बातम्या

Trending:


Zika Virus: झिका व्हायरसमुळे पुणेकर संकटात, आता 2 गर्भवती महिलांना लागण

Zika Virus News: पुणेकर सध्या चिंतेत आहे. शहरात झिका व्हायरसचे आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. 2 गर्भवती महिलांना याची लागण झाली आहे. या व्हायरसची लक्षणे काय आहेत? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात...


Breaking News Live Updates: आपली मागणी 13 तारखेपर्यंत मान्य झाली तर ठीक अन्यथा..., मनोज जरांगेंचा इशारा

मुंबईत काल रात्री पासून पावसाची संततधार सुरु आहे. जोरात तर कधी हलक्या स्वरूपात कोसळतात सरी कोसळत आहेत. यामुळे रस्ते वाहतूक सुरळीत असली तरी मध्य रेल्वेची लोकल 15 ते 20 मिनिट उशिराने धावतेय. 7 रोजी कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. आषाढी वारी निमित्ताने


Pune Khadki Hit And Run : पुणे हिट अँड रन प्रकरणातील धक्कादायक CCTV, वाऱ्याच्या वेगाने पळवली कार!

Pune Hit and Run: पुणे : पुण्यातील (Pune News) पोर्शे हिट अँड रन (Porshe Hit And Run Case) प्रकरणानंतर पुन्हा एका हिट अँड रनच्या प्रकरणानं सगळीकडे खळबळ माजली आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बापोडीजवळ अज्ञात वाहनानं दोन पोलिसांना चिरडलं. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात मध्यरात्री झालेल्या हिट अँड रन प्रकरणात पुणे पोलीस दलातील एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हॅरिस ब्रीजच्या खाली रात्री साधारणतः पावणे दोन वाजता हा अपघात घडला. खडकी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे दोन पोलीस कॉन्स्टेबल रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरुन निघाले असताना, समोरून वेगानं आलेल्या चारचाकी वाहनानं त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला.


ABP Majha Headlines | एबीपी माझा 05 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024

मुंबईत अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा, ५०-६० किमी प्रति तास वेगानं वारे वाहण्याचा अंदाज ((मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा)) मुंबईत काल २६७ ते ३०० मिमी पाऊस, पूरस्थिती हटवण्यासाठी पालिकेचे ४४१ पंप तैनात, तर तिन्ही रेल्वेमार्ग सुरू झालेत, आपत्ती व्यवस्थापन केंद्राला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्‍यांची माहिती. हार्बर मार्गावरची रेल्वेवाहतूक हळूहळू पूर्वपदावर,सकाळपासून दोन वाजेपर्यंत हार्बरवरच्या लोकलला लागला होता ब्रेक, सेंट्रल रेल्वेवरची अप मार्गावरची जलद वाहतूक मात्र अजूनही ठप्प.. पावसामुळे मुंबईतील पाणीसाठ्यात ७ ते ८ टक्क्यांनी वाढ... मुंबईतील ७ धऱणांमध्ये १८.७४ % पाणीसाठा...तर विहार तलाव ओव्हरफ्लो किल्ले रायगड ३१ जुलैपर्यंत पर्यटनासाठी बंद, काल ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं प्रशासनाकडून खबरदारीचं पाऊल रत्नागिरी आणि सिंधुदुर्गा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी, काही ठिकाणी २०५ मिमीहून अधिक पावसाचा अंदाज ((रत्नागिरी, सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट)) तापी नदीवरच्या हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली, ४१ पैकी १० दरवाजे उघडले, 19 हजार 105 क्यूसेक वेगानं होतोय पाण्याचा विसर्ग अकोल्यात मुसळधार पाऊस... अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्यानं बळीराजा चिंतेत... तर बुलढाण्यातल्या गारडगावाला पुराचा वेढा.. मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शाह अजूनही फरार, पोलिसांकडून लुकआऊट नोटीस जारी ((आरोपी मिहीर शाहासाठी लुकआऊट नोटीस)) पुण्यात काल एकाच रात्री हिट अँड रनच्या दोन घटना, दोन्ही घटनांमध्ये एकेक पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यु, एक कॉन्स्टेबल जखमी, दोन्ही वाहनचालक फरार लंडनमधली वाघनखं शिवरायांची नाहीतच, इंद्रजित सावंतांना लंडनच्या म्युझियमचं पत्र, सावंत म्हणतात वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत, सचिन अहिर म्हणतात सरकारनं संभ्रम दूर करावा... काश्मीरच्या कुलगाममध्ये राहत्या घरी सापडलं मोठं बंकर, दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर घराची झडती घेतल्यावर बंकर आढळलं ((लाकडी कपाटामागे मोठं बंकर!)) राहुल द्रविडला भारत सरकारनं भारतरत्न द्यायला हवं, माजी कर्णधार सुनील गावसकर यांची मागणी ((राहुल द्रविड यांना भारतरत्न द्या-गावस्कर)) माउली महाराजांच्या पालखीचं पाहिलं उभं रिंगण


