Trending:


TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 May 2024 : ABP Majha

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज मालेगावात सभा, नतंर मुंबईत उज्ज्वल निकमांसाठी देखील प्रचार करणार ((मालेगावमध्ये गरजणार योगी आदित्यनाथ)) निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार, सोमवारी मुंबई, ठाणे, कल्याणसह १३ जागांवर मतदान ((आज थंडावणार प्रचाराच्या तोफा)) नकली शिवसेनेनं बाळासाहेबांना दगा दिला आणि शिवसैनिकांचा विश्वासघात केला, शिवाजी पार्कमधल्या सभेतून पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. चार जूननंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, फक्त मोदीच राहतील, उद्धव ठाकरेंची टीका, मोदींनी उद्धव ठाकरेंना संपवून दाखवावं, ठाकरेंचा घणाघात. राज ठाकरेंच्या भर मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सात मागण्या, जे सत्तेत येणारच नाहीत त्यांच्यावर का बोलता म्हणत इंडिया आघाडीला टोला. मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ राडा... पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आरोप... मतदान झाल्यावर काही दिवसांनी मतदानाची टक्केवारी कशी वाढते याचं उत्तर द्या, एडीआर संस्थेच्या याचिकेवरून सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश ((मतदान टक्केवारीवरून नि. आयोगाला निर्देश)) नागपूरह विदर्भाला दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्यानं वर्तवली वादळी पावसाची शक्यता ((विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट)) मुंबईतला उकाडा सोमवारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज, हवेतील आर्द्रता प्रचंड वाढल्यामुळे मुंबईकर घामाघूम ((मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचेच)) मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आज आणि उद्या दीड तास बंद राहणार, ओव्हरहेड गँट्रीच्या कामासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक सकाळी साडे दहा ते दुपारी १२ पर्यंत बंद ठेवणार ((एक्स्प्रेसवे दीड तास बंद राहणार)) तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील बेपत्ता अभिनेता गुरुचरण सिंग २५ दिवसांनी घरी परतला, आध्यात्मिक यात्रेवर गेल्याचा दावा ((२५ दिवसांनी परतला गुरुचरण सिंग))


Pandharpur Darshan: विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची वार्ता! श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन २ जून पासून सुरू होणार

विठ्ठल आणि रूक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन दिनांक २ जून पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.


Mumbai Tempreture: मुंबईत उकाड्यापासून दिलासा नाही; सोमवारी ३३ ते ३५ अंशादरम्यान तापमानाचा अंदाज

Mumbai Tempreture: सोमवारी मुंबईतील मतदानाच्या दिवशी ३३ ते ३५ अंशांदरम्यान तापमान असू शकेल. सध्या मुंबईत येणारा प्रचंड उकाड्याचा आणि उष्ण हवेचा अनुभव सोमवारी कायम असेल असाही अंदाज आहे.


अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्याला सश्रम करावास

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – घरामध्ये अल्पवयीन मुलगी एकटी असल्याची संधी साधून तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या चोपडा तालुक्यातील गोरगावले येथील आरोपीस अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने पंधरा वर्षाचा सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, घरामध्ये असणाऱ्या आई-वडील व आजोबा हे शेतात तूर कापण्यासाठी गेले असताना मुलगी घरात एकटी …


Yogi Adityanath: योगींच्या सभेने वातावरण बदलणार? डॉ. भामरेंच्या प्रचारार्थ आज मालेगावी दौरा

Yogi Adityanath Malegaon Sabha: भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज (दि. १८) मालेगावात जाहीर सभा होत आहे.


Girish Mahajan Meet Chhagan Bhujbal : नाराजीच्या चर्चेनंतर गिरीश महाजन भुजबळांच्या निवासस्थानी

Girish Mahajan : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Constituency) निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. नाशिकमध्ये महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे (Hemant Godse), महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) तर अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाशिकमध्ये लोकसभेसाठी इच्छुक होते. छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगल्या आहेत. यामुळे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) हे तातडीने भुजबळ फार्म (Bhujbal Farm) येथे छगन भुजबळांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. महायुतीत शिवसेना शिंदे गटाला नाशिकची जागा मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरु होती. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे प्रचारात सक्रीयपणे सहभागी होताना दिसले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला भुजबळांनी हजेरी लावली होती. त्यामुळे भुजबळांची नाराजी दूर झाली असे दिसत होते. मात्र आज सकाळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छगन भुजबळ नाराज असल्याचे मला समजले, असे वक्तव्य केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा उधाण आले आहे.


