEO | लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आज थांबणार

Fifth Phase Of Lok Sabha Election Campaign To End Today


Neral-Matheran Mini Train: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! माथेरानच्या मिनी ट्रेनला वाफेच्या इंजिनाचा साज

Mumbai News : मिनी ट्रेनच्या इंजिनला वाफेच्या इंजिनचे रूपडे देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. याचे काम परळच्या रेल्वे कार्यशाळेत सुरू आहे. वाफेच्या इंजिनचे सुट्टे भाग एकत्र करून त्याची जोडणी नेरळमध्ये करण्यात येणार आहे.


Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Pune Shocking News: पुण्यातील वाकड परिसरात चारित्र्याच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नीच्या गुप्तांगावर कुलूप लावले.


J P Nadda On Rss : आता भाजप सक्षम, जेपी नड्डा यांचं RSS वर मोठं वक्तव्य ABP Majha

आता बातमी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याची.. शुरू मे हम अक्षम होंगे थोडा कम होंगे, आरएसएस की जरुरत पडती थी, आज हम बड गये है सक्षम है, तो बीजेपी अपने आप चलती है.. हे वक्तव्य आहे जे पी नड्डा यांचं.. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय. वाजपेयींच्या काळातील भाजप आणि सध्याच्या भाजप यातील फरक काय असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे तर भाजप हा राजकीय पक्ष आहे हे अधोरेखित करायला देखील जे पी नड्डा विसरले नाहीत. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले पाहा व्हिडिओ..


मुस्लिमांबाबत मोदींची भूमिका दुतोंडी – मुजफ्फर हुसेन

आता खुद्द नरेंद्र मोदीच मुस्लिम समाजाविरोधात उघडपणे भूमिका मांडत असल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे, असे हुसेन यांनी सांगितले.


Dadar Public Reaction on Lok Sabha : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडी

Mahayuti Sabha at Shivaji Park : मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) पाचवा टप्पा येत्या 20 मे रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत (Mumbai News) सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. पाचव्या टप्प्यातील महायुतीची (Mahayuti) सांगता सभा आज दादरमधील (Dadar) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार आहे. आजच्या सभेसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित राहणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) देखील हजेरी लावणार आहेत. पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे आजच्या महायुतीच्या सभेकडे संपूर्ण राज्याचंच नाहीतर देशाचंही लक्ष लागलं आहे. दरम्यान या सभेबद्दल आणि एकुणच सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल जनतेला नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी.


पुणे: वानवडीत सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा

वानवडीतील महंमदवाडी परिसरात असलेल्या सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा घालण्यात आला. शस्त्राच्या धाकाने पेढीतील दागिने लुटून चोरटे पसार झाले.


Baba Vanga Prediction : बाबा वेंगा यांचं हवामानाबाबत भाकीत काय सांगतं? खरंच येत्या काळात उष्णतेमुळे...

Baba Vanga Prediction : बाबा बांगा यांनी हवामानाबाबत भाकीत केलं असून येत्या काळात उष्णतेमुळे काय परिणाम होणार याबद्दल सांगितलंय.


Devendra Fadnavis : Uddhav Thackeray यांच्या भाषणातून हिंदू शब्द गायब झाला, फडणवीसांचा घणाघात

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : मुंबईत सोमवारी (दि.16) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये पाऊस सुरु असतानाच घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून सोमवारी मोठी दुर्घटना घडली. घाटकोपरच्या पोलीस मैदानावरील पेट्रोल पंपावर 250 टन वजनाचे होर्डिंग वादळामुळे कोसळलं. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान, होर्डिंग कोसळल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. दरम्यान घाटकोपरच्या या होर्डिंग दुर्घटनेवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ज्या दिवशी होर्डिंग पडलं आणि निष्पाप लोकांचा जीव गेला. त्यादिवशी मी ठरवलं होतं की, या होर्डिंगचा मालक कोणत्याही बिळात लपला असला तरी शोधून काढेन. आज आम्ही त्याचा मालक शोधून काढलाय. त्यांचा पर्दाफाश झालेला आहे. सर्व बेकायदेशीर परवानग्या उद्धव ठाकरेंच्या सरकारने दिलेल्या आहेत. बंधू-भगिनींनो 140/120 चे होर्डिंग होतं. कोणतेही नियम नाही. कोणत्याही परवानग्या नाहीत. थेट तुम्ही लावलं आणि त्याला तुम्ही लीज देता. त्याला तुम्ही सर्व मान्यता देता. आज खऱ्या अर्थाने हा अपघात नाही. एकप्रकारे या लोकांचा खून झालाय. तो त्यावेळेसच्या सरकारच्या आशीर्वादाने झालाय. लोकांचं जीवन उद्धव ठाकरेंना स्वस्त वाटत असेल मी तुम्हाला शब्द देतो, कोणत्याही परिस्थितीत हे जे 16 लोक गेलेत. यांचं जीवन वाया जाऊ देणार नाही. अपघात म्हणून मी त्याला सुटू देणार नाही. आम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही सिद्ध करु. त्याला त्याची शिक्षा भोगावी लागेल. लोकांचं जीवन उद्धव ठाकरेंना स्वस्त वाटत असेल. आम्हाला वाटत नाही, असंही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.