Sharad Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देणगी स्वीकारता येणार, केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Sharad Pawar NCP: केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला मोठा दिलासा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे कलम (29 ब) नुसार पक्षाला अधिकृतरित्या देणगी स्वीकारता येणार आहे.


Buldhana News: बुलढाण्यात गारडगावला पुराचा वेढा, गावाचा संपर्क तुटला, ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले असून काही गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. खामगाव तालुक्यातील गारडगावाला नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात बाप-लेक अडकल्याचे समजताच आपत्ती व्यवस्थापन विभागाला याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानंतर पोकलँडच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्यात आले. राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. बुलढाण्यात झालेल्या जोरदार...


Devendra Fadnavis: फडणवीसांचे विरोधकांना थेट आव्हान; ...तर माझ्यावर हक्कभंग आणा

Devendra Fadnavis in Maharashtra Assembly : विधान परिषदेत सुरु असलेल्या चर्चेत विरोधी पक्षाने नोकरभरतीचा मुद्दा उपस्थित केला आणि पेपरफुटीच्या प्रश्नावर देखील सरकारला घेरले. यावर प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोचक शब्दांत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.


Zero Hour | पहिल्या पावसात मुंबईची तुंबई! याला जबाबदार कोण? सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

सुरुवात मुंबईकरांची झोप उडवणाऱ्या मुसळधार पावसाची.. मुंबईतल्या धुवांधार पावसासह राज्यातल्या पावसाच्या बातम्या पाहणार आहोत.. मात्र, सुरुवात मुंबईपासून.. आठवड्याची सुरवातच मुंबईकरांच्या स्पिरीटला पुन्हा एकदा आव्हान देणारी ठरली.. कारण, रविवारी मध्यरात्री मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली.. अनेक भागात सोसाट्याचा वारा.. तर कुठे विजांचा कडकडाट... एखाद्या चक्रीवादळाची आठवण व्हावी असा पाऊस काही भागात कोसळत होता.. सकाळ होईपर्यंत पावसाचा जोर थोडा कमी झाला.. पण, आज दिवसभरात मुंबईकरांना सूर्यनारायणाचं दर्शनच झालं नाही.. कारण, काही मिनिटं पावसानं उसंत घेतली.. असली तरी मुबंईवर पावसाचे ढग होतेच.. आता इतका मोठा पाऊस झाला... की त्याचा परिणाम होणारच... आणि तसंच झालं.. आठवड्याची सुरुवात म्हणून कामावर जाण्यासाठी आज मुंबईकरांना चांगलीच धावपळ करावी लागली.. रात्रीच्या पावसानं सेंट्रलसह हार्बर लोकलसेवा विस्कळीत केली.. काही स्थानकांमधून गाड्या धिम्या ट्रॅकवर धावत होत्या... त्यामुळे अर्थाच स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी होती.. काही गाड्या तर अर्ध्या वाटेतच थांबवल्या गेल्या.. त्यामुळे लाखो नोकरदार वाटेतच अडकले.. मग, काय कामावर पोहोण्याचा शर्यतीत धावणारा मुंबईकर लोकल गाड्यासोडून रस्तेमार्गे निघाला.. तर उपनगरातून मुंबईत येणारे पूर्व आणि पश्चिम... असे दोन्ही महामार्ग जॅम झाले.. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.. जीव मुठीत धरुन... मुंबईकरांनी कार्यलयं गाठण्याची शर्यंत जिंकली असली.. तर परतीची धाकधूक त्यांच्या मनात होती.. कारण, संध्याकाळपर्यंत मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता.. इतकंच नाही तर शहरातील आपत्ती व्यवस्थापनाचे कसे हाल झालेत... हेही त्यांनी पाहिलं होतं.. रस्ते जागोजागी तुंबले होते.. नालेसफाईचा कसा बोजवारा उडालाय.. हेही मुंबईकरांनी आज पाहिलं.. दुपारी तीनही लाईनवरच्या लोकलसेवा सुरु झाल्या होत्या.. याच पावसाचे पडसाद राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले... त्यावरुन आरोप प्रत्यारोपही झाले.