मुस्लिमांबाबत मोदींची भूमिका दुतोंडी – मुजफ्फर हुसेन

आता खुद्द नरेंद्र मोदीच मुस्लिम समाजाविरोधात उघडपणे भूमिका मांडत असल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे, असे हुसेन यांनी सांगितले.


BJP-Shivsena Rada Mulund : भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर राडा! ABP Majha

मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेच्या यांच्या कार्यालयात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते यांचा जोरदार राडा झाला. कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ पैसेवाटप सुरू होतं असा आरोप ठाकरे गटाने केला. आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसमोर त्याचवेळी भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमा झाले. त्यावरून दोन्ही कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, धक्काबुक्की झाली. पोलीसांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कोटेचा यांच्या कार्यालयात जाऊन उपमुख्यमंत्री फडणवीसांनीही घटनेचा आढावा घेतला. हे ही वाचा मराठीला अभिजात दर्जा, सैन्य घुसवून ओवैसीसारख्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा, राज ठाकरेंच्या 7 बेधडक मागण्या! Mahayuti Rally Shivaji Park Mumbai Raj Thackeray : शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेत राज ठाकरे यांनी बेधडक भाषण केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केले. त्याशिवाय त्यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला. राज ठाकरे यांनी मोदी पुन्हा सत्तेत येतील असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत राज ठाकरे यांनी 'आपण आहात म्हणून राम मंदिर होऊ शकलं', असे म्हटले. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सहा बेधडक मागण्या केल्या आहेत. पुढच्या पाच वर्षांसाठी मोदीजींसमोर उभा आहे. महाराष्ट्राच्या खूप आपेक्षा आहेत. त्यातील काही गोष्टी सांगत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.


CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

CRPF Constable recruitment 2023 Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल (टेक्निकल अँड ट्रेड्समन) २०२३ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.


Shivaji Park Security Tightened : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईत भव्य सभा; पोलिसांचा चोख बंदोबस्त

Shivaji Park Security Tightened : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईत भव्य सभा; पोलिसांचा चोख बंदोबस्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या निमित्ताने संपूर्ण शिवाजी पार्क कापडाच्या माध्यमातून झाकण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शिवाजी पार्कच्या चारही बाजूला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून राज्य राखीव पोलीस दल शीघ्र कृती दल तसेच दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलेला आहे. या मैदानाच्या चारी बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे कट आउट देखील लावण्यात आलेले आहेत. आजच्या सभेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्क परिसरात येणार आहेत त्यामुळे आजच्या त्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागला आहे यासोबतच राज ठाकरे काय भूमिका मांडतायेत हे देखील महत्त्वाचं राहणार आहे. मैदानाचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी


एमबीए – एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने ९ ते ११ मार्च या कालावधीत महाराष्ट्र राज्य आणि अन्य राज्यातील विविध १७८ केंद्रांवर ही परीक्षा घेतली होती.


Cyber Crime : व्यावसायिकाला तब्बल एक कोटीचा गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाला एक कोटी 20 लाखांचा आर्थिक गंडा घातला आहे. व्यावसायिकाने आपले पैसे सायबर चोरट्यांच्या हवाली तर केलेच; शिवाय बहिणीचे देखील पैसे दिले. याप्रकरणी भवानी पेठेतील 55 वर्षीय व्यावसायिकाने शिवाजीनगरमधील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान …


Devendra Fadnavis on Ajit Pawar : सिंचन घोटाळ्याचे आरोप खरे, पण अजित पवार दोषी नाहीत- फडणवीस

सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य आहे, पण अजित पवार दोषी नाहीत, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. खात्याचे मंत्री म्हणून जबाबदार मात्र अजितदादांविरुद्ध पुरावा नाही, अशी स्पष्टोक्ती देखील फडणवीसांनी दिली. हेही पाहा सिंचन घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस यांना जावई शोध कधी लागला Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : सिंचन घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस यांना जावई शोध कधी लागला हे स्पष्ट केलं पाहिजे, जर त्यांना हा शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? असा खोचक सवाल ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. कथित 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले की, अजित पवार हे त्या खात्याचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्यावर आम्ही आरोप केले. त्यांना जबाबदार धरणे साहजिकच होते. तपास यंत्रणांनी सर्व काही तपासले. परंतु कोणत्याही आरोपपत्रात, यंत्रणांनी अजित पवारांवर थेट भूमिका असल्याचं म्हटलेलं नाही. आपल्याला यंत्रणा आणि त्यांच्या तपासाला सामोरे जावे लागते, असे म्हणाले होते. शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी खोचक शब्दात विचारणा केली आहे. ते म्हणाले की, अजित पवार यांना मंत्री करण्यापासून ते सोबत घेण्यापर्यंत भाजपचा मोठा विरोध होता. सिंचन घोटाळा, बँक घोटाळा हे पंतप्रधानांनी सांगितलं. एवढे आरोप असलेल्या अजित पवारांना यापुढे सोबत घेऊ नका असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना हा जावई शोध कधी लागला हे स्पष्ट केलं पाहिजे. जर त्यांना हा शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? असा खोचक सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, पंतप्रधान यांनी केलेला आरोप ग्राह्य धरायचा की देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले ते ग्राह्य धरायचं? मी मुख्यमंत्री असताना त्यांच्याच विभागाने मला ही माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, मनसेकडून आज मुंबईत पंतप्रधानांची सभा बोलावली आहे. त्यामुळे किमान आज त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच आश्वासन दिलं पाहिजे. आम्ही ही लढाई सुरु केली होती, असेही त्यांनी सांगितले.


Arvind Kejriwal Speech BKC MVA :जेलमध्ये इन्सुलिन दिलं नाही, CCTV लावले,ठाकरेंसमोर केजरीवालांचं भाषण

मुंबई : दिल्लीतील लोकांसाठी मी अनेक रुग्णालयं निर्माण केली, मोफत उपचार दिले, पण जेलमध्ये टाकल्यानंतर मोदींनी मला इन्सुलिनचे औषधही दिलं नाही असा घणाघाती आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. 4 जून रोजी मी जेलमध्ये असणार आहे, तिथून देशाचा निकाल पाहणार, त्यामुळे लोकशाही वाचवायची असेल तर मोदींनी नाकारलं पाहिजे असंही अरविंद केजरीवाल यांनी आवाहन केलं. अरविंद केजरीवाल हे महाविकास आघाडीच्या शिवाजी पार्कवरील सभेला संबोधित करत होते. अरविंद केजरीवाल यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे थेट तुरुंगातून तुमच्याकडून आलोय, जेलचे उत्तर व्होटने द्यायचे. मी झोळी पसरवून तुमच्याकडे भीक मागायला आलोय या देशायाला वाचवायला. हे देश आणि लोकशाही संपवण्याचे प्रयत्न नरेंद्र मोदी करत आहेत. दिल्लीमध्ये 70 मधील 67 जागा 'आप'ला मिळाल्या होत्या. नंतर 62 मिळाल्याआणि भाजला 8 जागा मिळाल्या. 'आप'ला हरवू शकणार नाही हे लक्षात आल्याने खोटे गुन्हे दाखल करून सिसोदिया, मला अटक केली. त्यांना वाटल मी राजीनामा देईन मी तुरुंगातून राज्य चालवताचा निर्णय घेतला. लोकशाहीला जर ते तुरुंगात टाकत असतील तर आन्ही तुरुंगातून राज्य चालवू. मी दिल्लीतील गरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मला अटक केली. तुमच्या मनाचा मोठेपणा यात होता की मी जर शेकडो शाळा काढल्या तर तुम्ही हजारो शाळा काढायला पाहिजे होतात. मी शेकडो हास्पिटल काढले, पण पंधरा दिवस तुरुंगात असताना माझे औषध मोदींनी बंद केले. माझं शुगर तीनशे पर्यंत गेलं, पण मला इन्सुलिन दिलं नाही. इन्सुलिन मिळालं नाही तर किडनी खराब होते. मला माहिती नाही त्यांना माझ्यासोबत काय करायचे होते. मी दिल्लीत वीज बिल फ्री केलं, तुम्ही देशभरात हे करायला हवे होते. पण तुम्ही मला अटक केली . मी 2 जूनला पुन्हा तुरुंगात जाईन असं ते म्हणतायत, आता हे तुम्ही ठरवायचं आहे. मोदींना मत दिले की मी तुरुंगात जाईन आणि इंडियाला दिले की मी आझाद राहीन. रशियामध्ये विरोधकांना अटक केली आणि मोठ्या प्रमाणात पुतीनला मतं मिळाली. मोदींना भारताला बांगलादेश आणि पाकिस्तान करायचे आहे. निवडणुकीच्या एक महिना पूर्वी काँग्रेसचे अकाउंट सील केले. आता आमचे अकाउंट सील करण्याची तयारी सुरू केलीय. तुमच्यामध्ये दम असेल तर डोळ्यात डोळे घालून निवडणूक लढा. वन नेशन वन लीडरसाठी मोदी काम करत आहेत. त्यासाठी विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं काम सुरू आहे. जर मोदी यामध्ये जिंकले तर उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी हे सगळे तुरुंगात असतील.


