KOLHAPUR FLOOD : पुराच्या पाण्यात पोहत जाऊन केला वीज पूरवठा सुरु

विशाळगड : सुभाष पाटील 

संपूर्ण जिल्ह्यामध्ये तसेच राज्यभरामध्ये मागील काही दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग पाण्याखाली गेलेले आहेत. या पूराच्या पाण्यामध्ये विद्यूत पोल, डीपी, पाण्याखाली जावून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. अशा पूरपरिस्थितीत शाहुवाडी तालुक्यातील एका तरुणाने पूरच्या पाण्यात पोहत जावून बंद झालेला विद्युत पुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे त्याचे संपुर्ण तालुक्यात कौतूक होत आहे. स्वतः चा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावणाऱ्या वीज कर्मचाऱ्याचे नाव राम घेवदे आहे.

नाशिक : निफाडला पूराच्या पाण्यात वाहून गेली तरुणी, आश्रमशाळेजवळ सापडला मृतदेह

शाहूवाडी तालुक्यातील कडवी नदीला आलेल्या महापुरात उतरून वीज कर्मचारी राम घेवदे यांनी डीपीवरील बिघाड दुरुस्त केला. मलकापूर शहरासह शेजारील चार गावात गेली तीन चार दिवस विजपुरवठा बंद होता. त्यामुळे सोमवार पेठ नजीकच्या एका खांबावर चार गावातील वीज पुरवठा अवलंबून होता. मात्र या खांबारील डीपी पुराच्या पाण्यात दोनशे फुटावर होती. त्यामुळे राम घेवदे पुराच्या पाण्यात जाऊन अकरा केव्हीच्या डीपीवरील दुरुस्तीचे काम केले.

कडवी नदीला आलेल्या महापुरात उतरून वीज कर्मचारी राम घेवदे यांनी डीपीवरील बिघाड दुरुस्त केला.

2024-07-27T13:32:58Z dg43tfdfdgfd