Mumbai University Vacancy : मुंबई विद्यापीठात 152 अनुदानित शिक्षकीय पदांवर भरती सुरू, या तारखेपर्यंत अर्ज करा

Mumbai University : मुंबई विद्यापीठात विविध 152 अनुदानित शिक्षकीय पदावर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्धी करण्यात आली आहे. यामध्ये विविध विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदांसाठी 4 जागा, प्राध्यापक पदांसाठी 21 जागा, सहयोगी प्राध्यापक, उप ग्रंथपाल पदांसाठी 54 जागा आणि सहाय्यक प्राध्यापक/ सहाय्यक ग्रंथपाल पदांसाठी 73 पदांचा समावेश असून ही सर्व पदे अनुदानित तत्वावर भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी https://muappointment.mu.ac.in/ या लिंकवर अर्ज...


Sant Tukaram Maharaj Palkdhi Mendi Ringan : काटेवाडीच्या अंगणात तुकोबांच्या पालखीला मेंढ्यांचं रिंगण

Sant Tukaram Maharaj Palkdhi Mendi Ringan : काटेवाडीच्या अंगणात तुकोबांच्या पालखीला मेंढ्यांचं रिंगण इंदापूर तालुक्यातील सणसर येथील मुक्काम आटोपून तुकोबारायांची पालखी बेलवाडी येथे पहिल्या गोल रिंगण सोहळ्यासाठी पोहोचली. टाळ मृदुंगाचा गजर... तुकारामांचा नामघोष आणि अश्वाच्या दौडीवर खिळलेल्या वैष्णवांच्या नजरा अशा वातावरणात तुकोबांच्या पालखी सोहळ्यातलं बेलवाडी येथील पहिलं गोल रिंगण पार पडलं. बेलवडीतील भाविकांनी बेलवाडी फाट्यावर पालखीचे स्वागत केल्यानंतर बेलवाडी गावातील मैदानावर पालखी रथ नेण्यात आला. यावेळी पालखीभोवती वारकऱ्यांनी रिंगण केले आणि सुरू झाला डोळ्यांचा पारणं फेडणारा रिंगणसोहळा पहा आकाशाच्या नजरेतून..


Sindhudurg Rain: सिंधुदुर्गात तुफान पाऊस, नद्यांचं पाणी पात्राबाहेर, मुंबई-गोवा महामार्ग 12 तासांपासून ठप्प

सिंधुदुर्ग: गेल्या काही तासांपासून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. काल रात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक नद्यांना पूर आला आहे. तर मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग (Mumbai Goa Highway) गेल्या 12 तासांपासून ठप्प आहे. कर्ली नदीला (Karli River) पूर आल्याने कुडाळ मधील पावशी महामार्गावर पाणी आल्याने मुंबई- गोवा रस्ते वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे या...


धर्मनिरपेक्षतेच्या रक्षणासाठी अल्पसंख्यांकांना राजकीय आरक्षण!

अनुसूचित जाती/जमातींसारखे राखीव मतदारसंघ अल्पसंख्याकांना मिळाले, तर आपल्या राजकारणाला आलेली द्वेषाची धार जाऊन धर्मनिरपेक्षतेचे रक्षणच होईल! हे साध्य करण्यासाठी दोन मार्ग असू शकतात...


Monsoon Session Adjournment MLA Absent : पावासामुळे आमदार न पोचल्याने कामकाज 1 वाजेपर्यंत तहकूब

Monsson Session Adjournment MLA Absent : पावासामुळे आमदार न पोचल्याने कामकाज 1 वाजेपर्यंत तहकूब Monsson Session Adjournment MLA Absent : पावासामुळे आमदार न पोचल्याने कामकाज 1 वाजेपर्यंत तहकूब


Supriya Sule Full PC : वर्दीची भीती राहिली नाही, पुणे अपघात प्रकरणी सरकारवर निशाणा ABP Majha