निकालविलंबाचा भुर्दंड

मुंबई विद्यापीठाकरिता असे गोंधळ काही नवे नाहीत. कित्येकदा विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्त्यांसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी अर्ज करायचे असतात, परंतु परीक्षांचे निकालच लागत नाहीत. खासकरून विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये असे प्रकार अनेकदा घडतात.


VIDEO | लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आज थांबणार

Fifth Phase Of Lok Sabha Election Campaign To End Today


आयपीएलमध्ये या खेळाडूंनी केले संघ मालकाचे पैसेवसूल…

कमी पैश्यांत अव्वल दर्ज्याची कामगिरी केली या खेळाडूंनी…


जंगलात चरण्यासाठी गेलेल्या जनावरांना विषबाधा


Neral-Matheran Mini Train: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! माथेरानच्या मिनी ट्रेनला वाफेच्या इंजिनाचा साज

Mumbai News : मिनी ट्रेनच्या इंजिनला वाफेच्या इंजिनचे रूपडे देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. याचे काम परळच्या रेल्वे कार्यशाळेत सुरू आहे. वाफेच्या इंजिनचे सुट्टे भाग एकत्र करून त्याची जोडणी नेरळमध्ये करण्यात येणार आहे.


PDCC Bank Manager Suspended : मतदानाच्या आधी बँक रात्रभर सुरू, पीडीसीसी बँकेचे मॅनेजर निलंबित

PDCC Bank Manager Suspended : मतदानाच्या आधी बँक रात्रभर सुरू, पीडीसीसी बँकेचे मॅनेजर निलंबित पीडीसीसी बँकेच्या वेल्हा शाखेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, सोमवारी रात्री उशिरापर्यंत बँक सुरू ठेवल्याचा रोहित पवारांनी केला होता आरोप.


Loksabha election 2024 | राऊतांचे शाब्दिक ताशेरे, आठवलेंच्या मार्मिक कविता... ऐका हो ऐका

Loksabha Election 2024 funny videos Aika Ho Aika


पुणे: वानवडीत सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा

वानवडीतील महंमदवाडी परिसरात असलेल्या सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा घालण्यात आला. शस्त्राच्या धाकाने पेढीतील दागिने लुटून चोरटे पसार झाले.


Raj Thackeray Shinde Fadnavis : हास्य, विनोद, गप्पा; शिवतीर्थाच्या गॅलरीत राज - शिंदे - फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे शिवतिर्थ बंगल्यावर एकत्र दिसून आले. शिवाजी पार्क मैदानासमोर असलेल्या राज ठाकरेंच्या शिवतिर्थ बंगल्यावरील गॅलरीत तिन्ही नेते एकत्र संवाद साधताना पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले. राज ठाकरेंच्या गॅलरीत तिन्ही नेते दिसले, तिघेही हास्यविनोद करताना पाहायला मिळाले. शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांची भिवंडीत भेट झाली. यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे आणि आपचे खासदार संजय सिंह हेदेखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी शिवाजी पार्क येथे सभा घेत आहेत. मोदी सभा घेत असल्याचा आम्हाला आनंद असल्याची भावना महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी व्यक्त केलीय. या सभेसाठी भाजपा व मनसे पदाधिकारी मुंबईतील शिवाजी पार्ककडे निघाल्याचे दिसून येते.


Pune Crime News : महादेव अॅपमधून कोट्यावधींची उलाढाल; पोलिसांची धडक कारवाई, 45 लॅपटॉप, 89 मोबाइल जप्त

पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी नारायणगावातील (Pune Crime news) एका तीन इमारतीवर छापेमारी केली आहे. ‘महादेव बेटिंग ॲप’संबंधी केलेल्या कारवाईत पोलिसांच्या हाती मोठं धबाड लागलं आहे. तब्बल 62 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या ऑनलाईन जुगारांच्या आर्थिक व्यवहार आणि पैसा वळवण्यासाठी 452 बँक खात्यांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. या अॅपच्या माध्यमातून कोट्यावधींची उलाढाल झाल्याची माहित आहे. महादेव सट्टेबाजी अॅपच्या...


RTE Admission : आरटीई प्रवेश प्रक्रियेत आजपासून अर्ज करा; शिक्षण विभागाची माहिती

Right To Education Admission : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा नव्याने उद्या शुक्रवारी १७ मे पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे यापूर्वी, प्रवेशासाठी अर्ज केलेल्या पालकांसोबतच आरटीईतून प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या पालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.


CM Eknath Shinde | 'उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंनाही त्रास दिला', झी 24 तासच्या मुलाखतीत गौप्यस्फोट

CM Eknath Shinde Allegation Of Uddhav Thackeray Not Good With Anand Dighe


Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 17 May 2024

छगन भुजबळ नाराज असल्याचं कानावर, जयंत पाटलांची प्रतिक्रिया तर भुजबळ फक्त जागावाटपार्यंतच नाराज होते, तटकरेंचं स्पष्टीकरण शरद पवारांचा मुक्काम असलेल्या हॉटेलला सुनील तटकरेंची भेट, अनिल देशमुखांचा दावा, संपर्कात आलं तरी कोणालाही परत घेणार नसल्याचं वक्तव्य ११ मे पासून माध्यमापासून दूर असणारे अजित पवार महायुतीच्या सभेत भाषण ठोकणार अजितदादा पुन्हा सक्रिय झाल्याची तटकरेंची माहिती मुंबईतल्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या महायुतीच्या सांगता सभेत मोदी आणि राज ठाकरेंची तोफ धडाडणार , सभेपूर्वी मोदी चैत्यभूमी, सावरकर स्मारक आणि बाळासाहेब स्मृतीस्थळाला भेट देणार गेल्या १० वर्षांपासून बहुमत असतानाही संविधान बदलण्याचा प्रयत्न नाही,.... केवळ राजकीय स्थैर्यासाठीच ४०० जागा हव्यात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं स्पष्टीकरण महामुंबईसाठी बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची महासभा.. शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगेंसह अरविंद केजरीवालही उपस्थित राहणार मुंबई पोलिसांना चकवा देण्यासाठी चार शहरं फिरणारा भावेश भिंडे अखेर उदयपूरमधून गजाआड, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई, तपास गुन्हे शाखेकडे दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल मे महिन्यातच, बारावीचा येत्या आठवड्यात तर दहावीचा शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर होणार मुंबईत उष्णतेसोबत आर्द्रता वाढणार, दमट वातावरणामुळे उकाड्यात आणखी भर पडणार, २४ तास उष्ण आणि दमट वातावरण


Traffic Jam | मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Mumbai Goa National Highway Massive Traffic Jam Of 7 KM