Supriya Sule Full PC : वर्दीची भीती राहिली नाही, पुणे अपघात प्रकरणी सरकारवर निशाणा ABP Majha हे देखील वाचा IndraJeet Sawant on Waghnakh | लंडनहून येणारी वाघनखं शिवरायांची नाहीत? सावंतांचा सवाल Jitendra Awhad on Indrajeet Sawant : "लंडनहून आणली जाणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत. ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत यासाठी कोणताही पुरावा नाही. खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत", असा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केला होता. दरम्यान सावंत यांच्या दाव्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर टीका केली आहे. ट्वीटरवर व्हि़डीओ पोस्ट करत भाजपला भावनिक राजकारण करण्याची सवय आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड काय काय म्हणाले? जितेंद्र आव्हाड ट्वीटरवर लिहितात, अफझलखानाचे पोट फाडताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आम्ही आणणार, असा गाजावाजा या सरकारने केला होता. इंग्लंडमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ही वाघनखे आहेत, असा दावाही केला होता. त्याचवेळेस आम्ही सांगितले होते की, त्या वाघनखांची खरी माहिती कोणालाच नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली हीच वाघनखे आहेत, असे म्हणता येणार नाही. पण, भावनिक राजकारण करून लोकांना आपल्याकडे वळविण्याची सवय असल्याने 'व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरली होती', अशी घोषणा सरकारनेच करून टाकली. आता व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या व्यवस्थापनाने पत्र लिहून, ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा इतिहासकार इंद्रजित सावंत यांना कळविले आहे की, " म्युझियममध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही अन् तसे आम्ही कधी सांगितलेलेही नाही." म्हणजेच भावनिक राजकारण करता करता ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्रास्रांविषयी खोटी माहिती महाराष्ट्रातील तमाम श्रद्धाळू लोकांपर्यंत पोहचवित आहेत. कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराजांशी तरी राजकारण करू नका !


Mumbai Flyover Slab Collapses: मुंबईतील अंधेरी भागातली धक्कादायक घटना उड्डाणपुलाचा कोसळला स्लॅब

Mumbai Flyover Slab Collapses: अंधेरीत वेस्टर्न हायवे मेट्रो स्थानकाजवळ उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळल्याची माहिती मिळाली आहे. स्लॅब कारच्या बोनेटवर पडल्याने जीवितहानी टळली आहे. मात्र कारचे अतोनात नुकसान झाले आहे. मुंबईतल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.


फुलपाखरांचे हरवलेले ठिपके

गवताळ प्रदेश आणि पर्जन्यवनांपासून वाळवंटांपर्यंत सर्व अधिवासांमध्ये फुलपाखरांच्या २८ हजारांपेक्षा जास्त प्रजाती आढळतात. त्यांचा आकार, पंखांवरील नक्षी आणि रंगांमध्ये कमालीचे वैविध्य आढळते.


Thane Railway Heavy Rain : ठाणे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी, ठाणे रेल्वे स्थानकावरून लोकल रद्द

Thane Railway Heavy Rain : ठाणे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी, ठाणे रेल्वे स्थानकावरून लोकल रद्द गरज असेल तरच बाहेर पडा, मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतुकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.


Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उबाठा तीन नंबरवर'; विजयानंतर किशोर दराडेंना मुख्यमंत्र्यांचा कॉल, काय झाली चर्चा?

Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी तब्बल 30 तासानंतर संपली असून महायुतीचे उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजय घोषित केले आहे. दराडे यांना विजयी घोषित केल्यानंतर महायुतीचे पदाधिकारी आणि दराडे यांच्या समर्थकांनी जल्लोष आहे केला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी किशोर दराडे यांच्याशी फोनवरून संपर्क साधत त्यांचे अभिनंदन केले आहे. विजयी...


Mumbai Local Train Update : सीएसएमटी ते मानखुर्द लोकल ठप्प

हार्बरवरील प्रवाशांनी मुख्य मार्गावरून कुर्ला स्थानकापर्यंत प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


पावसामुळे मुंबईकरांची लाईफलाईन विस्कळीत

Lifeline of Mumbaikars disrupted due to rain


Mukhyamantri Ladki Bahin Yojana : कुठे करायचा अर्ज, कोणती कागदपत्र लागतात?

मुंबई : राज्यात अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजेट सादर केला. या बजेटमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukyamantri Mazi Ladki Bahin Scheme) महाराष्ट्रातील जनतेसाठी आणली आहे. या योजनेसाठी (Maharashtra Welfare schemes) आजपासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. ऑफलाईन अर्ज भरायची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी तुम्ही कुठे अर्ज करू शकता कोणती कागदपत्र आवश्यक आहेत याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.कोण लाभ घेऊ शकतं? (Who is Eligible...


jagannath puri : पुरीमध्ये भगवान जगन्नाथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी; एका भाविकाचा मृत्यू, रथ ओढताना अनेक भाविक जखमी

jagannath puri stamped : ओडिशातील पुरी येथे भव्य आणि ऐतिहासिक भगवान जगन्नाथ रथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत अनेक भाविक जखमी झाले. तर एका भविकाचा मृत्यू झाला आहे.


Raver Assembly Constituency: रावेर विधानसभेत मविआचं ठरलं! शिरीष चौधरींचा वारसा पुढे चालवणार, बाळासाहेब थोरातांची मोठी घोषणा

Raver Assembly Constituency: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील रावेर विधानसभेचा उमेदवार जाहीर केला आहे. ते म्हणाले, नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा शोध मी स्वतः लावला. आता रावेर विधानसभेचाही पुढील उमेदवार मीच घोषित करतोय.


Ratnagiri Rain Jagbudi River : जगबुडी नदीचं पाणी इशारा पातळीच्या वर

Ratnagiri Rain Jagbudi River : जगबुडी नदीचं पाणी इशारा पातळीच्या वर


Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलं

Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलं नवी मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढलंय... प्लॅन सिटी अशी ओळख असलेल्या नवी मुंबईत अनेक रस्त्यांवर पाणी साठलं... त्यामुळे वाहतुकीचीही मोठी कोंडी झाली... पाहूयात... आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी घेतलेला आढावा. पनवेल महानगर पालिकेच्या कामाची पोलखोल जुलै महिना आला तरी रस्त्यांची कामे सुरू असल्याने बसला मोठा फटका गटार , नाले साफ न केल्याने पाण्याचा निचरा होण्यास मोठा अडथळा कळंबोली शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत नागरी वस्त्यांमधील रस्त्यांवर पावसाचे दोन - तीन फुट पाणी साचले गाड्या पाण्याखाली तर कळंबोली मधील घरांमध्ये शिरले पाणी रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहेत तलोजा एमआयडीसी पडघे परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले अनेक वाहन वाहून जाताना दृश्य कैद तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचल्याने अनेकांचे नुकसान


Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारीवर करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त

Pench Tiger Reserve तोतलाडोह : नागपूर (Nagpur News) नजीकच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील (Pench Tiger Reserve) तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई करण्यात आलीय. स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या (STPF) पथकाने ही कारवाई केली असून यात दोन बोटीसह मासेमारी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य ही जप्त केलंय. 6 आणि 7 जुलै या दोन दिवसीय आयोजित केलेल्या विशेष मोहिमेदरम्यान स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स, तोतलाडोहने एकूण 165 मासेमारीच्या...


Raigad Fort Closed Tourist : रायगड किल्ला 8 जुलैपासून पर्यटकांसाठी बंद

किल्ले रायगडावर काल ढगफुटी सदृश्य पाऊस झालं यामध्ये अनेक पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली त्यानंतर खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने रायगड किल्ल्याचा मुख्य दरवाजा सोबतच नाने दरवाजा आणि रोपवेचा मार्ग देखील बंद केलेला आहे त्यामुळे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना आज माघारी जावे लागले रायगड किल्ल्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली असल्याने रायगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत काल झालेल्या ढगफुटी पावसामध्ये अनेक पर्यटक हे किल्ले रायगडावर अडकले होते त्यामुळे पायवाटेने येत असणाऱ्या पर्यटकांना या पाण्याचा लोंढाच सामना करावा लागला त्याच अनुषंगाने आज जिल्हा प्रशासनानं रायगड किल्ला हा पर्यटनासाठी पूर्णतः बंद ठेवला आहे पाहुयात किल्ले रायगडावरून आढावा घेतला आहे.


Wadala And Panvel Railway Station : वडाळा, पनवेल रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवासी अडकले, पावसामुळे हाल

Wadala And Panvel Railway Station : वडाळा, पनवेल रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवासी अडकले, पावसामुळे हाल


OBC Reservation Meeting : ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक रद्द

OBC Reservation Meeting : ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक रद्द सोमवार दिनांक ८ जुलै २०२४ रोजी आयोजित केलेली आरक्षण विषयक सर्वपक्षीय बैठक ही पुढे ढकलण्यात आलेली असून तिची सुधारित वेळ आता ९ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६:३० वाजता सह्याद्री अतिथिगृह, मलबार हिल ,मुंबई येथे आयोजित केलेली आहे. याची कृपया नोंद घ्यावी.